संगीत सोन्याचा धूर | Sangiit Sonyaachaa Dhuur

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संगीत सोन्याचा धूर  - Sangiit Sonyaachaa Dhuur

More Information About Author :

No Information available about विठ्ठळ नारायण कोठीवाळे - Viththal Narayan Kothivale

Add Infomation AboutViththal Narayan Kothivale

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(४) आवडीलुसार देवांचा बडिवार, वेद-पुराणवर्णित म्हणून सुरू करीत राहातो ! अथवा अवतारीत देवांच्या आवडी-निवडी पाहूनहि पण तो आपल्या सग्रुणोपासनेचें सुकाणू वल्हवीत राहतो ! त्यामुळें बऱ्याच देवा- दिकांचे सोपस्कार अगर कुळाचार त्यांच्या भक्तगणांच्या लहरीवरच चालत असतात ! अथात्‌ त्यांत भक्तीचा ओलावा नसतोच असें मात्र म्हणतां येणार नाहीं ! तथापि त्यांत भक्तीचा उमाळा किंवा जिव्हाळा उतू जात असतो असेहि पण प्रतिपादितां येणार नाहीं ! तर सामान्यतः आपली देशकालपारा्थिति, रीतिरिवाज, सांपत्तिकशिति आणि आपली बोद्धिक उन्नति, ह्या सर्व बाबींचा विचार करूनच मानवी देह सगुणो- पासनेचा म्हणजे मूर्तीपूजेचा सोहळा थाटत असतो ! साहजिकच त्यामुळे स्वतःला आवड असलेल्या सर्व ऐश्वर्योपभोगक वस्तूचे जडजोखड, तो सगुणोपासनेचा आधार घेऊन देवांवर लादू पाहातो ! मग त्यांत मूलभूत देवांच्या संवयी, भक्तांच्या खिसगणतींत देखील येत नाहींत, इतके ते अंधश्रद्धाशील उत्तरोत्तर बनत जातात; आणि त्याचाच परिणाम मूर्ति- पूजेचा अतिरेक आणि सरुणोपासनेचें विडंबन होण्यात फारच होतें ! बसवेश्वरी बाजारबसव्या आणि मणी मछ-मर्दन करणाऱ्या खंडेरायाच्या सुरळ्या, हैं याचें प्रमाण असून, देवांच्या नांवावर वेश््यागारांत हिंदू पोरीबाळींचा भरणा करणें ही निव्वळ धमाची चेष्टा होय ! ! आमच्या हातून जसजसा सगुणोपासनेचा अतिरेक होऊ लागला, तसतसा विधर्मीयांनीं आमच्या देवसाधनांचा हृव्वातस्सा उपभोग घ्यायला सुरवात केलेली आहे ! ज्या शतकांत सधन देवालयांची वाढ झाली, त्या शतका- पासूनच परघर्मीयांनीं आक्रमण करून देवालयांची आपार संपत्ति छटून नेली! किंबहुना याच कारणाकरितां मुसलमानांच्या साऱ्या स्वाऱ्या झाल्या आहेत ! एकटा सोरटी सोौमनाथच काय पण तुळजापूरची भवानी, पंढरीचा विठोबा वगैरे आणखी कितीतरी देव छबाटून, ठिकरीसारखे माळरानावर ते फॅकले गेले आहेत ! सारांश, देव-धम संस्थेकीरतां मानवीप्राणी, कितपत अधो, गतीला पोहचतो आणि कसे रक्ताचे पाट धर्मांच्या नांवाखालीं वाहवीतो, द्द दिसून येईल ! अस्तु ! मुख्य मुद्दा हा कीं, आपल्या *देव-साधनांची धघूळघाण ?' आज सुधा-




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now