श्रीएकनाथ महाराज यांचे चरित्र | Shrii Ekanaath Mahaaraaja Yaanchen Charitra

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : श्रीएकनाथ महाराज यांचे चरित्र  - Shrii Ekanaath Mahaaraaja Yaanchen Charitra

More Information About Author :

No Information available about बाळकृष्ण सहस्त्रबुद्धे - Baalkrishn Sahastrabuddhe

Add Infomation AboutBaalkrishn Sahastrabuddhe

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२३) वेळीं गुरूने एकनाथाच्या शीप्रग्राहकत्वाची नेहमीं तारीफ करावी. दगड' मांडून लटकी भातुकलींतली पूजा न करितां, मुंज झाल्यावर मोट्या भक्तीनें खर्‍या देवांची पूजा षोडोपचारें एकनाथ करीत असे. वेदाध्ययनाचा किंवा पूजेअर्चेचा कंटाळा कधींच त्याला आला नाहीं. ह्या दोन्ही गोष्टी ह्यानें मोठ्या उल्हासानें व आवडीने कराव्या. कथा किंवा पुराणश्रवण करण्याचीही एकनाथास अल्यंत हौस असे. साधूंचीं रसाळ चरित्रें, ह्यांच्या अद्भुत लीला, योगलाधनाचे निरनिराळे माग, व ब्रह्मज्ञानविषयक वादविवाद, ह्या गोष्टी तो ने- हमीं चित्त लावून ऐकत असे. सभाधीटपणा हा त्याचा एक खाभाविकच गुण असून, रकास- माधानाची त्याला लहानपणापासूनच अतोनात हौस असे. पुराणास गेला ह्मणजे कोणाचा उपमर्द न करितां, श्रोत्यांच्या समुदायांत त्यानें अशी कांहीं सयुक्तिक शंका काढावी कीं, तिचें समाधान क- रण्याची मोठ्या विद्वानांसही पंचाईत पडावी. अल्पवयस्क असून अद्यंत बुद्धिमान्‌ असल्याकारणानें पैठणामध्यें आबालवृद्वांस एक- नाथ प्रिय असे. द्याची अद्वितीय शांतरृत्ति, व त्याची विलक्षण बुद्धि पाहून, शाख्तरीपंहितांनीं आश्चर्य करीत रहावें. केवळ पुराण- श्रवणानेंच त्यास नानाविध कथानके मुखोद्रत असत. त्याची सह- नशीलता इतकी जाएत असे, कीं समवयस्क इष्टमित्रांनीं त्याची कि- तीही थट्टामस्करी केली, किंवा द्याला कितीही त्रास दिला, तथापि एकनाथास राग आलेला कधींच कोणीं पाहिला नाहीं. एकनाथानें आजाची आज्ञा कधींच उद्लंघन केली नाहीं. वृद्ध आजाची व॒ आजीची सेवा करून व्यास संतुष्ट राखण्यांतच तो तत्पर असे. चक्पाणीसही आपल्या वार्थक्यावस्थेत असा सुशील, आज्ञाधारक, व दुद्धिमान्‌ नातू असल्यामुळें, पराकाष्रेचें समाधान बाटे. ज्याच्या त्याच्या सुखानें नातवाच्या ग्रुणांची व बुद्धीची प्रशंसा ऐकून, ह्याताऱ्याच्या अंत:करणांत आनंदाच्या उकळ्या फुटत; व नाथास दृष्ट पडेल या भीतीनें त्यानें वारंवार त्याजवरून मीठमो- हर्‍या ओवाळून टाकाव्या.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now