कुंज - विकास | Kunj Vikaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कुंज - विकास  - Kunj Vikaas

More Information About Author :

No Information available about आनंदीबाई शिर्के - Aanandibai Shirke

Add Infomation AboutAanandibai Shirke

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
* कुजविकास * पाहाण्यापूर्वी - १ * कुजविकास ? पाहाण्यापूर्वी- प्रस्तुत कथासंग्रहाच्या लेखिका सौ. आनंदीबाई शिरे यांचे पति श्री. शिव- रामराव शिर्के यांचा-माझा प्रथम परिचय ते विद्यार्थिददयंत असतां परस्प. रांच्या लेखनानें होऊन तो उत्तरोत्तर इद्धिंगतच होत गेला. श्री. शिके हे उचच दजाचे लेखक व कवि असून अत्यंत मार्मिक, रसिक व विद्वान्‌ ग्हस्थ आहेत. त्यांनीं आपल्या विद्यार्थिदशेत महाराष्ट्रवाड्मयाची जी सेवा केली ती पुढ सारखी सुरू राहिली असती, तर त्यांच्या हातून महाराष्ट्वाड्ययांत अनेक उत्कृष्ट ग्रंथांची भर पडली असती. पण अनेक आपत्तांमुळें व कार्यबाहुल्यामुळें इच्छा असूनही त्यांच्या हातून लेखनव्यवसाय होत नाही, ही दुंदैवाची गोष्ट होय. श्री. शिक यांना आपला लेखनव्यवसाय सुरू ठेवितां न आला तरी आपल्य पत्नीच्या आवडत्या लघुकथालेखनास त्यांनीं उत्तेजन [दिलें असून त्याचींच फळें *' कथाऊुंज १? व * कुंजाविकास *? हीं पुस्तकें होत. सी. आनंदीबाई व त्यांचा लेखनव्यवसाय यांबद्दलची माहिती श्री. तात्या- साहेब कोल्हटकर व प्रो. वामनराव जोशी यांनीं लिहिलेल्या प्रस्तावनांत दिलीच आहे. सो. आनंदीबाईवर अनेक आपत्ति आल्या तरी तशा प्रतिकूल परिस्थितीसही घैयॉने तोंड देऊन आपल्या कुटुंबांतील माणसांस आनंदी ठेवण्याचा परोपरीने प्रयत्न करून त्यांनीं आपले “ आनंदी * बाई हें नांव सार्थ केलें आहे. त्याप्रमांण संसारांत दुःखीकष्टी झालेल्या हजारे बायकांस ट्यांनीं आपल्या सुंदर लघुकथांनीं आनंदित करून आपलें नांव साथे केले आहे. त्यांचा * कथाकुंज * प्रसिद्ध झाल्यावर अल्पावधींत त्याची प्रथमाश्रतते संपून गेली. बक्षिसाकरितां मागवविलेल्या एकुणपन्नास गोष्टींत “पद्मेला मिळालेल फळ * ही त्यांची गोष्ट सवॉत्कृष्ट ठरून त्यांना बक्षिस मिळाले. आजकालच्या लघुकथालेखनाच्या काळांत सुप्रसिद्ध लघुकथालेखिका म्हणून महाराष्ट्वाड्म- यांत त्यांचें नांव प्रामुख्याने झळकत आहे. त्यांच्या लघुकथांवर वाचकांच्या उड्या पडत असून त्यांच्या लघुकथा घरोघर मोठ्या आवडीनें वाचल्या जात आहेत. यावरून श्री. तात्यासाहेब कोल्हटकरांनी सी. आनंदीबाईबद्दल कथा- कुंजाच्या प्रस्तावनेत जी सदिच्छा प्रगट केली होती, ती सफल होत आहे, असें दिसून येतें.




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now