बाळकवीची समग्र कविता | Baalakaviichii Samagra Kavitaa
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
17 MB
Total Pages :
266
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about भा. ळ. पाटणकर- Bha. L. Patanakar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)र
कु. मालती* व ल्लेही श्री. पारनाईक यांची भाची मधुरा या लहान मुलींच्या कानांत ते
निवडुंगाच्या फुलांची कर्णभूषणें करून घालीत. या विषयीची आठवण त्यांची भाची
कु. मालती यांच्याच शब्दांत देणें योग्य होईल. “ आम्हीं राहत होतों त्याच
वाड्यांत मथू नांवाची लहान मुलगी राहत असे, आम्ही फिरावयास निघालों म्हणजे
तीही आमच्याबरोबर येत असे. आम्ही दोघी समवयस्क्र त्यामुळें आमची दोघींची
चांगली गट्टी जमली होती. नगर सारख्या रुक्ष ठिकाणींही त्यांच्या कविह्वदयानें कांहीं
रम्य विश्रांतिस्थानं निवडलीं होतीं. तेथेंच बहुधा आम्ही जात असूं. मथू दिसायला
गोड मुलगी होती. तिचे तपकिरी डोळे, ग्रुलाबी गाल, भुरे केस सर्वच कांहीं मोहक
होते ! तिचें बालरूप सजवायला मामांनीं तेथं बसल्या बसल्या निवडुंगाच्या फुलां-
मघील नाजूक फिक्या गुलाबी रंगाच्या तंतूंची अशीं कर्णभूषणे तयार करावींत
कीं राण्यांची हिऱ्या मोत्यांची कुंडलें त्यापुढें निस्तेज पडलीं असतीं. सामान्य दृष्टीला
जेथे निवडुंगाचें उपेक्षणीय कांटेरी कुंपण दिसलें असतें तेथंच कविनेत्रांना सुंदर
फुलें व अलंकार दिसलीं. ” सौ. मालतीबाईंच्या या आठवणीचें शेवटचें वाक्य खंर
नाहीं असें कोण म्हणेल! ! कांटेरी निवडुंगाच्या फुलांची सुंदर कर्णभूषणें करणाऱ्या
या कवीनें रानोमाळ पसरलेल्या गवताच्या फुलांतील एका कलिकेला फुलराणी वनवून
काव्यसृष्टींत स्वत:बरोबरच अजरामर करून ठेवलें नाहीं काय १
रंगीबेरंगी व॒ सुवासिक पुष्पांप्रमाणेच झुळझुळ वाहणारे निझैर यांची आवड
बालकवींना लहानपणापासूनच होती. एरंडोलास शाळेंत शिकत असतांना, गांवा-
बाहेरच्या ओढ्याच्या बंधाऱ्यावर, नाहींतर वाळूंत, ओढथाची मजा पाहत ते तासच्या
तास पडून राहत. त्या ओढयाच्या कांठीं बसून त्यांनीं सूर्यास्ताचे सुंदर दृश्य अनेक-
वेळां पाहिलें होतें. रात्रीच्या वेळीं लपत छपत येणाऱ्या तारकाही बालक्रवींशीं येथेंच
गुजगोष्टी करूं लागल्या. तसेंच बहिणीसाठी फुलें गोळा करतांना अरुणाचें दशन झालें.
वडेसूवर्थच्या ल्युसी प्रमाणें या निसगांच्या कवीचें, बालकवीचें, खरें शिक्षण निसगी-
नेंच केलें. झुळझुळ वाहणाऱ्या निझरानें क्रिंवा कुहु कुहु करणाऱ्या कोकिलेनें त्याला
आपलें नादमाधुर्य बहाल केलें असावें.
मराठी शिक्षण संपल्यावर बालकवि आपल्या थोरल्या बंधूबरोबर धुळ्यास इंग्रजी
शिक्षणासाठीं जाऊन राहिले. तेव्हां चुकताच वंगभंग झाला होता. कर्सनशाही जोरांत
१ अहमदनगरचे सुप्रसिद्ध वकील व कार्यकते नानासाहेब सर््तपि यांच्या सुविद्य
पत्नी सौ. सुशिलाबाई.
User Reviews
No Reviews | Add Yours...