त्या सायंकालची गोष्ठ | Tya Sayankalchi Goshta

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Tya Sayankalchi Goshta by

More Information About Author :

सतीश बाबारावजी पावड़े - Sateesh Babaraoji Pavde
Read More About Sateesh Babaraoji Pavde

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कुटुंबातील शशिकांत, त्यांची पत्नी कौशल्या, मुले पूर्वा, अमित हे सदस्य आणि होऊ घातलेले जावई सुनील किर्लोस्कर बसले आहेत. नुकतेच जेवण आटोपले आहे. शशिकांत इतरांना रेड वाईन सर्व्ह करीत आहेत. आधुनिक पार्श्वसंगीताचे सूर ऐकू येत आहेत. मधे-मधे मेघ गर्जना, वादळाचा आवाज, वीज कडाडण्याचा आवाजही ऐकू येत आहे.) शशिकांत :- ब्वाव ऽऽ ! मनसोक्त जेवण झाल्यावर रेड वाईन. गुड ! सुनील, तुमच्या पिताश्रींचेही या वाईनवर फारच प्रेम आहे, बरं का! सुनील :- तात्पर्य ! ही अगदी उत्तमच असेल. माझे पप्पा यात अगदी तज्ञ आहेत अंकल, पण मी या बाबतीत जरा 'ढ' च आहे. माझे प्रगती पुस्तक अद्याप तरी एवढे रंगलेले नाही. कौशल्या :- अहो, काय हो, दारू हा काही इतक्या महत्त्वाच्या चर्चेचा विषय आहे का? इतकं सांग्रसंगीत जेवण झाल्यावर, ही दारूचर्चा आणि ते ही या म्हातारवयात! शशिकांत : हे बघ, सुनील काही म्हातारा नाही. अन् मी सुद्धा अद्याप तरूणच आहे, बरं का ! हो आता राहिला प्रश्न दारू... अर्थात मदिरेचा तर ती चीरयौवना आहे. ही मदिराक्षी कुणालाच म्हातारी होऊ देत नाही मॅडम. कौशल्यादेवी, माझा आपणास असा सल्ला आहे की, थोडी मदिरा आपणही प्राशन करायला हरकत नाही. पूर्वा :- होय मम्मा ! घे ना थोडीशी, काय हरकत आहे. अग चक्क पप्पा म्हणताहेत ना ! आणि ते ही ऐतिहासिक नाटकाच्या भाषेत. कौशल्या :- मी काही न घेण्याची शपथ वगैरे घेतलेली नाही, म्हटलं. तुमच्या पप्पांनाच मदिराबाईंची जरा अधिक गरज आहे आणि आवडही. मी कशाला तिची सवत होऊ बाई ? सर्व : हे ऽऽ, टॅट इज दी स्पिरीट !! (इतर सर्वजण पेले उंचावत चिअर्स करतात. संगीत लहरी वाढतात. सोबतच विजांचा आवाजही) शशिकांत : व्वा, व्वा क्या बात है ! मजा आला. जेवण, रेड वाईन, अंग अंग हलविणारं हे संगीत. कौशल्या चल एक डान्स होऊन जाऊ दे. सेलिब्रेशनची मजा आणखीच वाढेल. कौशल्या : जाऊ द्या हो. त्याची आवश्यकता आहे काय? आणि ते ही सुनील समोर ? शशिकांत : ओ ऽऽ, कम ऑन, आता सुनील आपल्या कुटुंबातलाच एक सदस्य झाला आहे. ही इज अवर फॅमली मेंबर नाऊ, युनो? त्याला कशाला वाईट वाटेल. कम ऑन ऽऽ (ते दोघेही पार्टी डान्स करतात.) सुनील : व्वाव, गुड, एक्सलंट !!! (सर्वजण टाळ्या वाजवतात) पूर्वा : सुनील, तुझ्या होणाऱ्या या सासुबाईंचा हा डान्स बघून तुला वाईट वाटलं का? आणि समजा वाटलं नसेल तर ते, तू इथं कबूल करू शकशील? ऐ.. बोल ना ! एवढं डेअरींग आहे तुझ्यात ? सुनील :- नॉट एटॉल. ऑफ्टर ऑल आय एम हर सन इन लॉ. सो आय एम अ फॅमिली मेंबर. सो हाऊ कॅन आय डेअर? नाही रे बाबा ! (दोघंही हसतात) एनी वे, पूर्वा कधी कधी मला खूप वाईट वाटतं गं ! मधले काही




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now