अरण्यराग | ARANYARAAG

Book Image : अरण्यराग  - ARANYARAAG

More Information About Authors :

जीत रॉय - JEET ROY

No Information available about जीत रॉय - JEET ROY

Add Infomation AboutJEET ROY

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रहाणं चालूच होतं. नंतर काही वर्षांनी एका काळोख्या रात्री 'चिंडिट' लोकांनी तिथं हल्ला केला आणि विहाराच्या आत व आसपास थोडसं युद्ध करून जपान्यांना पळवून लावलं. पुढे जेव्हा मृतांची यादी करण्यात आली तेव्हा असं दिसून आलं की अवघ्या ६२ चिंडिट्सना शत्रूंनी ठार केलं होतं, पण सुमारे १६० पेक्षाही जास्त लोकांना सर्पदेशामुळे मरण आलं होतं. 30 ९. माणूस हा धोकादायक प्राण्यांपेक्षाही कितीतरी अधिक प्राणघातक आहे या पृथ्वीवर सर्वात जास्त काळ चाललेलं युद् माणसानंच वन्य श्‍्वापदांविरुद् पुकारलेलं होतं. आणि खेदाची बाब म्हणजे ते अजूनही चालू आहे. अगदीच प्राचीन काळात माणूस निव्वळ जगण्यासाठीच वन्य प्राण्यांशी लढला. पुढे तो धनधान्य पिकवायला लागला आणि त्याचा साठाही करू लागला. याही काळातलं युद् संरक्षणासाठीच होतं - त्याच्या पिकांच्या आणि प्राण्यांच्या. माणसानं अन्नासाठीही जंगली प्राण्यांची शिकार केली हे खरं असलं तरीही त्यावेळी त्याची शस्त्रास्त्र फारशी सुधारलेली नव्हती, म्हणून शिकारींची संख्याही फारशी विशेष नव्हती. नंतर माणसानं जसजसी प्राणघातक शस्त्रं शोधून काढली, तसतसा प्राण्यांचा संहारही कायम वाढतच गेला. माणसानं त्याला घातक वाटणारी वन्य श्‍वापदंच मारून टाकली असं नाही, तर त्यानं नि्दयीपणानं निरुपद्रवी प्राण्यांनाही ठार मारलं- तेही केवळ त्यांचं मांस, चरबी, कातडी, लोकर आणि पिसांच्या लोभांनं. अतिशय कठोर होऊन त्यानं जंगलं नष्ट केली. सरोवरं आणि दलदलीच्या जागा कोरड्या ठणक केल्या, नद्यांवर धरणं बांधली किंवा त्यांचे प्रवाह वळवले. आणि हे करीत असताना त्यानं हजारो जीवांना वसाहती, अन्न आणि पाणी तोडुन मारून टाकलं. उ उ माणूसच नि:संशयपणे पृथ्वीवरील सर्वात जास्त क्रूर आणि घातक प्राणी आहे. शिकारीच्या प्रलोभनानं मारून टाकलेल्या व नाहीशा करीत आणलेल्या निव्वळ भारतातल्याच प्राण्यांकडे बघा- गेंडा, सिंह, काळवीट, दलदलीजवळची हरिणं, मगरी इतकी नावंही पुरेशी आहेत. अनिर्बंध हत्त्या, बेपर्वाईनं केलेली जंगलतोड आणि दलदल व नद्या नाहीशा करण्यानं प्राण्यांच्या जाती इतक्या झपाट्यानं कमी होत गेल्या की त्यांना 'संरक्षित जाती' म्हणून घोषित करावं लागलं आहे.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now