कथाई कथा संग्रह | Kathaaii Kathaa Sangrah

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कथाई कथा संग्रह  - Kathaaii Kathaa Sangrah

More Information About Author :

No Information available about अरविन्द गोखले - Arvind Gokhale

Add Infomation AboutArvind Gokhale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कथा यत्न केला. त्या ब्रियांचे अश्रु मनूच्या अश्रूंच्याच जातींतले | मनूच्या स्मृतीने जरा थार आला. मनूचीं ओघळणारीं आसवं तळहातांत घेऊन त्यांत माझं प्रतिथिंब पाहतांच बरें वाटलें. गजाआड अडकलेल्या गफारखानांपासून लपून राहायचं असेल तर अश्रूंचे ते बुडबुडेच योग्य होते. अंमळशानें अधिक धीर आला. लाजहि कमी झाली व समथन सुचले. जें मीं पाहिले नाहीं तें काय कागदावर आणू १ देशाची फाळणी झाली हा माझा दोष नाहीं. मी फाळगींच्या हत्याक्रांटांत हात चोळीत राहिलों हा माझा उणेपणा नाहीं. खेरीज ह्या विषयावरच मीं लिहावं, मींच लिहावं, हा कां अट्टाहास १---ओढून ताणून, आव आणून व ढोंग सजवून खोटं लिहिण्यापेक्षा न लिहिणे श्रेयस्कर नव्हे काय १--पळवलेल्या असंख्य अनाभिकांपेक्षां गांजलेल्या शेजारणींची कहाणी काय कमी हृदयंवेधी आहे १ मनूच्या दुःखाने साऱ्या दलित स्त्रीजातीचं दुःख मी पुढें मांडीन ! मनूचं दुःख तसं सवस्प्शांच आहे. किंवा जगावेगळंहि अक्ल, म्हणून काय झालं १ मला तेंच रंगवायचं आहे. मला मनू रंगवायची आहे. त्या चित्रांत माझ्या साक्षात्काराचे ठसे काढायचे आहेत. कंप पावणारं माझ हृदय मला उघर्ड करायचं आहे. ...माझ्या समाधानासाठी, माझ्यांतल्या कळावंतासाठीं मला प्रामाणिक राहायला पाहिजे; अनुभूतीला उजळा द्यायला पाहिजे. लिहिलंच पाहिजे. लिहिणं अपारिहाये आहे !... र दी माझ्या नसा परत उसळल्या व मी पेन उघडलं. वयक्तिक सुखदुःखांत सारा विश्वाचा पसारा दिसत होता. त्यांत मला हिंडायचं होतं व जीविताचा आज जाणवलेला लचका उचलून आणायचा होता. कथानकाचा मधघां तुटलेला धागा शोधूं लागलों. मनूची कहाणी आठवीत डावा तळहात डाव्या कपाळीं टेकला. जणू त्या दिशेला असलेलं पाकिस्तान पुन्हां दृष्टीपुढे यायला नको ! नसत्या आठवणी नकोत म्हणून जरा उजव्या बाजूला झुकलो व मनूच्या नवऱ्याने आपल्या मुलाला जेव्हां... परत मन थांबलं. डोळे कागदावरून, टेबलावरून, आकाशाकडे चाळू लागले. पण खिडकीला अकस्मात कांचा चिकटल्या व त्या बंद कांचांवर टष्टि अडख- ळळी. कांचेच्या पलीकडे चपट्या नाकांचीं, बारीक डोळ्यांचीं, सपाट केस कापलेली, गोल चेहऱ्यांची असंख्य मुलें दाटीवार्ीनें उभीं होतीं !




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now