मंत्र तंत्र | MANTRA TANTRA
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
19 MB
Total Pages :
36
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
हजारी प्रसाद द्विवेदी - Hazari Prasad Dwivedi
हजारीप्रसाद द्विवेदी (19 अगस्त 1907 - 19 मई 1979) हिन्दी निबन्धकार, आलोचक और उपन्यासकार थे। आचार्य हजारी प्रसाद द्विवेदी का जन्म श्रावण शुक्ल एकादशी संवत् 1964 तदनुसार 19 अगस्त 1907 ई० को उत्तर प्रदेश के बलिया जिले के 'आरत दुबे का छपरा', ओझवलिया नामक गाँव में हुआ था। इनके पिता का नाम श्री अनमोल द्विवेदी और माता का नाम श्रीमती ज्योतिष्मती था। इनका परिवार ज्योतिष विद्या के लिए प्रसिद्ध था। इनके पिता पं॰ अनमोल द्विवेदी संस्कृत के प्रकांड पंडित थे। द्विवेदी जी के बचपन का नाम वैद्यनाथ द्विवेदी था।
द्विवेदी जी की प्रारंभिक शिक्षा गाँव के स्कूल में ही हुई। उन्होंने 1920 में वसरियापुर के मिडिल स्कूल स
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)शकलो तर शेठजी, त्याच्यामुळे तुमच्यावरही उपकारच होतील. तुम्ही या शेतकऱ्याचं
फार मोठं नुकसान केलं आहे, पण त्यामुळे तुमचंही खूप नुकसान झालं आहे. त्यातून.
तुम्हाला वाचवण्यासाठी आता आम्हालाच ' प्रयत्न करावे लागतील.” शेठजींनी त्यांच्या
बोलण्याकडे लक्षच दिलं नाही. त्यांची गाडी पुढे निघून गेली
श्रमण नारद देवलजवळ गेले. दोंघांनी मिळून पोती उचलली. त्यातला भिजलेला
तांदूळ आणि' चांगला तांदूळ वेगवेगळा करून नीटपणे बांधू लागले. गाडी सुद्धा
दोघांनी मिळून सरळ केली. पोती वर चढविली. देवलला वाटलं की नक्कीच हा
संन्यासी अगदी परोपकारी महापुरुष आहे. म्हणून त्यांचा यथोचित आदरसत्कार करून
त्यानं विचारलं, “महाराज, माझ्या आठवणीप्रमाणे मी तर या शेठजींशी कधी वाईट
वागलो. नाही. माझ्यामुळे त्यांचं कधी काही नुकसान झालं नाही. तरीही त्यांनी
माझ्यावर असा अन्याय का बरं केला?” नारद म्हणाले, “अरे बाबा, आता जे तुला
भोगावं लागतंय् ती तुझ्या पूर्वीच्या कर्माची फळं आहेत. मनुष्य जे काही पेरील तेच
उगवेल.”
गाडी ठीकठाक करून देवल निघाला. नारद त्याच्याबरोबर चालत चालत निघाले
थोडं दूर गेल्यावर बैल एकदम बिथरले. समोर सापासारखी लांब वस्तू पाहून देवल
घाबरला. नारदांनी जवळ जाऊन नीट पाहिलं आणि म्हणाले, “अरे, ही तरं. एक लांब
थैली आहे. हे बघ, याच्यात मोहोरा भरल्या आहेत.” त्यांच्या लगेच लक्षात आलं की
ही तर शेठजींची थैली दिसते. कधी पडली ते शेठजींच्या ध्यानात आलं नसावं. थैली
उचलून देवलकडे देत ते म्हणाले, “जेव्हा काशीला पोचशील तेव्हा शेठजींना शोधून
काढ आणि त्यांना ही पिशवी दे. त्यांचं नाव. आहे पांडूशेठ आणि त्यांच्या नोकराचं
नाव आहे महादत्त. त्यांना सांग की त्यांनी तुझ्यावर जो अन्याय केला त्याचा विचार
करू नये: त्यांना म्हणावं की मीही ती गोष्ट विसरून गेलो आहे. देवल, तू सुद्धा
शेठजींना त्यांच्या अपराधाबद्दल माफ कर.”
एवढं सांगून नारद निघून गेले. देवलही गाडी घेऊन पुढे निघाला.
काशीला मलिक नावाचा एक व्यापारी होता. त्यांच्याच आडतीत पांडूशेठ व्यवहार
करीत असत. त्यामुळे त्या दोघांचे चांगले संबंध होते. जेव्हा पांडूशेठ त्यांच्याकडे गेले
तेव्हा मलिक रडत रडत म्हणाला, “अरे बाबा, मी तर मोठ्याचं संकटात सापडलो
आहे. मला नाही वाटत की मी यापुढे तुझ्याबरोबर व्यवहार करू. शकेन. मी
राजवाड्यात खुद्द राजासाठी तांदूळ पाठवायचं वचन दिलं होतं. उद्या सकाळीच मला
सगळा तांदूळ पोचवायचा आहे. पण आज माझ्याकडे तांदळाचा एक दाणा सुद्धा
शिल्लक नाही. या शहरात एक आणखी बडा व्यापारी आहे. त्याच्याशी” माझी नेहमीच
14
User Reviews
No Reviews | Add Yours...