पक्ष्याचे गाणे | THE SONG OF THE BIRD

Book Image : पक्ष्याचे गाणे  - THE SONG OF THE BIRD

More Information About Authors :

एंथनी डी मेलो - Anthony de Mello

No Information available about एंथनी डी मेलो - Anthony de Mello

Add Infomation AboutAnthony de Mello

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सैतान आणि त्याचा मित्र एकदा सैतान त्याच्या मित्राबरोबर फिरायला गेला. त्यांच्या पुढे चालणारा माणूस खाली वाकला आणि त्याने जमिनीवरून काहीतरी उचलले. “त्या माणसाला काय सापडले?” मित्राने विचारले. “सत्याचा एक तुकडा.” सैतान म्हणाला. “यामुळे तू अस्वस्थ नाही का झालास?” मित्राने विचारले. “नाही.” सैतान म्हणाला, “मी त्याला सत्यापासून श्रद्धा बनवायला लावेन.” धार्मिक श्रदधा म्हणजे सत्याकडे जाणारा मार्ग दर्शवणारा नामफलक असतो. जेव्हा तुम्ही नामफलकच कवटाळून बसता त्यावेळी तुमचा सत्याकडे जाण्याचा मार्ग रोखला जातो कारण तुम्हाला असे वाटते की ते तुम्हाला अगोदरच मिळालेले आहे. नसरुद्दिन मेला आहे नसरुद्विन तत्ववेत्त्याच्या भूमिकेत होता: जन्म आणि मृत्यू, ते काय आहे ते कोण सांगू शकेल? त्याच्या बायकोने स्वयंपाक करताना वर पाहिले आणि म्हणाली, “तुम्ही सगळे पुरुष सारखेच असता - अव्यावहारिक. प्रत्येकाला माहिती आहे की जेव्हा एखाद्याचे शरीर बाहेरून कडक आणि गार पडते तेव्हा तो मेलेला असतो. नसरुद्विन बायकोची हुशारी बघून खूप प्रभावित झाला. एकदा तो बाहेर बर्फात गेला असताना त्याचे हात आणि पाय बर्फाने सुन्न झाले. “मी नक्कीच मेलो आहे.” त्याला वाटले: “मी जर मेलो आहे तर मी का चाल्रतो आहे? मी एखाद्या प्रेतासारखे पडून राहायला हवे.” आणि मग त्याने तसेच केले. तासाभराने तिथून चाललेल्या वाटसरुंच्या घोळक्याला तो रस्त्याच्या कडेला पडलेला मिळाला. त्याला बघून ते आपापसात तो जिवंत आहे का मेलाय यावर वाद घालू लागले. नसरुद्विनला जोरात ओरडून सांगण्याची इच्छा होऊ लागली की अरे मूर्खांनो, तुम्हाला माझे शरीर बाहेरून थंड आणि कडक झाल्याचे दिसत नाही का? पण त्याला माहित होते की गप्प बसणेच योग्य होते कारण प्रेते बोलत नसतात. शेवटी त्यांनी निष्कर्ष काढला की तो मेला आहे आणि ते त्याला खांद्यावर टाकून कब्रस्तानात नेऊ लागले. एक मैलभर पुढे गेल्यावर दोन रस्ते फुटत होते. पुन्हा नवा वाद चालू झाला की कोणता रस्ता कबरस्तानात जातो. नसरुद्दीनने खूप वेळ ऐकून घेतले पण शेवटी त्याला सहन होईना. तो उठून बसला नी म्हणाला, “माफ करा मित्रांनो, डाव्या बाजूचा रस्ता कबरस्तानात जातो. मला माहीत आहे की प्रेते बोलत नाहीत, हा नियम मी एकदा मोडला आहे. पण मी तुम्हाला आश्‍वासन देतो की परत असे घडणार नाही.”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now