दामोदर धर्मानंद कोसाम्बी | DAMODAR DHARMANAND KOSAMBI

Book Image : दामोदर धर्मानंद कोसाम्बी  - DAMODAR DHARMANAND KOSAMBI

More Information About Authors :

चिंतामणि देशमुख - CHINTAMANI DESHMUKH

No Information available about चिंतामणि देशमुख - CHINTAMANI DESHMUKH

Add Infomation AboutCHINTAMANI DESHMUKH

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
' इतरांना देत होता. मध्येच न, ४०४ 08४8 006 100 00 !' म्हणून एकाकडली _ टॉफी काढून दुसऱ्याला द्यायचा. हा वाक्प्रचार मी तेव्हा प्रथम ऐकला व अजून लक्षात आहे. मध्येच तो बारपुत्यांचीही पोरकट थट्टा करी. मेंदीकुंडात स्नान करताना त्याने कपडे काढले तेव्हा ग्रीक पुतळ्यासारखे प्रमाणबद्ध शरीर पाहून आम्ही थक्कच झालो. मग तो व्यायामाबद्दल बोलू लागला. डंबेल्स, चेस्ट एक्स्पँडर वगैरे साधने न वापरता खांद्यांना, पाठीच्या स्नायूंना आकार देण्यासाठी कोणते व्यायाम करावे ते त्याने सांगितले. “बर्नार मॅकफॅडनचे आपल्याकडे फार कोतुक आहे, तसं तिकडे अमेरिकेत मुळीच नाही” असे तो म्हणाला. उ जोराने वाहणारा प्रवाह ओलांडताना, तसेच डोंगर चढत-उतरताना डगमगणाऱ्यांना हात द्यायला बाबा पुढे असायचा. बाबा शिष्ट नव्हता. यावेळी नातेवाईकांना भेटण्यासाठी दामोदरने गोव्यालाही भेट दिली. मामा, चुलत भावंडे, तसेच धर्मानंदांचे स्नेहीसोबती, असा बराच गोतावळा गोव्यात होता. या गोवाभेटीतील त्यांच्या भ्रमंतीबद्दल त्यांच्या नंतरच्या परिचितांनी काही आठवणी नमूद करून ठेवल्या आहेत. त्या दामोदरांच्या तोंडूनच त्यांना ऐकण्यास मिळाल्या असाव्यात. गोव्यातील तेव्हाच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यात त्याने बराच वेळ कारणी लावला. गोव्यातील खनिजसंपत्ती, तसेच जलसंपत्तीविषयी त्याने बरीच माहिती गोळा केली होती. तसेच या अमाप निसर्गसंपत्तीचा योग्य वापर होत नसल्याने त्यासंबंधी काय उपाय योजता येतील याचीही बरीच चौकशी त्याने केल्याचे दिसते. जंगलातून भटकण्याचा आपला, पुढे आयुष्यभर जोपासलेला छंदही त्यांनी येथे भागवून घेतला. बौद्धधर्मज्ञानाचा प्रसार करण्यास वाहून घेतलेल्या व गांधीजींच्या अहिंसक चळवळीशी पूर्ण एकरूप झालेल्या धर्मानंदांच्या चिरंजिवांना शिकारीचीही आवड होती. गोव्यातील या मुक्कामात बंदूक घेऊन सह्याद्रीच्या जंगलात त्याने शिकारीसाठी भ्रमंती केल्याचे त्यांच्या मेव्हण्यांनी नमूद करून ठेवले आहे. _ दामोदरची शिकारीची होस नंतर काही वर्षे तरी टिकून होती हे नंतरच्या काळातील त्यांच्याविषयीच्या काही आठवणीवरून दिसते. परंतु त्यांच्या शिकारकोशल्याबद्दल व कर्तृत्वाबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही. मात्र या संबधित एक आख्यायिका आहे. बंदूक हाती आल्यावर केवळ शिकार करण्यावर समाधान न मानता बंदुकीच्या गोळीचा मार्ग प्रत्यक्षात कसा जातो, यावर, म्हणजे ७000167) 0 00॥॥ऑ0$वर त्यांनी स्वतःच अभ्यास केला. प्राथमिक पातळीवर पहाता बंदुकीच्या गोळीचा मार्ग पॅरबोलाचा असतो हे शाळकरी मुलांना ठाऊक असतेच. परंतु प्रत्यक्षात हवेचे घर्षण, वार्‍याची दिशा, गोळीचा आकार, वगैरे वास्तवातील लहानमोठे, बदलते घटक विचारात घेऊन हा प्रश्न सोडवायचे म्हटले तर तो बराच किचकट बनतो. दामोदरांनी वास्तवपातळीवर हा प्रश्न सोडविण्यात एकट्यानेच बरीच प्रगती साधली, व त्याचवेळी प्रत्यक्ष फेरी झाडून आपली समीकरणे कितपत बरोबर आहेत हे पडताळण्याचेही प्रयोग केले असे म्हणतात. पुढे . महाविद्यालयाच्या प्रथम वर्षात हाच प्रश्न सोप्या पातळीवर प्रयोगशाळेतील शिक्षकाने _ समजावून सांगण्यास सुरूवात केली तेव्हा (काय फालतू गोष्टी सांगण्यात वेळ वाया २० दामोदर धर्मानंद कोसंबी दवडताहेत' अशा अर्थाचे उद्‌गार काढून, खांदे उडवत दामोदरने वर्गत्याग केला, असा या आख्यायिकेचा शेवट आहे. दामोदरांनी नक्की कशाप्रकारे हा प्रश्न हाताळला होता हे कळणे शक्‍य नसले तरी त्यांचा यातून आढळून येणारा एक गुण स्पष्ट होतो- एखाद्या विषयाची मूलतत्त्वे समजून घेतल्यावर प्रत्यक्ष वास्तवातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा वापर करू पाहण्याची वृत्ती. त्यांच्या पुढील आयुष्यात या स्वतंत्र वृत्तीचा वारंवार प्रत्यय येतो. पुस्तकी ज्ञान व व्यावहारिक प्रश्न यांच्यात फारकत ठेवण्याची सर्वसाधारण भारतीय विद्यार्थ्यांची (बहुदा मेकॉलेच्या शिक्षणपद्धतीमुळे) निर्माण झालेली वृत्ती पाहता अमेरिकेतील शिक्षणसंस्कारामुळे लहान वयातच दामोदरने हा गुण उचलला ! भारतातील ही भ्रमंती चालू असताना दामोदरच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न मात्र तसाच लोंबकळत होता. एखाद्या भारतीय विद्यापीठात म्हणजे संलग्न महाविद्यालयात प्रवेश मिळविण्याचे थोडेफार प्रयतन त्याने केले असावे. दामोदरने अमेरिकेत दिलेल्या शालान्त परीक्षेला भारतीय विद्यापीठात त्यावेळी मान्यता नव्हती, त्यामुळे त्याला कॉलेजात सहजासहजी प्रवेश मिळणे शक्‍य झाले नाही; धर्मानंद स्वतः भारतीय. शिक्षणक्षेत्रात वावरलेले, परंतु तरीही त्यांनी मुलाच्या कॉलेजप्रवेशासाठी खास धडपड केली नाही, असे त्यांचे चरित्रकार ज. स. सुखठणकर यांनी लिहिलेले आहे. कदाचित हार्वर्डला शिकण्याची संधी हातात असताना भारतातील एखाद्या महाविद्यालयात चाकोरीबद्ध, कमी प्रतीचे शिक्षण घेण्यात फारसा राम नाही असेही पिता, पुत्र, वा दोघांनाही वाटले असणे शक्‍य आहे. त्यामुळेही धर्मानंदांनी दामोदरच्या शिक्षणाची येथेच व्यवस्था लावण्याच्या दृष्टीने फार प्रयत्न केले नसावेत. उ परिणामी, १९२५ साल दामोदरने भारतात नुसतेच काढले. यावर्षी धर्मानंदांचे तिसऱ्यांदा हार्वर्डला जाण्याचे घाटत होतेच: अखेरीस गुजरात विद्यापीठ सोडून त्यांनी १९२६ च्या जानेवारीत अमेरिकेस प्रयाण केले. दामोदरही वडिलांबरोबर हार्वर्डला परतला. उ उ घरच्या ओढीने अस्वस्थ झालेले त्याचे मन आई व बहिणीबरोबर कुटुंबात राहून मिळालेल्या मानसिक व भावनिक विश्रांतीनंतर निश्चितच स्थिरावले व पुन्हा हार्वर्डला पदार्पण केल्यावर त्याने नव्या जोमाने व पूर्वीच्याच उमेदीने शिक्षणाला सुरुवात केली. आणखी एका दृष्टीनेही ही वर्षभराची मधली सुटी सत्कारणी लागली. दामोदरची भारतातील मुळे स्थिरावण्यासाठीही सुटीचा उपयोग झाला. भारतातील परिस्थितीची येथील प्रश्नांची प्रत्यक्ष ओळख त्यांना या काळात झाली. अमेरिकेतील अनुभवांबरोबर येथील अनुभवांची तुलना करण्याची संधीही मिळाली. अकराव्या वर्षी बालवयात अमेरिकेत गेलेल्या .दामोदरला, तेथे उच्च शिक्षण सुरू करण्यापूर्वी मायदेशाशी पुन्हा धागेदोरे जुळवून घेणे गरजेचे होते, व ती गोष्ट या काळात घडून आली. प्रत्यक्षात मात्र हे वर्ष दामोदरला फार महागात पडले. चार वर्षानंतर दामोदरला पदवी प्राप्त केली तेव्हा जागतिक मंदीची नुकतीच सुरुवात झाली होती, व त्या कठीण परिस्थितीत पुढील संशोधन अशक्य झाल्याने डॉक्टरेटची पदवी न घेताच त्यांना भारतात परतावे लागले. एक वर्ष आधी ते पदवीपरीक्षा पास होते तर कदाचित पीएच्‌. डी. दामोदर धर्मानंद कोसंबी २९




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now