बलराज साहनी - माइया जीवनाची पटकथा | BALRAJ SAHNI - AN AUTOBIOGRAPHY

BALRAJ SAHNI - AN AUTOBIOGRAPHY  by पुस्तक समूह - Pustak Samuhबलराज साहनी - BALRAJ SAHNI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

बलराज साहनी - BALRAJ SAHNI

No Information available about बलराज साहनी - BALRAJ SAHNI

Add Infomation AboutBALRAJ SAHNI

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
हे सांगण्याची हिंमत कोण करणार! प्रेसिडेंट'चे दिग्दर्शक होते नितीन बोस. तेव्हा कुणाला ठाऊक होतं की एक दिवस असाही येईल की दम्मोला पृथ्वीराजजींबरोबर “दीवार” या नाटकात मुख्य भूमिका करण्याचा मान मिळेल. किंवा, लीला देसाई निर्मित 'काबुलीवाला' या चित्रपटात पठाणाची मध्यवर्ती भूमिका करण्याची संधी मला मिळेल. किंवा, अमिया चक्रवर्ती यांच्या अकाली निधनानंतर माझी भूमिका असलेला “कठपुतली' हा चित्रपट नितीन बोस पूर्ण करतील. परंतु असं झालं हे खरंय. दुसऱ्या दिवशी आम्ही पी. सी. बरुआंचं घर गाठलं. त्यांच्या खाजगी चिटणिसांना न जुमानता आम्ही सरळ बैठकीच्या खोलीत जाऊन बसलो. आम्ही शांतिनिकेतनमधून आलोय हे खाजगी चिटणिसानं बरुआंना जाऊन सांगितलं असणार. काही मिनिटांतच ते आम्हाला भेटायला आले. खरं तर त्या दिवशी त्यांच्या बायकीची तब्येत बरी नव्हती. तिथं बसल्या बसल्या माझ्या आणि दम्मोच्या डोक्यात विचारांचं थैमान-- बरुआंच्या पत्नी म्हणजे कोण? जमुना? आमची उत्सुकता शिगेला पोचली होती. पण हे विचारणार कोणाला? अन्‌ कसं? बरुआ आले. खूप थकलेले, क्‍लांत असे. पुरेशी झोप झाली नव्हती त्यांची असं वाटलं. त्यांनी आमच्याकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. काही सुचेना मला आणि दम्मोला. मग आम्ही त्यांच्या चित्रपटांवर त्यांनाच आमची मतं सांगू लागलो. बरुआ शांतपणे ऐकत होते. आमच्यासारख्या आगंतुक अन्‌ आगाऊ पाहुण्यांची त्यांना सवय असणार. आमचं बोलून झालं तरीही बरुआ खूप वेळ गप्पच होते. देवदाससारखं सगळं. मग म्हणाले, “तुम्हाला सिनेमात काम करायचंय ?'' एकदम अचानक प्रश्‍न आल्यानं आम्ही गडबडलो. 5 “ही... हो... करायचंय काम...” माझ्या अगोदर दम्मो हसत हसत थट्टेनं म्हणाली. ठीकाय. तुम्ही उद्या दहा वाजता स्टुडिओवर या,” एवढं बोलून बरुआंनी आमचा निरोप घेतला. पूर्ण दिवस आम्ही हवेत तरंगत होतो. पिसाप्रमाणे. तेव्हा कुठं ठाऊक होतं की सिनेमा-दिग्दर्शक समोरची पीडा टाळण्यासाठी मुद्दामहून असं वागतात. अन्‌ एके दिवशी शांतिनिकेतनहून आम्ही सेवाग्रामला पोचलो. सिनेमाच्या विचारांपासून एकदम दूर. कथाकार म्हणून मला बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळू लागली होती. हिंदी मासिकांतून माझ्या गोष्टी छापून येत असत. जगातही बर्‍याच र्ध माझ्या जीवनाची पटकथा उलथापालथी घडत होत्या. दुसऱ्या महायुद्धाचे पडघम वाजू लागले होते. हिटलर आणि मुसोलिनीच्या सैन्यानं युरोपभर विध्वंस सुरू केला ल होता. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होऊनसुद्धा सुभाषचंद्र बोसांनी गां मान तुकवून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे देशात खळबळ माजली होती. सेवाग्रामात मला आणि दम्मोला जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभाई परेल, मौलाना आझाद यांसारख्या दिग्गज, धुरंधर नेत्यांचं रोज दर्शन घडत असे. एकदा दम्मोनं पंडित येहरू आणि सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना स्वत: चहा करून दिला होता. मी सेवाग्रामच्या शिक्षण संघात काम करत असे. त्याचे प्रमुख होते डॉ. जाकिर हुसेन. अशा सर्वार्थांनं भारलेल्या वातावरणात आणि कस्तुरबा, मीराबहन यांसारख्या निरलस, थोर व्यक्तींच्या सहवासात सिनेमासारख्या निरर्थक गोष्टींकडं आमचं लक्ष कशाला जाणार ? र र पाहता पाहता दुसरं महायुद्ध सुरू झालं. माझ्या आयुष्यानसुद्धा एक नर्वच वळण घेतलं. लंडमच्या बी. बी. सी. वर निवेदक म्हणून आम्हाला काम मिळालं. सेवाग्रामचा निरोप घेऊन मी आणि दम्मोनं युरोपची वाट धरली. _॥ शांतिनिकेतन ते बी. बी. सी. १७




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now