पुराणातलीवांगी विज्ञान विकासाची | PURANATEEL VANGI VIGYAN VIKASASATHI

PURANATEEL VANGI VIGYAN VIKASASATHI  by जयंत नारलीकर - JAYANT NARLIKARपुस्तक समूह - Pustak Samuh

More Information About Authors :

जयंत नारलीकर - JAYANT NARLIKAR

No Information available about जयंत नारलीकर - JAYANT NARLIKAR

Add Infomation AboutJAYANT NARLIKAR

पुस्तक समूह - Pustak Samuh

No Information available about पुस्तक समूह - Pustak Samuh

Add Infomation AboutPustak Samuh

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पूंजवादातले काही प्रयोग व त्यांची गणिती कारणमीमांसा यांचं अस्तित्व पुरातन लेखनात दिसून आलं तर तो वैज्ञानिक शिस्तीत बसलेला पुरावा मानता येईल. पण अद्याप तसा पुरावा मिळालेला नाही. वरील उदाहरणांतून असं दिसतं, की आपल्या पुरातन वाडूमयातून काही कल्पनारम्य गोष्टींच्या पलीकडं वैज्ञानिक शिस्तीत बसणारी माहिती अद्याप पुढं आलेली नाही. आवश्यक पुरावा उपलब्ध नसल्यानं पूर्वी आपल्याकडे अतिप्रगत तंत्रज्ञान होतं, या विधानाला धक्का पोचतो. सामान्यपणानं असं मानलं जातं, की खेड्याखेड्यांतून विजेची उपलब्धता आणि नळाद्वारं मिळणारं पाणी या न्यूनतम सोयी पुरवल्या पाहिजेत. शासनाचा (मग ते कुठल्याही पक्षाचे असो) प्रयत्न हे उद्दिष्ट गाठण्याचा असतो. ह्या पार्श्वभूमीवर महाभारत हा ग्रंथ तपासून पाहा. भारत पादाक्रांत करणाऱ्या हस्तिनापूरच्या राजांच्या राजवाड्यात विजेवर चालणारे दिवे व आंघोळीसाठी खेळत्या पाण्याचं स्नानगृह होतं का? भौतिकशास्त्रात प्रगती करताना माणसाला अधिकाधिक सूृक्ष्माची माहिती मिळत गेली. सुरुवात गुरुत्वाकर्षणापासून झाली व क्रमशः विद्युतचुंबकीय शास्त्र, अणू आणि अणुगर्भाचं ज्ञान व त्यापलीकडं सृक्ष्मातिसूक्ष्म कण यांची माहिती मिळत गेली. पण आपल्या पौराणिक वाड्मयात विद्युतचुंबकीय शास्त्राचा उल्लेख नाही. त्या शाख्राच्या माहिती शिवाय अणूच्या गर्भाचं ज्ञान कसं मिळालं ? ब्रह्मास््र हे जर अणुबाँबचं रूप असेल तर अणुबाँब बनवणाऱ्यांनी विद्युतचुंबकीय शास्र संपादित केल्याचा उल्लेख महाभारत वा इतर पुराणात का नाही? या सर्व आक्षेपांवर पूर्वी भारतात अतिप्रगत तंत्रज्ञान नांदत होते, असा दावा करणारे म्हणतात, की पूर्वीच्या क्रषिमुनींना सिद्धी अवगत होत्या, ज्यांच्या बळावर ते तंत्रज्ञानाच्या भराऱ्या मारू शकत. धडपडत का होईना, पण पुढं जाणारं विज्ञान आणि त्यावर आधारलेलं तंत्रज्ञान यांची ही वाट नाही. ती क्रषिमुनींची वाट नेमकी कशी होती, हे सप्रयोग दाखवण्याची जबाबदारी वरील दावा करणाऱ्यांची नव्हे का? या संदर्भात एक सावधगिरी आवश्यक आहे. पुरातन माहितीचा अर्थ लावताना आणि ती वैज्ञानिक चौकटीत बसवताना संस्कृत भाषेचा लवचिकपणा नडतो. जी भाषा कालिदास, भारवि, दंडी आणि माघ यांचे साहित्य फुलवून श्रे शैक्षणिक संदर्भ अंक - ११२




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now