विद्युत् - प्रकाश | Vidyut~ Prakaash

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : विद्युत् - प्रकाश - Vidyut~ Prakaash

More Information About Author :

No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar

Add Infomation About. . Vi. S. Khaandekar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
विद्युत्‌-प्रकाश ११ लगेच मी एल. सी. पी. एस्‌. ला जायचे कबूल केलें. पण या पोरीने काय केलें, आहे ठाऊक ? दवाखान्यांत माणसाच्या सांगाड्याचं चित्र असते ना! त्याच्याकडे बोट दाखवून ती म्हणाली, “दादा, डॉक्टर व्हायचं म्हणजे असलीं चित्र बधत बसायच ! व्यपिक्षां दुसरीं सुंदर सुंदर चिरे काढणे बरे नाहीं का ११ काय उत्तर द्यायच या प्रश्नाला! बाकी तिचा हात तसा छान आहे म्हणा! मासिकांत *विद्यत्‌* या सहीने तिचीं चित्र येतात मधून मधून. पण चित्रांतसुद्धां या अलीकडल्या मुलांचे वेड आहेच ! त्यांत काढतात काय १ एक ऐटबाज तरुण नाहीं तर नाजुक नार ! किती वेळां मीं विद्युत्छा सांगि- तलें- मल्लांची चित्रे काढ; भीम, बलभीम रंगीव; झांशीची लक्ष्मीबाई अगर चांदबिबी-छे:, नुसती हसते ती! नाना, तूं कांहीं म्हण; पण तरुण पिढीच्या अंगीं कांहीं आपली रग नाहीं ! ते गणेशोत्सवांतले मेळे, तीं पदे, त्या परदेशी कापडाच्या होळ्या, तीं काळ-केसरींतल्या लेखांची पारायणे, कांहीं म्हटल्या कांहीं नाहीं या तरुणांपाशीं ! हे रडक्या कविता म्हणतील आणि नटवे पोषाख करतील. एवढा मजकूर वाचून होतांच पत्रावर कराचीचा छाप आहे कीं ठाण्याचा आहे हें तूं पाहशील अशी माझी खात्री आहे. पंचवीस वर्षांनंतर पत्र लिहायला बसलों काय आणि एखाद्या रोग्याप्रमाणे आपल्या हकीगतीची पोथी सोडली काय १ एका दृष्टीने मी रोगीच आहे म्हणेनास ! विद्युत्‌वर माझा सारा जीव ! पण ती आपल्याच नादांत गुंग असंते. वर्षांकांठीं महिनाभर सुटींत आली तरी समुद्रावर फिरायलाच जा, विमानाचं- जाऊं दे चित्रकलेच्या शिक्षणाकरितां म्हणून मुंबईत काढलीं आहेत्‌ तिनं पांच वर्ष ! एखादा खिश्चन नाहीं तर मुसलमान नवरा शोधून काढला नाहींन्‌ म्हणजे मिळविली. * आतां भिऊ नकोस ! हरिदासाची कथा मूळपदावर आली हं! एक दोन महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रांत मुंबईच्या डॉ. प्रकाशकुमार प्रभूंनी घोड्यावरून पडलेल्या कुणा तरी संस्थानिकाचं मोडलेले हाड फार चांगले बसविल्याचे वाचले होते. त्या वेळीं वाटले कीं, बंगात्यांतही प्रभु हे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now