मधळी भिंत | Madhalii Bhint

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : मधळी भिंत  - Madhalii Bhint

More Information About Author :

No Information available about जनार्दन जगन्नाथ शिन्क्रे - Janardan Jagnnath Shinkre

Add Infomation AboutJanardan Jagnnath Shinkre

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
११ मधली भित गलितगाच्र होऊन तो खोलींत परतला म्हणजे द्याचे पाय आपोआप अंथरुणाकडे वळत. खोलींतल्या काळाखांत अव्यवस्थितपणे पसरलेला तो बिछाना हेच त्याचे विसाव्याचे स्थान, अजूनहि त्याचे धैय खचले नव्हते. जगाविषयी एक प्रकारचा तीव्र तिरस्क्रार मात्र त्याला हळूहळू वाढूं लागला होता. हात धुवून आपल्या पाठीमागें लागलेले दुदव त्याला नि्दैय वाटे. त्या रात्रीं तो कांहीं न खातांच त्या आपल्या ढोलींत शिरला, आदल्या दिवशीं त्याने एक पावाचा तुकडा आणि चणेकुरमुरे एत्रढ्यावर समाधान मानून घेतले होतें. पदरीं एक दमडीसुद्ध) राहिली नव्हती आणि आठ-वारा आण मागून घेण्याजोगा एकादा मित्रहि त्या अफाट शहरांत नव्हता. सबंध दिवसभर एकसारख्या पावसाच्या सरीवर सरी येत होत्या. हवाहि अगदीं थंड पडली होती. रस्त्यावर चिखलाचे पाणी सांचळें होतें. अरुण भिजत कांकडत दादरला गेला होता, अन्‌ नंतर माजगांवपर्यंतहि त्याने एक हेलपाटा घातला होता. तिकडे नोकरी मिळण्याचा संभव असल्याचे त्याला कुणींतरी सुचविले होतें. पण दादरची जागा भरली होती. आणि टाइपरायटिंगचा चांगला सराव नसल्यावरून त्याला माजगांवची नोकरी मिळाली नाहीं. अगदीं शेवटचे असे हे आदोचे दोन धागेसुद्धां त्याच्या दुदवाने तोडून टाकले होते. कसलीहि नोकरी पत्करण्याची आतां त्याची तयारी होती. त्याहि परिस्थितीतून, संधि सांपडतांच आपण आपला मार्ग काढूं, अशी त्याची खात्री होती. सध्या नुसती अक्नपाण्याची अन्‌ निवाऱ्यासाठीं चार हात जागेची व्यवस्था झाली असती तरी त्यानें त्यांतदेखील समाधान मानलें असतें. एक एक दगड जमवून, अविश्रांतपणे खपून, आपल्या भाग्याचा मनोरा आपण उभवूं असें त्याचें मन त्याला ग्वाही देत होते. माजगांवला कटु अनुभव येतांच पोळलेल्या हृदयानें अन्‌ अत्यंत उदासपणे एकेक पाऊल टाकून खोलीपर्यंतचा रस्ता आक्रमीत असतांना, आपल्या सुखाशांचे उत्तुंग मनोरे धडाधड ढासळून पडत आहेत, असाच त्याला क्षणभर भास झाला,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now