बालकृष्ण भगवंत बोरकर | BALKRISHNA BHAGWANT BORKAR

Book Image : बालकृष्ण भगवंत बोरकर  - BALKRISHNA BHAGWANT BORKAR

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

प्रभा गनोरकर - PRABHA GANORKAR

No Information available about प्रभा गनोरकर - PRABHA GANORKAR

Add Infomation AboutPRABHA GANORKAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
26 बा. भ. बोरकर बोरकरांचे पुढे अधिक स्पष्ट होत गेलेले काव्यविषयक आदर्श या सुरुवातीच्या कवितांतून सुचित होताना दिसतात. '* अंगिच्या रक्‍तबिंदूंचे बनविती जे सदा पाणी तयांचे क्लेश वाराया मत्करी ठेद ग्रा पाणी तुझ्या घरच्या इमानाला मला दिसरात जाग दे इमानी पुण्य-जीदांना जिवाचे अध्यं अर्पू दे “” महात्मतेची, श्रेष्ठत्वाची पूजा बांधण्याची बोरकरांची वृत्ती या ओळींमध्ये प्रतिबिबित झालेली आहे. या संग्रहात “ पूर्वसूरींच्या सुरांबरोबरच माझे स्वतःचे सूरदेखील कुठंकुठं क्षीणपणानं का होईना डोकावताना दिसतात “ हे बोरकरांचे म्हणणें मान्य करावेच लागेल. बालकवी आणि गोविंदाग्रज यांची शब्दकळा लेव्‌न बोरकरांची कविता या काळात वावरत होती याचे कारण मराठी भाषा व मराठी छंद घटवण्याचा त्यांना या काळात' नाद लागला होता हे असू शकेल. या शिवाय या पौगंडावस्थेतील मनाला प्रभावित करण्याची संमोहनशक्ती' गोविंदाग्रज-बालकवींच्या कवितेमध्ये होतीच हेंही लक्षात ध्यावे लागेल. परंतु “चिमणे जगत” सारख्या कवितेत बालपणीच्या भातुकलीच्या विश्‍वाची तिळा अचानक उघडून त्यातली एक अनुमूती. बोरकर अचूकपणे स्वतःच्या शब्दात कसे पकडतात हेही इथेच पहाण्यासारखें आहे. 8 “ आनंदाने गुरे हाकिली फणसांच्या पानांची त्याही बिचाऱ्या गोडी होती गवताविण कुरणांची भोपळवेलीच्या पाव्याद्वर झुकली पहिली गाणी आनंदाने नयनी रुळले हृतसरसीचे पाणी ” या ओळीतील फणसांच्या पानांची गुरे आणि भोपळवेलीचा पावा है बोरकरांच्या खास स्वत:च्या भावबिशयातले तथशील आहेत. शिवाय हे तयशील कोणताही प्रादेशिक आविर्भाव न घेता येतात व तरीही त्यांना मुळातच एका प्रादेशिक सौंदर्याचे कोंदण लाभलेले असते. त्या काळात रूढ असलेल्या छंद(च्या, लयीच्या ब नादाच्या अनुकरणात नादावलेली बोरकरांच्या स्वतःच्या कक्तिची लय अकस्मातपणे, '* माझी आगबोट चालली दरिथात ग, दरियात ग' मत' घावत तरी तव हृदयात ग * या स्वतंत्र छंदात पकडली जाते. या छंदालाच पुढे माधवराव पटवर्धनांनी 'जलारोहण छंद असे नाव दिले. “ कोकणीतील' सार्थ शब्दप्रयोग ठिकठिकाणी वापरण्याचा उपक्रम ' आपण केला असल्याचे बोरकरांनी संग्रहाच्या प्रस्तावनेत नम्रपणे नमूद केले होते. पण “ माझी आगबोट ” किवा “ चिमणे जगत' ” यात असा हेतुपुरस्सर प्रयत्न नाही. तर अनुभूतीत'च असणाऱ्या प्रादेशिकतेचा अस्सल गंघ आहे. स्वतःची शब्दकळा, स्वत:ची भाषा, स्वत:ची अनुमृती चा'चपडण्याचा, रचनांचे प्रयोग बोरकरांची कविता 27 करून पाहण्याचा हा प्रारंभीचा काळ होता. अजून स्वत्व गवसले नव्हते. त्यामुळे मध्येच अचानक हिदू समाजातील असहाय बालविधवा माझ्या ताईच नाही तर काय '* अशी ज्लीषभागी टीप देऊन “ ताई” ही कविता येते. तर कधी “ अनंता तुला कोण पाहू शके “ अशी भारदस्त, उत्कट व चुस्त बंदीशही आढळते. या काळात बोरकरांमध्ये आत्मविश्‍वास नव्हेता. “प्रतिभा” संग्रहातल्या या कवितांना बोरकर 'किक्लोरावस्थेतील तानबाजी'' म्हणतात. त्यांच्या मते, “ गाण्याचे पूर्ण रूप त्याला आले नव्हते. ' “ हा संग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर एकदोन वर्षातच त्याच्या मर्यादा आणि उणीवा मला कळल्या.” यावरून त्यांची स्वतःची काव्यविषयक जाणीव विकसित' होत गेलेली दिसते. “प्रतिभा” संग्रहात समाविष्ट झालेल्या कवितांमधली एकही कविता नियतकालिकांत' प्रकाशित झालेली नव्हती. तांब्यांच्या आणि खांडेकरांच्या मंटीनंतर बोरकरांना कवितेच्या संदर्भात आत्मविश्‍वास निर्माण झाला. हळूहळू त्यांच्या कविता “रत्नाकर, ज्योत्स्ना” अित्यादी मासिकांतून प्रकाशित होऊ लागल्या. र कविवर्य भा. रा. तांबे यांचा संग्रह वाचनात' आल्यानंतर बोरकरांनी ज्या कंविंता लिहिल्या त्यांच्यावर तांबे यांच्या कवितेचा गाढ संस्कार आहे. 1937 साली प्रसिद्ध झालेल्या “जीवनसंगीत' या संग्रहाच्या प्रस्तावनेत बोरकर म्हणतात, “कविवर्य तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे चालवण्य,च्या निष्ठेने मो कलेल्या उपासनेला लागलो व बराचसा आत्मविश्‍वास आल्यावर महाराष्ट्राच्या रसिकतेला रिझवण्याच्या महत्त्वाकांक्षेते माझे जीवन-संगीत' आळवायला सिद्ध झालो.” हा संग्रह बोरकरांनी कविव्यं तांब्यांना अर्पण केला. तांब्यांचा आपल्यावर एवढा गाढ प्रभाव का आहे याची मीमांसा बोरकरांनी पाडयांवकरांना दिलेल्या प्रदीर्घ मुलाखतीत केली आहे.. ते म्हणतात, त्यांच्या कवितेनं मला अद्ली भुरळ का घातली, मी तिच्यात यथेच्छ का डुंबलो ! त्यांचाच गंडा का बांधला ! . . त्याला कारण एवढंच की त्यांच्यांत मला माझा समानघर्मा भेटला होता. माझा उद्याचा “मी” त्यांच्यांत मला आढळला होता. त्यांचा काव्यविषयक आदर्श आणि तो धरण्याची त्यांची हातोटी माझ्या मनःपिडाला अधिक अनुकूल वाटली म्हणून. . .” तांबे आणि बोरकर यांच्यामध्ये काही परिस्थितीचे आणि वृत्तींचे' साम्य दिसते. तांबे महाराष्ट्राच्या राजकीय, समाजिक वातावरणापासून दूर, मध्यप्रदेशात राहत. तर बरकर गोव्यात. तांब्यांच्या मोषतीचे वातावरण संस्थाती, सुखवस्तू मनोवृत्तींना आवाहन करणारे, तर दोरकरांचा परिसर पोर्तुगीज लॅटिन संस्कृतीचा आणि तेथला समृद्ध निसर्ग देखील जीवनाची आसक्ती वृद्धिगत करण्याला पोषक असाच होता. दोघांच्याही वृत्ती आस्तिक्तेचे संस्कार घारण करणाऱ्या, आनंदविभोर आणि सौंदर्यासक्त' होत्या. तांब्यांप्रमाणेच, चराचर विश्‍वातून ईश्‍वरी चेतन्याचा साक्षात्कार होतो असा बोरकरांचा विश्‍वास




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now