द लिटिल प्रिंस | THE LITTLE PRINCE
Genre :बाल पुस्तकें / Children
Book Author :
पुस्तक समूह - Pustak Samuh,
लतिका मांडे - LATIKA MANDEY,
सेंट एंटोनी दे एक्सुपेरी - SAINT ANTOINE DE EXUPERY
लतिका मांडे - LATIKA MANDEY,
सेंट एंटोनी दे एक्सुपेरी - SAINT ANTOINE DE EXUPERY
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
490 KB
Total Pages :
47
Genre :
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Authors :
पुस्तक समूह - Pustak Samuh
No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh
लतिका मांडे - LATIKA MANDEY
No Information available about लतिका मांडे - LATIKA MANDEY
सेंट एंटोनी दे एक्सुपेरी - SAINT ANTOINE DE EXUPERY
No Information available about सेंट एंटोनी दे एक्सुपेरी - SAINT ANTOINE DE EXUPERY
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)... मी तिच्यापासून कध्धी कध्धी दूर जायला नको होतं. . . तिच्या त्या लबाडीमागे दडलेली, तिला
माझ्याबद्दल वाटणारी ओळ मी जाणून घ्यायला हवी होती . किती निर्व्याज . . . कशी साधी भोळी
असतात ना ही प्ट्रलं! पण माझ्या प्ट्रलराणीला जीव कसा लावावा हे समजायला मीही फार लहानच
होतो तेव्हा...”
9
मला वाटतं आपल्या मुक्ततेसाठी राजपुत्रानं स्थलांतर करणाऱ्या पक्षयांची मदत घेतली असावी.
निघायच्या दिवशी सकाळी त्यानं आपला ग्रह अगदी नीटनेटका आवरून ठेवला . जागृत असलेल्या
ज्वालामुखींची नीच झाडलोट केली . होय, त्याच्या ग्रहावर दोन जागृत ज्वालामुखी होते आणि त्यांचा
उपयोग त्याला सकाळची न्याहरी गरम करून घेण्यासाठी व्हायचा . त्याच्या ग्रहावर काही निद्रिस्त
ज्वालामुखीही होते , “त्यांचा काम नेम ?” असं म्हणत तो त्यांचीही साफसफाई करायचा . त्यांना
अगदी स्वच्छ ठेवायचा .
“झाडून पुसून स्वच्छ ठेवलं म्हणजे ते कसे संथ आणि स्थिर जळत रहातात . त्यांचा उद्रेक होत
नाही . ज्वालामुखींचा उद्रेक म्हणजे धुराडयातून येणाऱ्या ज्वालांसारखाच असतो.”
आपल्या पृथ्वीवरचे ज्वालामुखी स्वच्छ करायला आपण फार लहान पडतो आणि म्हणूनच मग
त्यांच्या उद्रेकांमुळे आपल्यावर इतकी सारखी संकटं कोसळत असतात .
शेवटच्या बाओबाबचा अंकूर उपटताना राजपुत्र जरा साशंकच होता . आपल्याला आता पुन्हा कधीच
परतावंसं वाटणार नाही असं काहीसं त्याला वाटत राहिलं . तरीही, ही नेहमीची कामं त्याला त्या
दिवशीही मोठी महत्वाची वाटली आणि मग जेव्हा त्यानं फुलराणीला पाणी दिलं आणि तिला काचेच्या
घुमटात ठेवायची वेळ आली तेव्हा त्याचं मन अगदी भरून आलं.
“बरंय मग . . बाय . .” तो तिला म्हणाला .
“गुड बाय. . .” तो पुन्हा म्हणाला.
तिला एकदम खोकला आल्यासारखं झालं; पण तो सर्दीपडशानं येणारा खोकला नव्हता.
“माझं जरा चुकलंच . . .” अखेर ती कसंबसं म्हणाली , क्षमा कर मला... आणि वू...
सुखी होण्याचा प्रयत्न कर.”
तिच्या अशा साध्यासुध्या बोलण्यानं तो चकितच झाला, कारण उगाचच काहीतरी आरोपबिरोप
करून बोलण्याची तिची सवय होती .
तो स्तब्धच उभा राहिला, दोघांच्यामधे तो काचेचा पडदा . ही मधुर शांतता त्याला कोडयात टाकीत
होती.
“खरंच . . . माझं प्रेम आहे रे तुझ्यावर. . .” फुलराणी त्याला म्हणत होती . “तुला ते कधी
कळलंच नाही . . . अर्थात माझ्याच चुकीमुळे . . . पण तूदेखील माझ्यासारखाच वेडा निघालास . सुखी
राहा . तो काचपडदा बाजूमलाच राहू दे; मला नकोच आहे तो...”
“पण मग वारा... *
“तेवढं काही पडसं झालेलं नाहीय मला. . .रात्री गार वाऱ्याची झुळूक आली की. . ,. मला उलट
बरंच वाटेल ,. काही झालं तरी मी फुलराणी आहे!”
“पण इतर प्राणी...”
“आता मलाच जर प्ट्लपाखरांशी खेळावंसं वाटत असेल, तर दोनचार सुरवंटांची त्रास सहन
करायला हवा. फार सुंदर असतात नाही फुलपाखरं! ती माझ्याभोवती भिरकिरयताहेत या
User Reviews
No Reviews | Add Yours...