अंधार पाहिलेला माणूस | Andhaar Pahilela Manoos

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Andhaar Pahilela Manoos by

More Information About Author :

सतीश बाबारावजी पावड़े - Sateesh Babaraoji Pavde
Read More About Sateesh Babaraoji Pavde

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
अंधार पाहिलेला माणूस ___ लोकसंत गाडगेबाबा अंक पहिला: प्रवेश पहिला (स्थळ: शेंडगांव, झिंगराजी जानोरकरांचे घर. प्रारंभी उजव्या प्रकाश झोतात, भारूड गायन. मधल्या झोतात झिंगराजीच्या मृत्यूचे दृश्य. डावीकडे लाला हरदयालचे दृश्य, पडदा उघडण्यापूर्वी भारूड सुरू होते. हळू हळू पडदा दूर होतो. भारूडाचे दृश्य नजरेत येते.) भारूडकरी: रोडगा वाहीन तुला भवानी आई, रोडगा वाहीन तुला ।। लेकरू होऊ दे हिला भवानी आई, रोडगा वाहीन तुला ।। (भारूडाचे पूर्ण सादरीकरण झाल्यावर भारूड संपते. उजव्या कोपऱ्यातील प्रकाश मावळतो. मधली जागा प्रकाशमान होते. झिंगराजी झोपलेला आहे. सखुबाई जवळ बसली आहे. झिंगराजीला खोकल्याची उबळ येते. सखुबाई झिंगराजीला सावरते. पदराने त्याचे तोंड पुसते.) सखुबाईः लय तरास होते का जी? काय हाल करून घेतला माय ! थांबा.... जरासा काढा आणून देऊ काय? बरं वाटन तुम्हाले. झिंगराजी:राहु देवं माय माजे, आता काढ्याचा काई उपेग नाई. सखु, आवं आता वाचत नाई म्या. माहे दिवस भरले हाये. (पुन्हा खोकल्याची उबळ येते. सखुबाई पुन्हा साबरते.) देवाले नवस करीन, उपास-तापास करीन, कंदुरी करीन बाप्पा. पन तुम्हाले काई होऊ देनार नाई म्या. झिंगराजी:माय, मायं मरन दिसते ना मले डोयानं. दारूनं मायी जिनगानी नासोली, आतोडे सडून गेले माये. जिवाले घर घर लागली हाये. पर मले डेव्याची लई फिकर वाटते... तुई फिकर वाटते. सखुबाई: कायजी करू नोका. मायी पुन्याई हाये. कधी कोनाले दुखोलं नाई, का कोनाचं नुसकान केलं नाई आपुन. तुमी त् साऱ्यायचंच भलं केलं. लोकायसाठी घर दार गहान टाकलं, त्याईच्यासाठी जीव धोक्यात घातला. देवाले हे काय समजत नाई काजी?




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now