डॉक्टर शरच्चंद्र | Doctor Sharachchandra
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
11 MB
Total Pages :
160
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about नरहर ळक्ष्मण आठवळे - Narhar Lakshman Aathvale
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)(३)
बाबतींत तरी वडंस्वर्थ, शेली, कीट्स पासून सुरुवात करून टेनिसन,
ब्राउनिंग पर्यंत आम्ही जी मजल मारली तेदढीच; त्यानंतरच्या इंग्रजी
काव्याच्या गाढ अध्ययनाच्या छटा भामच्या कविजनांच्या काव्योद्गारां-
मध्ये कितपत उमटलेल्या आढळतील याची शंकाच आहे.
वर उल्लेखिलेल्या त्रिदोषामृळे इंग्रजी वाडमयाच्या भांडारांतील
जीं रत्ने आजवर आम्हांस पारखींच राहून गेलीं त्यापैकी स्टीव्हनसन हें
एक होय इंग्लंडांत जो ग्रंथकार अतोनात लोकत्रिय होऊन जावा त्याची
आम्हांस इकडे पुष्कळ वेळां दादही नसावयाची. अलीकडील दहा वर्षांत ही
स्थिति थोडीबहुत पालटून समकालीन इंग्रजी वाडमयाकडे व विचार-
प्रवाहांकडे आमचें लक्ष लागं लागलें आहे. परंतु पूर्वी बहुतांशीं बेदाद
कारभारच चालू होता. स्टीव्हनसनच्या वाड्मयाचा ठसा आमच्या मनावर
न उठण्याची कारणें फारशीं गूढ नाहीत. तीं वर उल्लेखिलेल्या परिस्थि-
तींतच सापडतात. आमच्या मनोव्यापारांचें क्षेत्र संकुचित, आमची दृष्टि
अपुरी व एकदेक्षी असल्याचें दिग्दर्शक जर कांही असेल, तर स्टीव्हन-
सनसारख्या ग्रंथकारांच्या कृतींकडे आपलें लक्ष आक्ृष्ट होत नाही हें होय.
इंग्रजींत ज्याला “रोमान्स' म्हणतात ती भाव व ती वृत्ति आपणाला
पारखी आहे. वास्तववाद किवा 1३68)18700 हा आपण समजू शकतों
व वाडमयांत आणू शकतों; 1068115170 उफ ध्येयवाद, किवा
3911001137) उफं प्रतीकवाद, अथवा 0४ ४301015101 उर्फ गूढवाद
हेही आपल्याला अपरिचित नाहीत. परंतु इंग्रजी मनाला विद्लेष लोभ-
विणारा ' रोमान्स ' उर्फ 'भद्भृतवाद* आपणाला नीटसा ग्रहण करतां
येत नाही, असेंच अनेक उदाहरणांवरून म्हणावेंसें वाटतें. रोमान्स उफ
अद्भतरम्यता पूर्वी आामच्याकडे नव्हती असें नाही. बाणाची कादंबरो हें
प्रणयमिश्रित रोमान्सचेंच एक उदाहरण होय. परंतु अलोकडे आपल्या
समाजाच्या मनोवृत्तीला रोमान्स रुचत नाही, पटत नाही, किवा तो
जाणून घेण्याची फारशी इच्छाही दिसत नाही, त्या शब्दाच्या अर्थाचा
देखील विपर्यास होऊन रोमान्स म्हणजे प्रणय किंवा शृंगार असा अरं
मराठींत रूढ होऊं लागला आहे, इतकी आपली अनास्था व अनभिज्ञता
या प्रकरणीं दिसून येते.
User Reviews
No Reviews | Add Yours...