दामोदर कोसाम्बी | DAMODAR KOSAMBI

DAMODAR KOSAMBI by पुस्तक समूह - Pustak Samuhसुधीर पानसे - SUDHIR PANSE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

सुधीर पानसे - SUDHIR PANSE

No Information available about सुधीर पानसे - SUDHIR PANSE

Add Infomation AboutSUDHIR PANSE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मिळाली आणि त्यांनी ती स्वीकारली. खरे तर विद्यापीठाच्या गणित विभागातून महाविद्यालयात शिकवायला जाणे म्हणजे प्रतिष्ठेच्या दृष्टीने एक पायरी खाली उतरणे, शिवाय आर्थिकदृष्ट्याही नुकसानीचे होते. पण तरीही कोसंबींनी ही नोकरी का पत्करली? इतकेच नव्हे, तर्‌ अनेक वर्षें ते इथे टिकूनही राहिले, निर्वेधपणे एकांड्या शिलेदारासारखे आपले संशोधन करीत राहिले, ते का? कोसंबी फर्ग्युसन महाविद्यालयात अनेक वर्षे टिकून राहिले. याचे एक कारण असे असावे की, विद्यापीठाच्या मानाने महाविद्यालयांमध्ये सजकारण कमी आहे. संशोधन कार्यामुळे वा अन्य कार्यामुळे महाविद्यालयात पद अथवा प्रतिष्ठा यांचा फायदा होण्याची शक्यता जवळ जवळ शून्य. पण त्यामुळेच तदनुषंगिक राजकारणही नाही. शिवाय महाविद्यालयांमध्ये (अजूनही) निवडणुकांचे प्राबल्य विद्यापीठाच्या मानाने कमी. त्यामुळे त्यातून येणारे डावपेचही तुलनेने कमी. महाविद्यालयातील एकूण बौद्धिक वातावरण मात्र अशा दर्जाचे की, तेथे संशोधनाची, उत्तम बौद्धिक कामगिरी करण्याची ऊर्मी टिकवून ठेवणे कठीण. पण कोसंबींच्या अंतरात ही ऊर्मी इतकी जबरदस्त होती, की हा प्रश्‍न त्यांना आजिबात जाणवला नसणार. कोसंबींनी फर्ग्युसनमध्ये येण्याचे ठरवले, त्याचे आणखी एक कारण म्हणजे त्यांना पुण्याविषयी वाटणारे आकर्षण हे असणार. एक तर अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी भारतातील बालपणीचा बराच काळ पुण्यात काढला होता. शिवाय पुण्याच्या वातावरणात (निदान तेव्हा तरी) अशी काही अनाकलनीय गोष्ट असावी की, आत्यंतिक बुद्धिमान आणि विक्षिप्त माणसांना पुणे आपले वाटावे! पुण्यानेही अशा व्यक्तींना त्यांच्या विक्षिप्त वेगळेपणासह सामावून घेतलेले दिसते. 'आनंदी- गोपाळ'मधील गोपाळराव जोशी आठवा. त्या काळात आपल्या पत्नीला- आमंटीबाईंना --डॉक्टरकीचे शिक्षण देण्यासाठी परदेशात पाठवणारे, पण तेवढेच विक्षिप्त असणारे गोपाळराव जोशी पुण्याचे. या यादीत आणखीही नावे घालता येतील. दामोदर कोसंबींना पुण्यात यावेसे वाटले आणि अखेरपर्यंत ते पुण्यात राहिले, त्याचे एक कारण बहुधा हेच असावे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हा विद्टान पुण्यात राहून आपले संशोधनकार्य करीत राहिला, आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे गणिताचे तास घेत राहिला. वर्षानुवर्षे. अगदी सुरुवातीला बनारस हिंदू विद्यापीठात कोसंबी गेले, तेव्हा त्यांनी उत्साहाने विद्यार्थ्यांसाठीच्या अनेक उपक्रमात भाग घेतला. मैदानी खेळांमध्ये ते सामील हीत असत. जर्मन भाषेचा एक अतिरिक्त वर्ग त्यांनी सुरू केला. अलिगढ मुस्लीम ३० उत्तुंग आणि एकाकी संशोधक : दामोदर कोसंबी विद्यापीठात ते विद्यार्थ्यांच्या इतके जवळ गेले नाहीत, पण सहकाऱ्यांबरोबर त्यांची खूप जवळीक होती. (सहकारीही त्या तोडीचे होते.) फर्ग्युसनमध्ये आल्यावर मात्र त्यांनी आपल्याभोवती जणू एक कोष विणून घेतलेला दिसतो. म्हणजे पहिल्या दिवसापासून अगदी जाणीवपूर्वक हा कोष विणलेला असेल असे नाही. पण विद्यार्थ्यांबद्दलच्या त्यांच्या अपेक्षा आणि त्यातले वास्तव, तसेच सहकाऱ्यांची व आपली बौद्धिक पातळी यातली त्यांना जाणवणारी तफावत यातून हा कोष निर्माण झाला असेल. झ त्यामुळे कोसंबींच्या मोठेपणाची जाणीव सर्वांना होती. त्यांच्याबद्दल आदर होता; पण त्यांच्याजवळ जाण्याचे, संशोधन कार्यात सहभागी होण्याचे भाग्य त्यांच्यापैकी कोणालाही लाभले नाही. कोसंबीदेखील अगदी तुसडेपणा वाटावा, इतक्या फटकळपणे याबाबतीत विद्यार्थ्यांना व सहकाऱ्यांना तोडून टाकत. विद्यार्थ्यांना शिकवतानादेखील त्यांची पद्धत अगदी कठोर शिक्षकाची असे. खरे तर ती आदर्श पद्धत होती. विषयाची मूलभूत तत्त्वे विद्यार्थ्यांना नीट समजावीत आणि त्यातील प्रमेये विद्यार्थ्यांना कळावीत यासाठी ते कसोशीने प्रयत्न करीत. पण त्यापलीकडे जाऊन वर्गात गणिते सोडवून दाखवावीत व विद्यार्थ्यांना नोट्स द्याव्यात हे त्यांनी कधीही केले नाही. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत: बौद्धिक श्रम घ्यावेत असा त्यांचा आग्रह होता. ते शिकवत असलेल्या विषयातील सध्या चालू असलेले संशोधन विद्यार्थ्यांपर्यंत पोचावे असाही ते प्रयत्न करीत. पण संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करावे असे त्यांना वाटत नसे. ही ऊर्मी अंतर्यामी मुळातच असावी लागते, असे त्यांचे म्हणणे होते. परिणामत: ते काही विद्यार्थिप्रिय किंवा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे शिक्षक होते, असे म्हणता येणार नाही. मात्र 'हशार विद्यार्थ्यांकरता मी एक चांगला शिक्षक आहे, अशी माझी समजूत आहे', असे ते स्वत:च स्वत:बद्दल म्हणत असत व ते खरेही होते. हुशार व कष्ट करण्याची तयारी असलेल्या विद्यार्थ्यांना ते अधिक वेळ देऊन शिकवीत व हे विद्यार्थीही गुरू” म्हणून त्यांचा आयुष्यभर उल्लेख करीत. पण असे विद्यार्थी विरळाच. एकूण आपल्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना व शिक्षणपद्धतीला कोसंबींची शिकवण्याची पद्धत परवडण्यासारखी मव्हती. मात्र फर्ग्युसनमधील या काळात त्यांचे स्वत:चे संशोधन बहरला आले होते. त्याला धुमारे फुटले होते. विविध दिशा सापडल्या होत्या. फर्ग्युसन महाविद्यालयात कोसंबींनी १९३३ ते १९४५ अशी बारा वर्षे काढली. ते नंतर विनोदाने आणि काहीशा कडवटपणाने या कालखंडाला 'बारा वर्षांचा वनवास” असे म्हणत असत! कोसंबींच्या अत्यंत संतापी आणि फटकळ स्वभावाचे फटके त्या वेळच्या दामोदर कोसंबींचा जीवनपट ३१




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now