कथाई | Kathaaii
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
9 MB
Total Pages :
154
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)कथाहदे
यत्न केला. त्या श्वियांचे अश्रु मनूच्या अश्रूंच्याच जातींतले ! मनूच्या स्मृतीने
जरा धार आला. मनूचीं ओघळणारीं आसवे तळहातांत घेऊन त्यांत माझे
प्रतिर्थिंब पाहतांच बरें वाटलें. गजाआड अडकलेल्या गफारखानांपासून लपून
राहायचं असेल तर अश्रूंचे ते बुडबुडेच योग्य होते.
अंमळशानें अधिक धीर आला. लाजहि कमी झाली व समथन सुचले. जें
मीं पाहिलें नाहीं तें काय कागदावर आणं १ देशाची फाळणी झाली हा माझा
दोष नाहीं. मी फाळणीच्या हत्याकांडांत हात चोळीत राहिलों हा माझा
उणेपणा नाहीं. खेरीज ह्या विषयावरच मीं लिहावं, मीच लिहावं, हा कां
अट्टाहास १---ओढून ताणून, आव आणून व ढोंग सजवून खोटं लिहिण्यापेक्षां
न लिहिणं श्रेयस्कर नव्हे काय १--पळवलेल्या असंख्य अनाभिवांपेक्षां गांजलेल्या
शेजारणीची कहाणी काय कमी हृदयंवेधी आहे १ मनूच्या दुःखानें साऱ्या
दलित ख्तरीजातीचं दुःख मी पुढें मांडीन ! मनूचं दुःख तसं सवैस्पशींच आहे.
किंवा जगावेगळंहि असेल. म्हणून काय झालं १ मला तेंच रंगवायचं आहे.
मला मनू रंगवायची आहे. त्या चित्रांत माझ्या साक्षात्काराचे ठसे काढायचे
आहेत. कंप पावणारं माझ हृदय मला उघर्ड करायचं आहे.
.. माझ्या समाधानासाठी, माझ्यांतल्या कलावंतासाठी मला प्रामाणिक
राहायला पाहिजे; अनुभूतीला उजळा द्यायला पाहिजे. लिहिलंच पाहिजे.
लिहिणं अपरिहाय आहे !... _
माझ्या नसा परत उसळल्या व मीं पेन उघडलं. वेयक्तिक सुखदुःखांत सारा
विश्वाचा पसारा दिसत होता. त्यांत मला हिंडायचं होतं व जीविताचा आज
जाणवलेला लचका उचलून आणायचा होता. कथानकाचा मधघां तुटलेला धागा
शोधूं लागलों. मनूची कहाणी आठवीत डावा तळहात डाव्या कपाळीं टेकला.
जणू त्या दिशेला असलेलं पाकिस्तान पुन्हां दृष्टीपुढे यायला नक्रो | नसत्या
आठवणी नकोत म्हणून जरा उजव्या बाजूला झुकलों व मनूच्या नवऱ्यानें
आपल्या मुलाला जेव्हां...
परत मन थांबलं. डोळे कागदावरून, टेबलावरून, आकाशाकडे चालूं लागले.
पण खिडकीला अकस्मात कांचा चिकटल्या व त्या बंद कांचांवर हारे अडख-
ळली. कांचेच्या पलीकडे चपट्या नाकांचीं, बारीक डोळ्यांची, सपाट केस
कांपलेलीं, गोल चेहऱ्यांची असंख्य मुलें दाटीवाटीनें उभी होतीं !
User Reviews
No Reviews | Add Yours...