आपले हिरवे मित्र | APLE HIRWE MITRA

APLE HIRWE MITRA by पुस्तक समूह - Pustak Samuhहेमा साने - HEMA SANE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

हेमा साने - HEMA SANE

No Information available about हेमा साने - HEMA SANE

Add Infomation AboutHEMA SANE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
फारकत केली. 'नाते वाईट' केले आहे. अन्यथा या दोन्ही वनस्पतीचे गुणधर्म एकच आहेत. तुळशीचा माडा जास्तीत जास्त, एक मीटरपर्यंत उंचावतो. करंगळीएवढे जाड खोड पूर्ण ' वाढल्यावर पांढुरके असते आणि काष्ठ म्हणण्याइतके कठीण असते. याचेच मणी करून माळा बनवतात. माळ आहे याचाच अर्थ तुळशीच्या मण्यांची माळ घालून वैष्यव अथवा _ भागवत धर्माचा मार्ग अनुसरणे. - 3 तुळशीच्या पानांची रचना संमुख असते. दातेरी कडा असणाऱ्या पानांवर वेलग्रंथी असतात. त्या नुसत्या डोळ्यांनाही जाणवतात. एका अप्रतिम गंधाचे वरदान .: तुळशीला या ग्रंथींमुळे लाभले आहे. ऑसिमम या नावाचा अर्थच. मुळी गंध दरवळणे. या वासाने एकदम प्रफुल्ल वाटते. लुन्धा जपान्यात तुळशीला पाणी घालणे हा प्रघात. होता. विशेषत: चुलीच्या धुरातून सुटका होऊन स्वच्छ मोकळ्या हवेत श्‍वास घेता यावा या साध्या उपचाराला दिलेले ते धार्मिक स्वरूप असावे. - फांद्यांच्या टोकाशी तुळशीचे फुलोरे शैतांत. मंजिरी . म्हणजे हे फुलोरे; पण मंजिरीचे नाते केवळ तुळशीशीस आहे. एका मंडलात सहा नाजूक फुलांची रचना अशा कलात्मक रीतीने केलेली असते, की प्रत्येक मंजिरी म्हणजे एक बारीकशी दीपमाळाच वाटावी ! फुलेपांढुरकी किंवा फिकट किरमिजी रंगाची असतात. अगदी लहानग्या आकाराची, पण याही फुलांना व दुखावता त्यातील मकरंद _ सेवन करणाऱ्या मंधमाशा असतात. आश्‍चर्य म्हणजे यांना डंख मारणाऱ्या नांग्या नसतात. बहुधा तुळशीचा, भागवत सुरस तुळस : २८ पंथाचा क्षमाशीलतेचा गुण माशांनीही संगतीने उचललेली असावा. भी: पिकलेल्या मंजिर्‍्यात बियांसारखी वाटणारी राजगिऱ्याच्या आकाराची चार फळे असतात. बाजारात तुळशीचे बी' म्हणून जे बी विकत मिळते ते मात्र रान तुळशीचे बी असते. उ टर घरगुती उपचारात तुळशीला अनन्य स्थान आहे. तिची पाने कफनाशक आहेत. वाळलेली पाने भुकटी करून तपकिरीसारखी ओढल्यास जुनाट पटसे हरते. दुखणाऱ्या कानात तुळशीचा रस टाकतात. खोकल्यावर तुळशीचा रस आणि मध हा रामबाण उपाय आहे ल सर्व उपचारात महत्त्वाचे आहे, ते पानातील पिवळ्या रंगाचे _ उडनशील तेल. त्यामुळेच तुळशीची पाने उष्ण गुणधर्मांची आहेत. या उलट तुळशीचे बी मात्र शीतकर आहे. म्हणून तर तोंड येणे या विकारात त्यांची खीर गुणकारी आहे. तुळशीच्या पाना-बियांबरोबरच तुळशीची मातीही म तिचे गुणधर्म घेऊन बसते, म्हणजे औषधी आहे. कौटकदंशावर तिचा लेप उपयुक्त आहे. घरात तुळस असणे हे कीटक निवारणाचे एक साधन म्हणूनही आवश्यक आहे. तुळशीबन डासांनाही प्रतिबंध करते. 3 धर्मग्रंथांमध्ये तुळशी ठायी ठायी का भेटते. स्कंदपुराणानुसार अमृतकलशातून उडलेल्या थेंबापासून तुळशीची उत्पत्ती झाली. तिला दुसऱ्या कोणाचीही तोड नाही. ती अतुलनीय म्हणून तुल सी, असे ब्रह्मवैवर्त पुराण सांगते. तुलसीदलाखेरीज विष्णुपूजन नाही, पंढरीच्या आपले हिरवे मित्र : २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now