जक कलिस एम० व्ही० पी० | JACQUES KALLIS M. V. P .

JACQUES KALLIS M. V. P . by पुस्तक समूह - Pustak Samuhरामचंद्र गुहा - RAMACHANDRA GUHA

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

रामचंद्र गुहा - RAMACHANDRA GUHA

No Information available about रामचंद्र गुहा - RAMACHANDRA GUHA

Add Infomation AboutRAMACHANDRA GUHA

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प टर *अन्‌टचेबल' च्या लेखन काळात मुल्कराज आनंद यांना आंबेडकरांची विशेष माहिती होती असे वाटत नाही, पण नंतरच्या काळात मात्र त्यांनी वेळोवेळी आंबेडकरांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. १९५० च्या दशकाच्या पूर्वार्धात मुंबईत आनंद आंबेडकरांना भेटले होते. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे १९८० मध्ये आंबेडकरांच्या “ऑनिहिलेशन ऑफ कास्टस्‌' या ग्रंथाच्या नवीन आवृत्तीला त्यांनी प्रस्तावना लिहिली. जातिनिर्मूलनावरील आंबेडकरांचा हा ग्रंथ प्रथम १९३६ साली प्रसिद्ध झाला, ज्यामध्ये आंबेडकरांनी हिंदू धर्मावर आणि त्यातील रूढींवर जहरी टीका केली आहे. डॉ.आंबेडकर यांचा हा टीकाग्रंथ प्रकाशित होण्यापूर्वी एक वर्ष आधी आनंद यांची कादंबरी प्रसिद्ध झाली होती. त्या कादंबरीत आंबेडकरांच्या पुस्तकातील काही सूत्रांची झलक होती आणि कदाचित पुढील आयुष्यात आंबेडकरांनी ज्या प्रकारचे राजकारण केले त्याची चाहूलही होती. रामचंद्र गुहा अन्टचेबल : गांधीवादी आणि आंबेडकरवादी १९३०: महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीयात्रा काढली. ब्रिटिशांच्या वासाहातिक कारभाराविरोधात गांधीजींनी उभारलेला हा दुसरा मोर्चा. जरी वरवर या कृतीला भरपूर प्रतिसाद लाभलेला दिसला तरी भारतीय समाजाच्या दोन गटांनी या सत्याग्रहाला कसून विरोध केला. त्यांपैकी एका गटाला गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष हे फक्त हिंदूंचे प्रतिनिधित्व करतात (मुसलमानांचे नाही) असे वाटत होते. तर गांधी हे फक्त उच्चवर्णीय हिंदूंचे प्रतिनिधी आहेत असे मत दुसऱ्या एका गटाचे होते. वरील प्रकारची टीका गांधींना झोंबत असे. मुस्लिम नेत्यांच्या संपर्कात राहून संवाद साधण्याचा त्यांचा प्रयत्न सतत चालू असे; त्याचबरोबर अस्पृश्यता निवारणाची त्यांची मोहीमही मोठ्या तडफेने चालू होती. चांभारकाम, भंगीकाम करणाऱ्या सामाजिक घटकांना घाणेरडे व अस्वच्छ ठरवून, देवळे, शाळा, रुग्णालये आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत यांच्या जवळपासही फिरकू दिले जात नसे. हिंदूंनी या पददलित जातींना आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रांत बरोबरीचा दर्जा द्यावा यासाठी गांधींनी १९३२ व १९३३ साली अनेकवार उपोषण केले व सवर्णांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. गांधीजी त्यांना 'अस्पृश्य' म्हणण्याऐवजी 'हरिजन' (देवाची मुले) म्हणू लागले. दक्षिण व पूर्व भारतात केलेल्या दौर्‍्यांत, धर्माच्या नावाखाली पाळली जाणारी ही असमानता सांभाळणे आणि लहान-मोठे भेदभाव करीत राहणे हे सवर्ण हिंदूंना शरम आणणारे आहे असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. या अन्यायी चालीरीतींचा स्पष्ट व कठोर शब्दांत जाहीर धिक्कार करणे हे सनातनी म्हणवून घेणाऱ्या हिंदूंचे कर्तव्य असून त्यांनी सुधारकांशी सहकार्य करून धार्मिक परंपरांच्या नावाखाली होणाऱ्या अन्याय-उपेक्षांपासून हरिजनांचे संरक्षण करावे, यावरच त्यांचा रोख होता. गांधींच्या या मोहिमेमुळे राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आणि त्याचे पडसाद साहित्यातही उमटले. मुल्कराज आनंद या लेखकाची 'अनटचेबल' ही इंग्रजीतील लहानशी पण भेदक कादंबरी अलीकडेच माझ्या वाचनात आली. १९३५ साली ती प्रथम प्रसिद्ध झाली. त्या कादंबरीतील मजकुरावर उठलेला गांधीविचारांचा आणि गांधींच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा स्पष्ट आहे. त्या कादंबरीतील गांधींचे अस्तित्व अध्याहत आहे; कारण स्वतः गांधी त्यात दिसत नसले तरी त्यामधील इतर पात्रे गांधी विचारांच्या प्रभावाखाली आहेत, हे जाणवत राहते. व्हर्जिनिया वूल्फ या लेखिकेच्या 'मिसेस दलोवे' किंवा त्यानंतरच्या सॉल बेलो या लेखकाच्या सीझ द डे' या कादंबऱ्यांप्रमाणेच 'अन्‌ूटचेबल चे कथानक झाडूवाल्या समाजातील 'बाखा' नावाच्या एका १८ वर्षांच्या मुलाचे दिवसभराचे अनुभव आणि त्याला काढावे लागणारे कष्ट यांच्याभोवती गुंफलेले आहे. त्या कादंबरीत बाखा या व्यक्तीचे चित्रण, त्याच्या कुटुंबाची परिस्थिती, बरोबरीच्या मुलांशी असलेले त्याचे संबंध, उच्चवर्णीय व मुस्लिम यांच्याशी होणारे त्याचे व्यवहार आणि या सर्वांना असलेली युरोपियन पार्श्वभूमी इत्यादी संदर्भात केलेले आहे. लष्करी तळ असलेल्या त्या गावातील त्याचे दैनंदिन व्यवहार चिवट जातिव्यवस्थेचे दर्शन घडवितात. त्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती (मग तो देवळातील भटजी असो, अगर हलवाई, दुकानदार, शिक्षक, सैनिक, बैलगाडी हाकणारा) त्याच्याकडे बापजाद्यांकडून वारसा म्हणून मिळालेल्या साधना : ९ मार्च २०१३ / ५




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now