योध्दा सन्यासी | YODHA SANYASI

Book Image : योध्दा सन्यासी  - YODHA SANYASI

More Information About Authors :

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

वसंत पोतदार - VASANT POTDAR

No Information available about वसंत पोतदार - VASANT POTDAR

Add Infomation AboutVASANT POTDAR

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
गदाईची आईसुद्धा धर्मप्रवण होती. ज्येष्ठ भ्राता रामकुमार संस्कृतचे पंडित होते. गदाई सात वर्षांचा असताना त्याच्या वडलांचा मृत्यू झाला (१८४३). गदाईला अगदी लहानपणापासूनच शालेय शिक्षणाचा तिटकारा होता. पण तो एक जन्मजात कलावंत होता. चित्रं काढणं, मूर्ती बनवणं, मृत्य व गायन आणि नकला व अभिनय या कला त्यानं कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आत्मसात केल्या होत्या. बालकांमध्ये कुतूहल असतंच, ती मस्तीही करतात. गदाईमध्ये जिज्ञासा व दांडगाई करायची वृत्ती जबरदस्त होती, आव्हानं स्वीकारण्याचा स्वभाव होता. कुणीही कशाचीही भीती दाखवली की ते तो हटकून करणारच. त्यातून रात्री एकट्यानं स्मशानात जाणं, भूतबाधा असलेल्या (मानल्या गेलेल्या) झाडांवर मध्यरात्री चढून बसून राहणं, ही निर्भयता त्याच्यात सहाव्या वर्षीपासूनच आढळून येऊ लागली. त्याच वयात त्याला सहज समाधीची अवस्था प्राप्त झाली. मन जिथं रमतं तिथं बालकं तल्लीन होतातच. पण गदाईची तन्मयता त्याला सभोवारच्या नव्हे तर स्वत:च्या शारीरिक अस्तित्वाचा विसर पाडत असे. खऱ्या अर्थानं त्याचं 'देहभान' हरपत असे. देहचेतना हरपल्यामुळे त्याचं शरीर अत्यंत सुटृढ बनलं. कारण (मृत्यूचं) भय हेच माणसाची शारीरिक वाढ आक्रसतं. गदाई मस्तपैकी बलिष्ठ होता. किशोरवयात आल्यावर आव्हानं पेलण्याची गदाईची खुमखुमी अधिकच प्रखर झाली. तो तेरा वर्षांचा असतानाची एक घटना फार मजेदार आहे. गदाईच्या शेजारी दुर्गादास पाईन नामक सदगृहस्थ राहत असत. एके दिवशी ते आपल्या मित्रांना सांगत होते की, त्यांच्या घरी पडदा पद्धत अत्यंत कसोशीनं पाळली जाते. त्यांच्या कुटुंबातील स्त्रिया सदोदित अंतःपुरात राहतात. एकाही ग्रामस्थ पुरुषानं त्यांना आजवर पाहिलं नाही. गदाईनं दुर्गादासची ती ग्वोक्ती ऐकताच त्याच्या कुटुंबातील स्त्रियांना पाहायचं ठरवलं. दुर्गादासश्ी त्यानं तशी पेजही मारली. काही दिवसांनंतर गदाधरनं गरीब कोष्टी (विणकर) स्त्रीची वस्त्रं नेसली व दुर्गादासच्या समोरूनच, त्याची परवानगी घेऊन घरात दिरला. पाईन परिवारातील सर्व स्त्रियांशी गप्पा मारून दिवस मावळल्यानंतर बाहेर पडला. कुणीही त्याला ओळखू शकलं नाही. पुढं खडतर साधना करून परमहंसांनी भक्तियोगातील सर्व भाव- शांत,दास्य, सख्य, वात्सल्य, मधुरा- स्वत:त सामावून घेतले होते. पुरुष भक्तानं मधुरा भाव अर्जित करणं महाकठीण साधना आहे. त्यात आदर्श आहे राधा. मनाच्या सांदीकोपऱ्यातही फसवणुकीचा लवलेश नको. किशोरवयातच त्यांनी दुर्गादासच्या कुटुंबातील स्त्रियांना आपण पुरुष असल्याचा आभासही होऊ दिला नव्हता. पुढं, मधुरा भक्तीत डुंबण्याच्या काळात रामकृष्णांच्या चालीरितींत व वागणुकीतही स्त्रीत्व सामावून गेलं होतं. त्या साधनेच्या काळात स्त्री वेष धारण करून ते राणी रासमणीच्या प्रासादात जात व स्त्रिया- मुलींना कुलीन स्त्रीची, पोशाखपद्धती व रितीभाती शिकवीत. कुणीही त्यांना ओळखू गकत नसे. गदाईनं आपल्या गावात नाटक कंपनी सुरू केली. लेखन, दिग्दर्शन व अभिनय सारं १२ । योद्धा संन्यासी काही गदाधर करीत असे. थोरले बंधू नाराज झाले. झाळा सोडून बिनबापाचा मुलगा जर नाटक्या झाला तर त्याच्या आयुष्याची माती होईल, याची त्यांना काळजी वाटू लागली. गदाईचे ते ज्येष्ठ दादा त्याच्याहून ३१ वर्षांनी मोठे होते. कुटुंबाचा भार वाहण्यासाठी रामकुमार कलकत्त्यात एक पाठशाळा चालवीत असत. गदाईला कलकत्त्याला घेऊन जाण्याचं त्यांनी ठरवलं. रामकुमार १८५२ साली गदाधरला घेऊन कलकत्त्यास आले. गदाईचं वय होतं सोळा. झामापुकूर वस्तीत रामकुमार राहत. तेथेच संस्कृत विद्यालय चालवीत. फी मागण्याचा काळ नव्हता तो. विद्यार्थी स्वत:हून जी दक्षिणा देतील ती स्वीकारावी लागायची. ती फार अल्प असे म्हणून रामकुमार पौरोहित्यही करीत. गदाईनं दादाला निक्षून सांगितलं की, ऐहिक शिक्षणात त्याला मुळीच रस नाही. रामकुमारांचा नाइलाज झाला. त्यांनी गदाईला उपाध्येगिरीचं काम दिलं. लोकांच्या घरी पूजा करण्यात गदाईला खूप आनंद वाटे. मंत्र व विधी यांपैकी त्याला काहीही ठाऊक नव्हतं, पण भक्तिभाव भरपूर होता व देव्हाऱ्याची आरास तो झकास करीत असे. या कामात तीन वर्ष निघून गेली. त्या तीन वर्षांच्या काळात रामकृष्णांच्या महान कार्यासाठी वास्तुनिमितीचं काम चाटू होतं. रामचन्द्र दास नावाचा एक करोडपती होता. तो जातीनं शूद्र होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी समणी संपत्तीची मालकीण झाली. तिचं हृदय विशाल होतं, हात सढळ होता म्हणून तिला “राणी” म्हणत असत. ४४ व्या वर्षी विधवा झालेल्या राणीनं तीर्थयात्रा करायचं ठरवलं. बनारसला काली मॉ तिच्या स्वप्नात आली. 'मंदिर बांध. त्यात माझी प्राणप्रतिष्ठा कर व दररोज नैवेद्य अर्पण कर.” असा मातेनं राणीला आदेश दिला. उ यात्रा सोडून राणी कलकत्त्यास परतली. कलकत्ता सुप्रीम कोर्टाचे अँटोर्नी हेस्टी यांच्याकडून कलकत्त्याच्या उत्तरेला चार मैलांवर १८४८ मध्ये तिनं वीस एकर जमीन विकत घेतली. राणीचे ज्येष्ठ जावई मथुरामोहन यांनी बांधकामासाठी कंबर कसली. मंदिर, मूर्ती, बाग, घरं, गंगेवर घाट बांधणं या कामास दहा वर्षं लागली. दक्षिणेश्वर नामक सुरम्य परिसर उभा राहिला. पण अवघड प्रश्नही उभा ठाकला. मूर्तीची स्थापना, पूजा-अर्चा व भोग-नेवेद्य कोण करणार? करणार अर्थातच ब्राह्मणवर्गाचे लोक; पण झूद्रांकडे ते काम करायला कुणीही तयार होईना! कालीमातेला जात नसल्यानं ती विटाळणार नाही, पण पुजारी मंडळींना तर जात आहे ना? तो वर्ग बाटगा ठरणार! राणी व मथुराबाबू चितातुर झाले. त्यांनी पंडित रामकुमारला बोलावलं. त्यांनीही काम करण्यास नकार दिला पण एक मोलाचा सल्लाही दिला. ते राणीला म्हणाले, “कुणा ब्राह्मणाला ही वास्तू नावापुरती भेटस्वरूप द्यावी. नाममात्र मालक ब्राह्मण होताच सर्व भटजी पूजा-प्रसादाला तयार होतील.” राणीनं रामकुमारच्याच हातावर उदक सोडायची इच्छा व्यक्त केली. ते राजी झाले. श्री रामकृष्ण परमहंस । १३




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now