कुमाऊँची कन्या - माना | KUMAONCHI KANYA - MANA

Book Image : कुमाऊँची कन्या - माना  - KUMAONCHI KANYA - MANA

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

राधाबहन भट्ट - RADHABAHAN BHATT

No Information available about राधाबहन भट्ट - RADHABAHAN BHATT

Add Infomation AboutRADHABAHAN BHATT

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२८ । कुमारची कन्या माना खिन्न होऊन सांगत होती. बाबांना तो वाद तिथंच थांबवायचा होता, म्हणून ते मध्येच म्हणाले, “हो ग माय, तू बरोबर बोलतेस. मी आता पारूच्या लग्नाचा विचार लवकरात लवकर करीन. पण आता मला तुझ्याशी बोलायचंय ते वेगळंच आहे. मानाला शाळेत धाडायचा विचार करतोय मी. परुली अन्‌ कमल दोघींना काही आपण शिकवू शकलो नाही; पण त्या आता मोठ्याही झाल्या आहेत. मानाचं वय मात्र शाळेत जाण्याचं आहे... आणि हरकत तरी काय? आपल्या गावातल्या किती तरी मुलींना आता त्यांचे आईवडील शाळेत घालायला लागलेच आहेत. शहरात तर मुली कॉलेजसुद्धा शिकतात. आजीच्या तोंडचं पाणी पळालं. “शिकून काय करतील या पोरी? कोयता घेऊन शेतात जाणं, निंदणी, कापणी करणं, रानातनं सरपण अन्‌ चारा आणणं ही त्यांची सगळी कामं बंद करायचीत की काय? यातलं काहीच त्यांनी केलं नाही तर त्यांच्याशी लग्न तरी कोण लावणार? मग त्या काय स्वतःचं पोट स्वतःच भरतील होय?'' “असंच असतंय ग माँ. आता डोंगरात राहणाऱ्या बायकासुद्धा ऑफिसात, शाळेत, दवाखान्यात सर्वदूर काम करतात. अग, सरकार चालवणाऱ्यांमध्येसुद्धा हल्ली बायका असतात.'' बाबा थोडे नाराजीनं सांगत होते. “अगदी घरी जरी राहायचं असलं तरी पोरी शिकलेल्या बऱ्या आणि शिकल्यासवरल्या म्हणून काय त्यांची सर्व कामंधामं एकदम सुटतात थोडीच? परुलीची आईसुद्धा लग्नाआधी तिसरी-चौथीपर्यंत शाळा शिकलीच होती ना? आपल्याकडे आल्यावर कामाच्या डोंगराखाली दबून ती शिकलेलं सर्व विसरूनही गेलीय. मी तर म्हणतो; की परुली, कमल आणि त्यांची आई या तिघींनाही रात्रीच्या शाळेत घालायला हवं. सध्याच्या काळात पावलोपावली शिक्षण लागतंय. आधीच आपला भाग हा एवढा मागासलेला. त्यातून आपलं गावही आडबाजूला. रस्त्यापेक्षा किती तरी मैल अलीकडे. असं नसतं तर आपल्या गावातल्याही मुलांइतक्याच मुलीही शाळेत जाताना दिसल्या असता. आजोबांनीही बाबांचीच री ओढीत म्हटलं, “काळाप्रमाणे बदलावंच लागतं. आपल्या वेळेसारखं आता राहिलेलं नाही बाई! नवीन पिढी आहे ही. त्यांना त्यांच्या पद्धतीनेच वागू दिलं तर ते सुखात राहतील.” “ठीक आहे. तुम्हीसुद्धा तेच सांगताय म्हणजे बरोबरच असेल.'' आजी म्हणाली खरी; पण तिला मनातल्या मनात डाचतच राहिलं. दुसऱ्या दिवशी बाबांनी एका लाकडी फळीतून एक छोटा तुकडा कापून काढला. त्याला काळा रंग दिला. ही मानुलीची पाटी होती. पांढरी माती पाण्यात कालवून बाबांनी ती एका डबीत ठेवली. बोरूला टोक केलं. आता पाटीवर अक्षरं रेखाटायचा . सर्व सरंजाम तयार झालेला होता. मानुलीनं नवे कपडे घातले. सगळ्यांनी तिला जवळ कुमाऊंची कन्या माना । २९ घेतलं. तिच्या कपाळावर टिळा लावला आणि मानुली बाबांबरोबर शाळेच्या नवीन विश्वाकडे रवाना झाली. शाळा दीड किलोमीटर लांब अंतरावर होती. पंचायतीत सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेल्या गावात शाळा होती. याच गावाच्या नावानं पंचायत ओळखली जायची. मानुलीच्या गावासारख्या आणखी दोन-तीन गावांची मिळून ही पंचायत होती. शाळा, आरोग्यकेंद्रांसारख्या सोयी प्रत्येक गावात उपलब्ध होणं दुरापास्तच होतं. बिकट पायवाटेवर एक किलोमीटरभर गेलं, की एक ओढा लागायचा. त्यातलं पाणी ' डोंगरावरून वाहत आल्यानं आधीच वेगात असायचं. त्यात पावसाच्या दिवसांत तर जिवाला धोकाच होऊन बसायचा. या ओढ्याच्या अडथळ्यामुळेच मानुलीच्या गावातली मुलं गेल्या वर्षापर्यंत शिक्षणापासून वंचित राहिली. बाबा मानुलीला सांगत होते, “या ओढ्यामुळेच परुली अन्‌ कमल शाळेला येऊ शकल्या नाहीत. मानुली मनातल्या मनात म्हणाली, “बाबा, मी खरंच भाग्याची. माझ्या शिकायच्या वेळेला या ओढ्यावर पूल बांधला गेला हे किती बरं झालं!'' तिच्या गावातली अजून आठ-दहा मुलं झुंडीनं त्यांच्या मागं-पुढं चालत होती. मात्र ते सर्वजण मुलगेच होते. त्यात मुलगी फक्त मानुलीच. , मानुली बाबांसोबत शाळेच्या आवारात पोहोचली तेव्हा मैदानात निरनिराळे खेळ चाललेले होते. सगळी मुलं आनंदात होती. फक्त एकच काय तो रडत होता. कारण दुसऱ्या मुलानं त्याच्या थोबाडीत मारली होती. तेवढ्यात गुरुजी तिथं आले. सर्व मुलांनी त्यांना हात जोडून 'नमस्कार' म्हटलं. _ “नमस्ते गुरुजी'' असं बाबाही आदराने मस्तक झुकवत म्हणाले. बाबांनी मानुलीलाही नमस्कार करायला सांगितलं. तिनं हात जोडले खरे, पण तिला काय बोलावं हेच कळेना. गुरुजी मनमिळाऊ होते. त्यांनी प्रत्युत्तर देत म्हटलं, या, बसा. तुमच्या लेकीला आमच्या शाळेत शिकायला आणलं, हे तुम्ही फारच छान केलंत.” “आभारी आहे.'' बाबा म्हणाले, “तिला खरं तर ही शाळा खूप लांब पडणार आहे. आम्ही डोंगराच्या त्या बाजूला दरीत राहतो. तुम्ही जर सुरुवातीला तिच्याकडे थोडं जास्त लक्ष दिलंत तर ती दररोज शाळेत येऊ शकेल. अजून ती सात वर्षांची गुरुजी म्हणाले, “तुम्ही काळजी करू नका. हिच्याएवढीच माझीही मुलगी शाळेत येणार आहे. मी या दोघींची ओळख करून देईन. त्या एकमेकींसोबतच बसतील. नाही म्हटलं तरी आमच्या शाळेत मुलींची संख्या म्हणावी तशी नाही. इकडच्या लोकांची अजूनही मुलींना गुरं चारायला पाठवायची सवय काही जात नाही. इथून दहा किलोमीटर पुढं गेलात, की दक्षिणेकडं मुलींचं शाळेत जायचं प्रमाण वाढलं आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now