आजी ओजोबांची पत्रे | AAJI AJOBANCHE PATRA

Book Image : आजी ओजोबांची पत्रे  - AAJI AJOBANCHE PATRA

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुरेखा पाणनदीकर - SUREKHA PANANDIKAR

No Information available about सुरेखा पाणनदीकर - SUREKHA PANANDIKAR

Add Infomation AboutSUREKHA PANANDIKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रिय अंजली आणि कविता, अनेक आशीर्वाद. कशा आहात सध्या तुम्ही दोघी? तुम्हांला पाहून बरेच दिवस लोटलेत; त्यामुळे चुकल्याचुकल्यासारखं वाटते आहे आणि तुमच्या भेटीची ओढही लागून राहिलीय. लवकरच आपली भेट होईल, अशी आशा करतो. स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा झाल्यापासून स्वातंत्र्याबद्दल लोक बरेच काही लिहू आणि बोलू लागले आहेत. स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, द्यात काही शंकाच नाही. आपल्या कुटुंबापुरतेच बोलायचे तर इंग्रज सरकारविरुद्ध आपण चालवलेल्या प्रदीर्घ बहिष्कार- मोहिमेचा तो शेवट होता. पण मी त्याबद्दल काही लिहीत नाही, कारण त्याबद्दल तुम्हांला शाळेतून आधीच बरेच ऐकावे लागले आहे. पण स्वातंत्र्याच्या थोडीशी आधी जी फाळणी झाली त्याबद्दल मला या पत्रातून तुम्हांला काही सांगायचे आहे. हिंदू, शीख आणि मुस्लिम या सर्वांसाठीच फाळणी म्हणजे एक महान आपत्ती होती. फाळणीमुळे सगळीकडे दंगली पेटल्या होत्या. या जातीय ख्यातनाम दंग्यांमुळे भयंकर अस्वस्थ झालेल्या गांधीजींनी दिल्लीतील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात- शिक्षणतज्ज्ञ आनंद देखील भाग घेतला नाही. सरूप हे काही काळ चा खोलीला नॅशनल बुक ट्रस्टचे फाळणी झाली तेव्हा मी सतरा वर्षांचा होतो आणि लाहोरच्या एका कॉलेजात शिकत अध्यक्षही होते. होतो. लाहोर हेच आपले मूळ गाव. आम्हांला या शहराची खडानखडा माहिती होती आणि जगात इतके सुंदर गाव दुसरे नाही असे आम्हांला वाटायचे. त्यामुळे लाहोर सोडायची कुणाचीच तयारी नव्हती. तरीही मूठभर ख्रिश्चन आणि मोजके काही लोक वगळता बाकी साऱ्याच बिगर-मुस्लिमांना लाहोरच काय पण पाकिस्तानही सोडून परागंदा व्हावे लागले. कारण फाळणीनंतर लूटमारीचा आणि खुनाखुनीचा जो आगडोंब उसळला, त्याने कोणाही बिगर-मुस्लिमाला पाकिस्तानात राहणेच अशक्य करून टाकले. भारतीय प्रदेशातही बराच हिंसाचार झाला. आम्ही सारे फाळणीच्या अगदी कडाडून विरोधात होतो. कागदावर नुसती एक रेघ ओढून लाखो लोकांचं भवितव्य अशा प्रकारे ठरविण्याचा कुणालाही काय हक्‍क पोचत होता? अखेर जेव्हा गांधीजींनी दंगलींविरुद्ध आमरण उपोषण केलं तेव्हाच निदान भारतापुरत्या तरी या दंगली संपू शकल्या. १६/आजी-आजोबांची पत्रे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now