गुलाबी सई | GULABISAI

GULABISAI  by पुस्तक समूह - Pustak Samuhराजीव ताम्बे - RAJIV TAMBE

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

राजीव ताम्बे - RAJIV TAMBE

No Information available about राजीव ताम्बे - RAJIV TAMBE

Add Infomation AboutRAJIV TAMBE

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कसं कळत नाही. सागरगोटे काय, आपल्याला घरी पण खेळता येतील. आणि आम्ही लहान मुली झाडावर कशा काय चढणार ? आपण असं करू. आपण सगळे जंगलात फिरून येऊ. चैतन्य वेडावून दाखवत म्हणाला, *'पण नुसतं फिरून काय करणार ? त्यापेक्षा खाऊच खाऊ व्ही ! ?' अंगजा चैतन्यची समजूत' काढत म्हणाली, “ अरे, चेतन्यदादा असं काय करतोस ? आपण निरनिराळ्या झाडांची पानं जमवूया, रंगीबेरंगी फुलं गोळा करूया. . झऱ्यावर जाऊन पाणी पिऊया. झऱ्यातले रंगीत दगड वेचून आणूया.” पण कुणालाच दुसऱ्याचं म्हणणं पटेना. चैतन्यला अगदी आत्ताच खाऊ हवा होता. तर आनंदला लगेच झाडावर चढायचं होतं आणि गायत्रीला सागरगोटे, अंगजाला एकटं फिरायची भीती वाटत होती. कुणीच कुणाचं ऐकायला तयार नव्हतं. प्रत्येकाला वाटे आपलंच सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. मी मात्र मला हवं तसं वागणार, आता आम्ही सर्व भांडणार, मस्ती करणार, गडबड करणार... इतक्यात.... झाड म्हणाले, “थांबा मुलांनो ! तुमच्यासारख्या हुशार मुलांनी असा हट्टीपणा केलेला पाहून मला फार. वाईट बाटतं. तुमच्या सर्वांचं म्हणणं मला पटतं. खाऊ खाल्ला पाहिजे, गाण्याच्या भेंड्या-सागरगोटे खेळले पाहिजेत, जंगलात फिरलं पहिजे, झऱ्यात गेलं पाहिजे. पण हे सर्व न भांडता, न मस्ती करता.” र आम्ही सर्वजण एकदम म्हणालो, “पण असं कसं होणार ? ?* र झाडाची पानं सळसळली. झाड हसतच म्हणाले, **बरं झालं आज तुम्ही माझ्या सावलीत बसलात. मी आता तुम्हाला एक गंमत दाखवणार आहे.” ः गंमत पाहायला मिळणार हे ऐकल्यावर आम्ही सगळं विसरून गेलो आणि आनंदाने झाडाभोवती फेर धरून नाचू लागलो. _ झाड सुद्धा खुशीत येऊन डोलू लागले. मग आम्ही शांतपणे झाडाच्या सावलीत बसलो. झाड म्हणाले, “मुलांनो तुमचा हा नाच मला फार आवडला. तुम्ही असंच खेळीमेळीनं राहिलं पाहिजे. 8 तुम्हाला माहीत आहे का ? माझ्या अंगावर असंख्य मुंग्यांची धावपळ सुख असते आणि तेही लाल मृगया, काळ्या मुंग्या, पिवळ्या मुंग्या. ह्या एवढ्या लाखो मुंग्या एकाच झाडावर असून त्यांचं कधी आपापसात भाडण होत नाही. आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये, आपला




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now