मृणाळिनी | Mrinaalini

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Mrinaalini by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
वप धाव च मृणालिनी मणिमालिनी म्हणाली, “ मग माधवाचायीबरोबर तूं इथं आलीस कशी १” मृणालिनी म्हणाली, “ दासीनं सांगितले कीं राजपुत्र होडीत आहे. होडीः घाटाला लागली आहे. मी घाटावर येऊन पाहिलं तिथं होडी होती. बाहेरच एक पुरूष उभा होता. मला वाटलं तोच हेमचम्द्र. मी होडीजवळ आलें. जवळ येतांच त्या माणसानं माझा हात घरून मला होडीत ओढलं आणि नावाड्यानं होडी घाटावरून सोडून दिली. हाताला हात लागतांच मी ओळखलं होतं कीं, तो हेमचन्द्र नव्हता. एकदां मोठ्यानं ओरडावं असं मला वाटलं होतं, पण: तोंडानं शब्द बाहेर फुटला नाहीं. ” “ पग पुढं काय झालं १? “ सुरवातीलाच त्यांनीं मला * मुली ? म्हणून हांक मारली. ते म्हणाले, “ मला तं. मुलीसारखी आहेस. माझं नांव माधवाचार्य--मी हेमचन्द्राचा गुरू--नुसत्या हेमचनम्द्राचाच नव्हे, तर या भारतवषीतले बरेच राजे मला गुरू मानतात. मी एक महत्कार्य हातीं घेतलं आहे, तें सिद्ध होणं आहे हेम- चम्द्राच्या हातीं, आणि तूं आहिस त्यांतले मुख्य विघ्न. ? मी म्हटलं, * मी विश कशी १? माधवाचार्य म्हणाले, *यवनांचा पराजय करून पुन्हा हिंदूंच्या राज्याची स्थापना करणं म्हणजे कांहीं सोपं काम नाहीं. हेमचन्द्राखेरीज तें काम दुसऱ्या कुणाकरवीं होणार नाहीं. त्याचे सारं लक्ष या कामावर वेघल्याशिवाय हें कार्य पार पडणार नाहीं. तो वुझ्यापार्शी गुंतून राहिला तर यवनांचा नाद कोण करील १ एवढ्यासाठीच तुला हेमचग्द्रापासून दूर राहिलं पाहिजे. यांतच त्याचं कल्याण आहे. तो राजेश्वर झाला तर तूं त्याची राणी होशील--मग हें तुझं कर्तव्य नाहीं का १ शिवाय तूं कबूल केलं नाहींस तरीही, मी जो बेत केला आहि तो मी पार पाडणारच. मी तुला देशांतराला घेऊन जाणार. गौडदेशांत एका सन ब्राह्मणाच्या घरीं मी तुला ठेवून देणार. तुला तो आपली मुलगी समजून तुझा प्रतिपाळ करील. एक वषानंतर मी तुला नेऊन तुझ्या बापाच्या स्वाघीन करीन आणि त्याचवेळी हेमचग्द्रा्शीं तुझं लग्न लावून देईन. ? त्यांच्या या बोलण्यामुळं म्हण कीं परिस्थितीमुळे म्हण, मी उगीच राहिलें, त्यानंतर मी ही इथं येऊन राहिलें. ” कक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now