सावरकर साहित्य भाग ४ | Saavarakar Saahitya Bhaag 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saavarakar Saahitya Bhaag 4 by बं. सावरकर - Bn. Savarkar

More Information About Author :

No Information available about बं. सावरकर - Bn. Savarkar

Add Infomation About. Bn. Savarkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
सावरकर-स हित्य ७ पाणी लाटतांना माळरहाटगाडग्यावर बसत्या अडत्या कावळ्याचा विटाळ नाहीं, माणसांचा विटाळ; कोऱ्या कपड्यांना विटाळ नाहीं, धुवटांना विटाळ; तेल खायचें, तूप नाहीं; गोमूत्र प्यायचें, गोदुग्ध नाहीं; अपरण्याची फेट्यासारखी टापशी बांधायची, फेटा व पागोटे घालणें नाहीं; कोरड्या भुऔवर सेपाकधरांत पाय पडला तरी विटाळ नाहीं, ओल्या भुऔवर पाय पडतां कामा नाहीं;- असे पोथींतले नी पोथीबाहेरचे अनुकाकूंना रूढि म्हणून सासर माहेरीं प।ठ असलेले धमशास्त्राचे असंख्य नियम पावलोपावलीं मोडतांना नी पाळतांना बिचाऱ्या लहानग्या भिकीला जीव नकोसा झाला ! तिला सुतक नव्हतें तरी काळूला होतें ! काळू हा अंक अुपजत सुधारक होता. सहजगत्या हंसत हसत भिकीला थापटी मारून जाऔ- काकची दृष्टि चुकवून ! पण दिवसांतून चारपांच वेळां तरी काकच्या दृष्टीस भिकी सुतकाच्या विटाळलेल्या पदार्थांना वा सुतकी काळू भिकीला गमतीनें शिवतांना दिसेच, कीं अनुकाक्‌ंच्या शिव्याश्यापांच्या वर्षावांत बिचाऱ्या भिकीला पहिल्यानें तापाद लागून मग थंड पाण्यांत सचैल आंघोळून कुडकुडावें लागे ! ते दिवस कडाक्याच्या थंडीचे ! पण अनुकाकच्या सुतकशास्त्राचें विधान स्पष्ट होतें. थंड पाण्याच्या स्नानानेंच काय तो विटाळ जाअू हाकतो- अष्ण पाण्यानें नाहीं ! भिकी अवघी बारा वर्षांची द्याळ- करी पोर ! ती संपाक ती काय करणार, मोठीं भांडी काय अचलणार, सोंवळधांतलें पाणी तें काय भरणार ? पण कच्चेंपक्कें कांहींतरी शिजवून त्या कृटुंब,चा संसार तिलाच चालवावा लागला. काळूची मात्र चैन होती. अनुकाक्‌ंना तो भंडावून सोडी. गाद्यांच्या ढिगावर मघां काळू चढला होता; अनुकाकूंनीं शास्त्रार्थ सांगितला कीं, * भिके, गाद्या कांहीं घूत नसतात, त्यावर गोमूत्र शिपडलें कीं झालें; पण त्यांच्यांतल्या चादरी तेवढ्या धुवायला काढ. * काळूचें मत कीं, थुवायच्या तर गाद्याहि धू, नाहींतर चादरीवरहि गोमूत्र




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now