स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रन्थ २ | Swaamii Vivekaanand Yaanche Samagr Granth २

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Swaamii Vivekaanand Yaanche Samagr Granth २  by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
[३] 'मिळतें ही गोष्ट खरी, पण या भावनेमुळें परावलंबित्व येऊन खऱ्या धार्मिक- बुद्धीस कीड लागण्याचा संभव असतो हेंही खरें आहे. प्रथम परावलंबित्व, मग परावलंबित्वापासून मेकडपणा आणि मेकडपणापासून भोळसटपणा अशी परंपरा एकदां उत्पन्न झाली, ह्मणजे खऱ्या धार्मिक बुद्धीचा नाश होण्यास उशीर किती १ मनुष्यप्राणी खरोखरच पापी, क्षुद्र व परावलंबी आहे, अशी भावना एकंदर समाजांत पसरून दृढमूल होऊं लागते. आपल्या डोळ्यां- समोर नित्य घडणाऱ्या गोष्टी आणि चमत्कार यांत वस्तुतः कांहींच फरक नसून एकीचें स्वरूप दहय आणि दुसरीचें अद्य असतें, इतकाच काय तो फरक, असें हें शास्र सांगतें. जड इंद्रियांसमोर घडणाऱ्या गोष्टीचें स्वरूप उघडपणे पाहतां येत असल्यामुळें त्यांत चमत्कार वाटत नाहीं; आणि अट्श्य कारणांनीं घडणाऱ्या गोष्टींचें स्वरूप अट्दय असल्यामुळें त्यांचा चमत्कार वाटतो. तुम्ही राजयोगाचा मनःपूर्वक अभ्यास करा ह्मणजे तुमची अंतर्दष्ि उघडून चमत्कार असा या विश्वांत कांहीं पदार्थच नाहीं, अशी तुमची खात्री होईल. जीवात्म्यास पूर्णता व मुक्ति प्राप्त करून देणें हेंच प्राचीन आर्यधर्माचें साध्य आहे. हें साधण्यास त्यांनीं अनेक मार्ग शोधून ठेवले आहेत. या मार्गास योग अशी संज्ञा आहे. सांख्य आणि वेदांत हे केवळ ज्ञानमार्ग असले तरी त्यांतहि कोणत्याना कोणत्या योगांगाचा अंतर्भाव झालेला असतो. पतं- जलीचीं योगसूत्रें हा राजयोगावरील प्रमाणभूत ग्रंथ आहे. केवळ उपप- त्तीच्या बाबतींत दुसऱ्या कित्येक तत्त्ववेत्त्यांचीं मतें पतंजलीशीं तंतोतंत जुळत नाहींत; तथापि अभ्यासमार्गाबद्दल पतंजली चें ह्यणणें सर्वांनीं एक- मतानें मान्य केलें आहे. न्यूयॉर्क येथें असतां तेथील छात्रसमूहापुढे प्रस्तुत ग्रंथकाराने दिलेल्या व्याख्यानांचा समावेश या ग्रंथाच्या पहिल्या भागांत केला असून, दुसऱ्यांत पतंजलीच्या योगसूत्रांचें सार व टीका हीं क्रमशः दिलीं आहेत. होतां होईतों योगशाक्रांतील पारिभाषिक शब्द या विवेचनांत येऊं नयेत अशी खबरदारी घेतली आहे. अगदीं सोप्या भाषेंत, केवळ गोष्टी सांगतां सांगतां, या विषयाचे ज्ञान व्हावें अशी ही योजना आहे. योगाभ्यास करूं पाहणारास बर्‍याच उपयुक्त सूचना पहिल्या भागांत केल्या आहेत; तथापि योगाचा अभ्यास प्रत्यक्ष गुरूच्या सान्निध्यांतच क्लाला पाहिजे हें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now