सुरस गोष्टी | SURAS GOSTHI

SURAS GOSTHI by पुस्तक समूह - Pustak Samuhमनोज दास - Manoj Das

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

मनोज दास - Manoj Das

No Information available about मनोज दास - Manoj Das

Add Infomation AboutManoj Das

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
रे (भ. ६) 0) र )। २4 को ४) की गी इय (न 1) र. य €& व थर 9) ० री राजाचे स्वर्गारोहण एक लट्ठंभारती मूर्ख राजा होता. त्याचा प्रधान होता काटकुळा पण हजरजबाबी. प्रधान स्त्रत्रभ्ला अति शहाणा समजे आणि रात्रंदिवस राजाची स्तुती करीत राही. राजाला वाटे हा. शहाणा प्रधान जोपर्यंत आपल्याजवळ आहे. तोपर्यंत आपल्याला काही चिंता नाही... ' मटा राजा नेहमी प्रधानाला म्हणे, “मला सोडून जाणार नाहीस असं वचन दे.'' आणि त्यावर प्रधान नेहमीच उत्तर देई, “नाही महाराज, कधीच नाही. आपण जेथे कुठे असाल, या पृथ्वीवर, स्वगीत अगर नरकात....मी सतत आपल्यापाशी राहीन. आपल्याला योग्य सल्ला देत जाईन आणि जगातले सगळे प्रश्‍न आपल्यासाठी मी सोडवून देईन.” राजा या उत्तराने फार खष होई. उ एक दिवस संध्याकाळी नदीकाठचा फेरफटका उरकून. राजा राजवाड्याकडे परत येत होता. अचानक त्याला शेजारच्या रानातून कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकू आली. राजाला कुतुहल वाटले. या कोल्हेकुईचे कारण त्याला समजून घ्यांयचे होते. 2५ तो आपल्या प्रधानाकडे वळून म्हणाला, “हे इतके कोल्हे एकाएकी एकाचवेळी का ओरडताहेत १? आणि ते देखील माझ्यासारख्या राजाला ऐकू जाईल असं १! प्रधानजी उत्तरले, “महाराज, आपल्याला माहीतच आहे यंदाचा हिवाळा जास्तच कडक आहे. या ब्रिचाऱ्या कोल्ह्यांजबळ उबदार कपडे नाहीत. ते आपल्याकडे पांघरुणाची याचना करताहेत.” “असं म्हणता? चांगलं सांगितलंत. कोल्ह्यांच्यासुदूधा भावना समजतात तोच खरा शहाणा प्रधान. पण या कोल्ह्यांजवळ पांघरुणं का नाहीत!” राजाने विचारल. “ आपले कल्याणाधिकारी याला जबाबदार आहेत.” प्रधान म्हणाला. त्या अधिकाऱ्यावर प्रधानाचा रोष होता. “ बापरे. आपल्या काल्याणाधिकाऱ्याने या कोल्ह्यांना पांघरुणं दिली नाहीत म्हणता १ ठीक आहे. त्या अधिकाऱ्याला एका पांघरुणात गुंडाळा आणि समुद्रात फेकून दया. मग शंभर एक पांघरुणं विकत घ्या आणि माझ्या या कोल्हेमित्रांना वाटून टाका.” राजाने हुकूम सोडला. र घाईघाईचे नाटक करीत प्रधानजी राजाचा हुकूम पाळायला निघाले. पण त्याने हुकमाचा पहिला अर्धी भाग पाळला. त्याने त्या अधिकाऱ्याला समुद्रात बुडवले, पण राजाच्या तिजोरीतून पांघरुणे विकत आणायला त्याने पैसे घेतले तरी पांधरुणे मात्र कधीच विकत आणली नाहीत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now