भितरे भूत | BHITRE BHOOT

BHITRE BHOOT by पुस्तक समूह - Pustak Samuhरत्नाकर मतकरी - RATNAKAR MATKARI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रत्नाकर मतकरी - RATNAKAR MATKARI

No Information available about रत्नाकर मतकरी - RATNAKAR MATKARI

Add Infomation AboutRATNAKAR MATKARI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मेले तरी बाचतील ! ११ ती असा विचार करतेय तोच त्याचं पहिलं पान उलटलं, दुसरं, तिसरही उलटं . . . एवढ्यात खुर्ची टेबलजवळ किंचित सरकली आणि मोडक्या पायावर कलून उभी राहिली. पुस्तकाची पानं भरभर उलटत होती. पण ती बार्‍्यानं फडफडावीत, तशी नाही. एकेक पान कुणीतरी उलटावं तशीं. 3 कोण उलटतंय्‌ पानं ? कोण बसलंय्‌ खुर्चीवर ? सुधा गारठल्यासारखी झाली. तिला किंकाळी फोडाबीशी वाटत होती. पण आवाज केला तर जे जे कोण अद्ट्श्य तिथं बसलंयू्‌ त्याचं आपल्याकडे लक्ष जाईल या भीतीनं ओरडली तर नाहीच, उलट तशीच सरकत कोपऱ्यात गेली . . . दडून बसावं, तशी बसून राहिली. . . एवढ्यात, पुस्तकाचं शेवटचं पानही उलटून संपलं. ठपूकन्‌ आवाज करून पुस्तक बंद झालं ! सुधा एक नि:श्वास सोडतेय्‌ एवढ्यात ते पुस्तक टेबलवरून उंच उचललं गेलं आणि जमिनीवर फाडूदिशी फेकलं गेलं. आता मात्र सुधाच्या तोंडून आ-करून एक अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली. या पुस्तकाच्या पाठोपाठ आणखी काय काय फेकलं जातं या भीतीनं. भानामाती म्हणून एक भुताटकीचा प्रकार असतो, त्यात सगळय़ा घरभर सामान उधळलं जातं असं ती ऐकून होती ! पण माही. पुस्तकानंतर इतर काहीच हललं नाही. नाही म्हणायला, खुर्ची थोडी मागं सरकली आणि भिंतीला टेकून उभी राहिली. सुधा हलकेच पुढं झाली आणि तिनं जमिनीवर पडलेलं पुस्तक उचललं. आणि काय चमत्कार? कोणी तरी ते तिच्या हातून खेचून घेतलं आणि पुन्हा जमिनीवर भिरकावून . दिलं --- र उ त्या पाठोपाठ घोगऱ्या आवाजातले रागीट, वयस्कर शब्द आले -- भिक्कार! भिक्कार आहे अगदी! हातात धरू नये इतकं भिक्कार ! _ आरे बापरे! हे कोण बोललं आत्ता? सुधा स्वत:शीच म्हणाली. कारण खोलीत तर तिच्याशिवाय दुसरं कुणीच दिसत नव्हतं ! कशाला घेऊन येतेस असली भयंकर पुस्तकं ? उगाच वेळेचा अपव्यय ! --- तोच चिडकट आवाज म्हणाला. कादंबरी लिहिलीय म्हणे! एक चांगला प्रसंग नाही की एक चांगलं पात्र नाही! आणि भाषा तर दिव्यच आहे! सुधाची भीती थोड़ी कमी झाली. एकूण ते जे कोण बोलत होतं. त्याचा राग तिच्यावर नसून ' कादंबरीवर होता! कोण बोलतंय ते मला कळेल का? -- तिनं धीर करून विचारलं. मी --! प्राध्यापक नृसिंहनाथ जोगदंड ।




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now