चित्रग्रीव | CHITRA GREEV

Book Image : चित्रग्रीव  - CHITRA GREEV

More Information About Authors :

धन गोपाल मुखर्जी - DHAN GOPAL MUKHERJI

No Information available about धन गोपाल मुखर्जी - DHAN GOPAL MUKHERJI

Add Infomation AboutDHAN GOPAL MUKHERJI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मारुती चितमपल्ली - MARUTI CHITAMPALLI

No Information available about मारुती चितमपल्ली - MARUTI CHITAMPALLI

Add Infomation AboutMARUTI CHITAMPALLI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आजूबाजूच्या प्रदेशात देवदाराची खुरटी जंगले होती, परंतु ते जंगल _ पाखराच्या आवाजाने गजबजले होते. फर वृक्षांवर चमत्कारिक कीटकांची किरकिर चालू होती. जांभळ्या फुलांच्या आमरी (आर्किड)वर निळ्या पंखाची, रत्नजडित फुलपाखरे उडत होती. व्होडोडेन्ट्रॉनच्या वृक्षांवर अनेक आकाराची फुले फुलली होती. त्यात काही चंद्रविंबाएवढी मोठी होती. अधूनमधून मार्जार कुलातील वाघाबिबट्याची गुर गुर्र ऐकू येई. . रात्री शिकारीवर ताव मारल्यामुळे आता त्यांना डुलकी लागली असावी. अचानक महाजनाने आवाज दिला की इथून पळा आणि झुडपात लपून राहा. आम्ही लगेच सूचनांचे पालन केले. जिकडे तिकडे सामसूम झाले. लगेच रातकिड्यांची किरकिर थांबली. पाखरे चिडिचूप झाली. एवढेच नव्हे तर झाडेही कुठल्यातरी प्रतीक्षेत स्तब्ध उभी होती. हवेतून कसलीतरी हळुवार कुणकुण येत होती. काही क्षणानंतर तो स्वर खालच्या पट्टीत ऐकू येऊ लागला. नंतर भीतिदायक कर्कश ध्वनी कानावर आदळताचक्षणी विशाल आकाराच्या वैनतेयाने घरट्याकडे झेप घेतली. पंखातून वाहणाऱ्या वार्‍याचा घों घों आवाज येत होता. तो पक्षी म्हणजे दोन पिलांची आई असावी हे महाजनाने हेरले. काही वेळ पंख न फडफडता ती हवेत स्थिर झाली. पिले घरट्याच्या आंतरभागात गेली. तिच्या पंजात कातडे सोललेला, सशाएवढा प्राणी लोंबत होता. घरट्याच्या प्रवेशद्वाराच्या कड्यावर शिकार ठेवण्यासाठी ती खाली झेपावली. तिच्या पंखाची लांबी सहा फ़ूट तरी असावी. तिने आपले पंख मिटले. पिले तिच्याकडे धाव घेताना पाहून तिने पंजाची नखे आत ओढून घेतली. कारण त्या अजाण शावकांना त्यापासून इजा होण्याची शक्‍यता होती. अर्ध मिटल्या पंखाने ती टूणटूण उड्या घेत घरट्याकडे गेली, तसा त्या पिलांनी तिव्या पंखांचा आश्रय घेतला. आता तिच्या पाखरमायेची त्यांना गरज नव्हती. कारण ती भुकेली होती. तिने पिलांना मृत सशाकडे नेले. बिनहाडाच्या मांसाचे काही लचके तिने काढले आणि त्यांना भरविले. शांत असलेला वरचा तसेच खालचा परिसर पुन्हा 25 एकदा मुखरित झाला. पाखरे आणि कीटकांचे आवाज पुनश्च ऐकू येऊ लागले. आम्ही ठपणातून बाहेर आलो. आम्हाला पुन्हा एकदा गरुडाच्या दर्शनासाठी मंहाजनाने इथे आणावे, असे थचन मी आणि राजाने त्याच्याकडून घेतले, अन्‌ घरची वाट धरली. त्यानंतर एका महिन्याने आम्ही तेथे परत आलो. बरोबर चित्रग्रीव आणि त्याच्या आईला आणले. माझी इच्छा होती की त्या पौसने दुसऱ्यांदा इथून उड्डाण करावे. म्हणजे त्याला इथले प्रत्येक गाव, लामासराई, सरोवर आणि नदी, तसेच श्वापदे आणि इतर पक्षी, क्रौंच, पोपट, हिमालयातील सारंग (हेरॉन), हंस, टिबुकली, बहिरी ससाणे, आभोळ्या यांची माहिती व्हावी. या खेपेला आम्ही गरुडाच्या घरट्यापलीकडे शंभर यार्ड गेलो. शिक्िर क्रतुचा प्रभाव ऱ्होडोडेन्हॉन वृक्षांवरदेखील जाणवत होता. त्यांच्या नारिंगी पाकळ्या आता गळत होत्या. त्यांचे उंचच्या उंच बुंधे वार्‍याने सळसळत होते. इतरही अनेक झाडांची पानगळ सुरू होती आणि वातावरणात विषण्णता भरली होती. अंदाजे अकरा वाजता आम्ही आमच्या कबुतरांना पिंजर्‍यातून मुक्त केले. शुभ्र हिमशिखरांवर इंद्रनील मण्यासारखे दिसणारे आकाश एखाद्या शिडासारखे शोभत होते. ती कबुतरे अर्धाएक तास उडत होती. तोच त्यांच्या वरच्या अंगाला बहिरी ससाणा दिसला. तो त्या दोन कबुतरांजवळ पोचला आणि त्यांचा पाठलाग करू लागला. परंतु कबुतरे मोठी सावध निघाली. ती त्याच्या तावडीतून सुखरूप निसटली. चित्रग्रीव आणि त्याची आई वेगाने झाडीच्या दिशेने खाली येत होती, तोच ससाण्याची सहचरी दिसली. अनू लगेच तिने त्यांच्यावर हल्ला चढविला. उडत त्यांच्याजवळ जाण्यात तिने पतीचे अनुकरण केले. परंतु तिचा प्रयत्न निष्फळ ठरला. आपल्या हातची शिकार सुटतेय हे पाहून नराने कर्कश आवाजात सखीला शीळ घातली. त्याचबरोबर योग्य संधीची वाट पाहत ती हवेत स्थिर झाली. कबुतरांना सुरक्षित वाटून, लगेच वेगाने ती दक्षिणेला उडाली. तसे 2५




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now