कुंपणा वरून | Kunpana Varuun
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
2 MB
Total Pages :
47
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about श्रीधर बाळकृष्ण रानडे - Sridhar Baalkrishn Ranade
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)[ सुंदर तलम वस्त्र नेसलेली पाकोळी हातांत
पाळलेला बहिरीससाणा घेऊन घाईघाईने येते. ]
पाकोळी : नेत्रा ! नेत्रा ! अग, अशी जाऊं नकोस ! थांब ग! माझा लाडका
राजस राणा - बहिरीससाणा पाहा तर खरा ! कसा गोजिरवाणा आहे ! -- अईंग ९७ $-!
मेल्या. . . ! चावलास बोटाला ! भूक लागली आहे ग याला, नेत्रा ! चावतोय् | मांस
पाहिजे होय कोवळे लसलुशीत. तर! तर! कसलेही मांस चालेल म्हणतोस १
काडी पैलवानाचें - जरत्कारूचें चालेल -- १ अरे लबाडा | इतकी भूक लागली होय
बचाला ! काय म्हणतोस १ पेंढा भरलेले, गाडगी डोक्याचें बुजगावणें सुद्धा चावून
खाशील ! खादाड कुठला. . .. . .! अय्या ! हें कोण आहे पलीकडे १ झुरळ,
बुजगावणे का जरत्कारू | ससाण्या, जेव पोटभर आतां !
[ काजू कुंपणाजवळ येतो आणि आनंदातिशयाने
ओठाशीं जुळलेली बोटें लावून तिच्याकडे
चुंबन फेकल्याचा आविर्भाव करतो. ]
काजू १ पाकोळी ! पाकोळी ! माझी पाकोळी ! कशी मला विसरलीस तं इतके
दिवस ! “ ... कुंपणावरून, उट्टाण करून ! चित् घन चपला ... हुंहंह्रं हंहंहं
.. -झपूझा गडे झपूर्सा !
पाकोळी २ [ चमकून मागें सरकून हेटाळणीच्या स्वरांत ] कोण १ काजू १ तं. १
इथें कुठें घडपडायला आलास १ जगांत दुसरीकडे कुठें जागा नव्हती का!
कुणाच्या ठोकरीने आदळलास तं इथें १
काजू : किती थट्टेखोर आहेस ग तूं पाकोळी ! मी डॉक्टर बिंदुकाकांकडे
राहायला आलां आहे आतां ! अगदीं तुझ्याजवळ ! नुस्तं हें कुंपण आहे मधे बघ !
पाकोळी, आतां मी अगदीं एकटा पोरका आहें ग! तुला माहीतच आहे -माझा
जुळा भाऊ -प्रदीप आपल्याबरोबर कॉलेजांत होता १-मेला ! कलकत्त्याच्या
बॉबहछयांत चेंगरला ! मी खूप खटपट केली वांचवायचो, पण काय १ मी आतां
एकटाच उरलो! डॉ. बिंदुमाघवकाकांचा मी मदतनीस आहें ! हो! शास्रीय
शोध लावतों आहें मी ! विटामीन, ग्रंथीरस, हार्मोनियम... ...जाऊं दे तें--- |
पाकोळी ! माझ्या फुला ! फुलपांखरा ! माझे तुझ्यावर कित्ती कित्ती प्रेम आहे
म्हणून सांगूं !
१३
User Reviews
No Reviews | Add Yours...