वादळी वारे | Vaadalii Vaare

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Vaadalii Vaare  by केशव केळकर - Keshav Kelkar

More Information About Author :

No Information available about केशव केळकर - Keshav Kelkar

Add Infomation AboutKeshav Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
२ वादळी वारे खाण्याऐवजी त्यांचें बीं पेरून हुकमी धान्य मिळवून मानवाची आद्यतम चिंता जी क्षुधा ती ज्यानें दूर केली, लिपीचा शोध लावून वाढ्ययाला स्खलनदील अशा मानवी स्मृतीच्या संदुकेंतून सोडवून अभंग अशा शिलालेखाचें चिरंजीवित्व ज्यानें मिळवून दिलें, ते सवे प्राचीन काळचे क्रहषिवये महान्‌ अव्वल दर्जाचे शोधक होत. त्यांच्या शोधांनींच एरवी दुबल असा हा साडेतीनहाती मानवप्राणी आपल्यापेक्षां शतपटींनीं सामथ्यंवान्‌ अशा इतर अनेक प्राण्यांना पुरून तर उरलाच, पण इतर प्राण्यांप्रमाणे शतकानुशतके एकाच एक स्थिरावस्थेंत रखडत न पडतां शास्त्र, कला, वाड्यय, नीतिनियम यांनी सम्‌द्ध असा संस्कृतिप्रासाद त्यानें उठविला. काव्यसष्टीवर मात या प्रासादांतील भौतिक सुखसो[थीमध्यें तर गेल्या हॉपन्नास वषीत जितकी विलक्षण भर पडली आहे, तितकी पूर्वी केव्हाच पडली नसावी. भौतिक सुखसोयींची मख्य गुर्सकिली म्हणजे सृष्टीवरील स्वामित्व. सृष्टीच्या जामदार- खान्यांत ऐश्वर्य नुसतें लोळत पडलें आहे; तिला नेत्रकटाक्षावर नाचविण्याची मोहिनी मात्र पाहिजे; मग तिच्या स्वामीच्या ऐश्वयांला सामा नाहीं. आणि हॅ अमर्याद ऐश्वय खास प्राप्त होईल अशी आशा वाटूं लागण्याइतकें सृष्टीचे रहस्य दिवसेंदिवस उकल्‌ंंहि लागलें आहे. एकापेक्षा एक क्रांतिकारक अशा लागत चाललेल्या शोधांच्या परंपरेने द्याख्राच्या महत्त्वाकांक्षेची झेप आतां एवढी वाढली आहे कीं, यष्टीचें अमुक रहस्य वा कोडें आपल्या बुद्धीस उकलणार नाही, किंवा कल्पनेला सुचलेल्या अमुक घटना आपल्या कर्तबगारीस व्यवहारांत उतरून दाखवितां येणार नाहीत असें त्याच्या स्वप्नीहि येत नाहीसं होत चालले आहे, आणि यावें तरी कां १ त्याच्या शाखत्राय बुद्धीला आणि अजख उद्योगाला यशच तसे अचाट आलेलें आहे, शतकानुशतके ज्या गोष्टी केवळ कविकल्पनेच्या विलासाचा विषय होऊन राहिल्या होत्या त्या आतां त्याने प्रत्यक्ष आपल्या सेवेस हजर केल्या आहेत. आकाशाच्या अमयाद विस्तारांत स्वच्छंदपणें विहार करणाऱ्या पक्ष्यांकडे, आणि दर्यांच्या अथांग डोहांत सुखेनैव योगनिद्रा घेत पहुडणाऱ्या जलचरांकडे मानव हा शतकानुशतके केवळ आशाळभूतपणें पाहत बसला होता. पण आतां पक्षिराज गरुंडालाहि हेवा वाटावा अशा विलक्षण




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now