पहिलवानाचा ढोल | PEHALWANACHA DHOL

Book Image : पहिलवानाचा ढोल  - PEHALWANACHA DHOL

More Information About Authors :

चंदूलाल सवाज़ - CHANDULAL SAWAZ

No Information available about चंदूलाल सवाज़ - CHANDULAL SAWAZ

Add Infomation AboutCHANDULAL SAWAZ

जगदीश जोशी - JAGADISH JOSHI

No Information available about जगदीश जोशी - JAGADISH JOSHI

Add Infomation AboutJAGADISH JOSHI

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

फणीश्वर नाथ रेणु - FANISHWAR NATH RENU

No Information available about फणीश्वर नाथ रेणु - FANISHWAR NATH RENU

Add Infomation AboutFANISHWAR NATH RENU

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
त्याला लोटनच्या ताकतीचा अंदाज आला होता. शेवटी अगदी नाइलाजाने महाराजांनी परवानगी दिली. म्हणाले, “जा, खेळ जा.” ढोल वाजू लागला. बघे लोकात खळबळ माजली. आवाज वाढू लागला. जत्रेतले दुकानदार आपली दुकाने बंद करून पळत निघाले. “चांद सिंहाला जोड. वाघाचा बच्चा कुस्ती खेळतोय.” उ ढोल मोठ्याने वाजू लागला. “चट-धा, गिड-धा, चट-धा, गिड-धा.” ढोलाच्या तालाचा लोटनने नेमका अर्थ पकडला. चट-धा म्हणजे ये आणि गिड-धा म्हणजे लढ. ढोलाने लोटनला आधीच शाबासकी दिली. “ढाक-ढिका, ढाक-ढिना, ढाक-ढिना म्हणजे शाबास पठ्ठे, शाबास पट्टे.” चांदने लोटनला खेचून जोरात दाबलं. बघे टाळ्या वाजवू लागले. “मेला, मेला. बाबा रे पार चुराडा होईल चुराडा. चांद सिंहाशी भिडायचं म्हणजे काय पोरखेळ आहे ? वाघाचा बच्चा आहे चांद सिंह. . .समजलं.. . परंतु ढोलाचा आवाज घुमत होता. लोटनच्या अंगात बळ संचारत होतं. “चट गिड-धा, चट्‌ गिड-धा, चट्‌ गिड-धा.” म्हणजे घाबरू नको, घाबरू नको, घाबरू नको. धे लोटनच्या मानेभोवती हात घालून चांद सिंह त्याला चित करू पाहात होता. बादल सिंह आपल्या शिष्याला उचकवत होता, “गाडून टाक तिथेच, बहादूर पोरा.” लोटनचे डोळे बाहेर आले होते. छाती फुटायला आली होती. दम लागला होता. लोकमत, राजमत चांद सिंहाकडे होते. सगळे जण चांदला शाबासकी देत होते. लोटनच्या बाजूने कुणी नव्हते. होता केवळ ढोलाचा आवाज. त्या आवाजाच्या आधाराने तो आपली ताकत आजमावीत होता. डाव-पेच खेळत होता. आपला जोम वाढवीत होता. अचानक ढोलकामधून एक नाजुक बोल आला. धाक - धिना, तिरकट. धिना, धाक - धिना तिरकट - धिना,* पण लोटनला तो आवाज स्पष्ट ऐकू येत होता, ढोल जणू म्हणत होता, “पेच तोड, बाहेर पड, पेच तोड, बाहेर पड.” लोक अवाक्‌ झाले. पेच तोडून लोटन बाहेर आला. पटकन त्याने चांदची मानगुट पकडली. लोकमत आता बदलू लागले. लोकांनी लोटनला शाबासकी दिली. “शाबास रे मातीच्या शेरा !” ढोलकाचा आवाज जाडाभरडा व भसाडा झाला. “चटाक चट-धा, चटाक चट-धा” म्हणजे उचल आणि प




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now