नेपाल : चिखलाची वाट ते सरकारी गालीचा | NEPAL : A FEW NAILS AND A YARD OF WIRE

NEPAL : A FEW NAILS AND A YARD OF WIRE by केथ वारेन - KEITH WARRENपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

केथ वारेन - KEITH WARREN

No Information available about केथ वारेन - KEITH WARREN

Add Infomation AboutKEITH WARREN

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वर्णन कसे करावे हे मला समाजत नाही. परंतु आता भविष्यासाठी मी एक छान जिलासा उत्पन्न करणारे उत्तर शोधले आहे - मी संडास बांधते. डॉ.भट्टारी आणि मला खालून आधार दिलेले शाळेच्या इमारतीचे छात दाखवण्यात येते. हवेत थोडासा कुबट वास आहे. मी एका आठ वर्षांच्या मुलीकडे बघते आहे. तिचे न विंचरलेले पातळ केस तिच्या सुंदर चेहऱ्यावरील बदामी डोळ्यांना लपवत आहेत. तिच्याकडून येणारा उबदार वास हे सिद्ध करतो कि साबण आणि पाण्याबद्दल तिला खुपच कमी माहिती आहे! येथे प्रत्येक मुलाचा आपला वेगळा सुगंध आहे, तो त्याने किंवा तिने काय खाल्ले आहे किंवा काय काम केले आहे यावरून ठरतो - जळतणाची लाकडे गोळा केली आहेत, शेण आणले आहे कि मसूर बनवले आहे. मी विध्यार्थ्यांना त्यांच्या नावापेक्षा त्यांच्या सुगंधानेच जास्त ओळखते. यावरून काय शिकायला मिळते? प्रत्येक सुगंध हा एका वेगळ्याच जागेची ची जाणीव करून देतो, दिसणाऱ्या देखाव्यापेक्षा अत्यंत वेगळी जागा. या गोष्टीने मला ज्याला आपण नियम म्हणतो त्यांना समजण्याच्या प्रक्रियेवर गंभीरपणे विचार करण्यास शिकविले. अशिक्षित व अव्यक्त समाज ज्या नियमांनुसार वागतात व निर्णय घेतात, ते ग्रीस मध्ये उगम पाव्लेलेया व नंतर आधुनिक युरोपमध्ये विकसित झालेल्या शैक्षणिक वा विद्वत्तापूर्ण रुढींपेक्षा स्वरूपाने आणि व्याप्तीने निश्चितच वेगळे वाटू शकतात. मध्यकाळात युरोपमध्ये ज्यांनी पांडित्याला जन्म दिला तेच काम आज नेपाळ मध्ये धर्माधिकारी व परंपरा करत आहेत. माझे स्वतःचे मत असे आहे कि आपण नेपाळच्या अनुभवांबद्दल शक्य तितके जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि त्याद्वारे युरोपच्या विज्ञानापर्यंत पोहचण्याचे पूल बांधण्याचा प्रयत्न करावा. जर आपण त्यांच्या मानसिकतेवर संशोधन करणे दुर्लक्षिले तर॒ आपण एका भौतिक जगाच्या उद्घावाच्या कल्पनांना अनुभवण्याची मौलिक संधी गमावून बसू. कदाचित त्या युरोपच्या रिती- रीवाजांच्या ढिगाऱ्याखाली दबून नामशेष होऊन जातील. सर्व संस्कृतींमध्ये कुशल कामगार, पाणचक्की व पवनचक्की दुरुस्त करणारे, सैनिकी अभियंते, शेतकरी, जलसिंचन करणारे, नावी बांधणारे आणि यांसारखे इतरही लोक असतात. त्यांपैकी बरेचसे येथल्या, नेपाळच्या संस्कृतीतह्ी खोलवर रुजलेले आहेत.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now