मेंदू | HOW WE FOUND OUT ABOUT THE BRAIN?

Book Image : मेंदू  - HOW WE FOUND OUT ABOUT THE BRAIN?

More Information About Authors :

आइज़क एसिमोव -Isaac Asimov

No Information available about आइज़क एसिमोव -Isaac Asimov

Add Infomation AboutIsaac Asimov

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
'न्युरॉनचा सिंद्धांत' असे म्हणतात. १८७३ साली कायिलो गोल्जी (१८४३-१९२६) या इटलीतील जीवशास्त्रज्ञाने मज्जातंतूंच्या पेशींना काही विशिष्ट रस्तायनाने रंग देण्याची एक नवीच पद्धत शोधून काढली. त्यामुळे पेशीतील काही सृद्ष्म रचनाच रंगीत होत व इतर मात्र तशाच राहात. अशा तऱ्हेने इतर शास्त्रज्ञांच्या लक्षात न आलेले पेशीच्या आतील तपशील सिंनॅप्म त्याला पाहता आले. त्यामुळे एका चेतापेशीचे अक्षतंतू इतर चैतापेशींच्या वृक्षिकांना जोडलेले नसतात हे तो अखेर सिद्ध करू शकला. त्यांच्या मध्ये एक सूक्ष्म पोकळी राहतें. या रिकाम्या जागेला 'सिनॅप्स' असे म्हणतात. सॅन्टियागो रॅपॉन इ काहाल (१८५२-१९३४) या स्पेनच्या प्राणिशाखडज्ञाने गोल्जीच्या रंगतंत्रात काही सुधारणा केल्या. वॉल्डेर हार्टझ्‌चा न्युरॉनचा सिद्धांत अचूक होता हे त्याने नि:संशय सिद्ध केले. २८ । मेंडू ९ 'मज्जातंतूची प्रेरणा > | १८२६ साली योहान पिटर म्युलर (१८0१-१८५2) या जर्मन जीवशास्त्रज्ञाने असे दाखवून दिले की, एक मज्जातंतू केवळ एकच कार्य करू शकतो. उदाहरणार्थ, डोळ्याकडून येंडुकडे जाणारा मज्नातंतू ('ऑप्टिक नर्व्ह! म्हणजे दृष्टिचिता) जेव्हा प्रकाशाने उत्तेजित होतो, तेव्हा तो संदेश मेंदूकडे पोचवला जातो आणि त्यानंतर आपल्याला उजेडाचे ज्ञान होते. तथापि, दाब वगैरिसारख्या दुसऱ्या एखाद्या कारणाने डोळ्यातील मज्जातंतू उत्तेजित झाल्यासही मेंदू आपल्याला उजेड़ाचाच अनुभव आल्याचे कळवतो. म्हणूनच काही वेळा डोळ्याला मार लागल्यास डोळ्यापुढे काजवे चमकले” असें आपण म्हणतों. अशा प्रेरणा मज्नातंतूंपधून कशा तऱ्हेने वाहुन नेल्या जातात? १८00 सालाच्या सुमारास धातूच्या तारेतून विद्युतप्रवाह कमता वाहून नेला जातो, हे लोकांना माहीत झाले होते. मज्जातंतूंमधून देखील एक प्रकारचा विद्युतप्रवाह जात असेल का? धातूच्या तारांतून विद्युतप्रवाह जात असताना काम करणारे अभियंते, ज्या माध्यमातून विद्युतप्रवाह जाणार नाही अशा निरोधक साधनाचे, म्हणजे उदाहरणार्थ, रेशमाचे किंवा रबराचे आवरण च्या तारेवर चढवण्याची खबरदारी चेत असत. असे करण्याने विद्युतप्रवाह त्या उपकरणाच्या इतर कोणत्याही भागात जाऊन अपघात होण्याची शक्‍यता टळत असे. अँक्सॉन्स म्हणजे अक्षतंतू हे विद्युतप्रवाह नेणाऱ्या तारा असून मायलिन शीथ हे त्यावरील आवरणाचे काम करते. यावरून हा एक प्रकारचा विद्युतप्रवाह असावा अशी कल्पना उदयास आली. ग्रेंदू । २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now