देव - कन्या | Dev Kanyaa

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Dev Kanyaa by रा. देव - Ra. Dev

More Information About Author :

No Information available about रा. देव - Ra. Dev

Add Infomation About. Ra. Dev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
| १० ) नोकरी करूनच त्यांनीं बी. ए. पर्यंत शिक्षण घेतलें. प्रस्तावनेत श्री. घाणेकर यांनीं लिहिल्याप्रमाणें ते कीर्तनकार, कवि व शिक्षक म्हणून प्रसिद्धीस आले. हे अत्यंत यशस्वी शिक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेषत: मराठी काव्य शिकविण्यांत यांचा हात॑ धरणारा क्वचितच, मराठी भाषेचा व हिंदु संस्कृतीचा यांना अत्यंत आदर व अभिमान आहे हें प्रस्तावना लेखक श्री. घाणेकर यांनीं व्यक्त केलें आहे. ते' सरकारी नोकर असून देखील व निझामाच्या राजवटींत रहात असून देखील हिंदूंवर झालेले अत्याचार व गळचेपी याविषयीं ते निभिडपणें आपल्या कीतंनांतून विचार व्यक्त करीत असत. देशाविषयीं व धर्मा- विषयीं असलेली तीव्र तळमळ त्यांच्या काव्यांतून व कीतंनांतून वारंवार दिसून येतें. नांदेडहून त्यांचें स्थलांतर उस्मानाबाद येथें झालें व येथेंच त्यांच्या नोकरीचा बराचसा काल गेला. त्यांनीं प्रपंचं करून स्वतःचें एक छोटेसे घरहि बांधलें. त्यास ' इंदिरा निवास ' नांव दिलें. त्यांच्या अंगीं विद्वत्ता असूनहि निझामस्टेटमध्ये उर्दूच्या वर्चस्वामुळें हें रत्न राखत झांकलें गेलें होतें. आतों कोठें स्वातंत्रप्राप्तीनंतर त्यांचा हा पहिला कवितासंग्रह देवकन्या ' प्रसिद्ध होत॑ आहे ही आनंदाची गोष्ट होय. ते लवकरच सेवानिवृत्त होत आहेत. यापुढें या 'इंदिरा निवासात श्री. व सरस्वति एकत्र नांदोत व वाढोत व अद्यापहि त्यांचा बराच अप्रसिद्ध काव्यग्रंथ व चरित्रात्मक आख्यानें लवकरच प्रसिद्ध ह्योवोत व रसिकांचें रंजन करोत ही देवचरणीं प्रार्थना करून हा लांबलेला देवकवींचा परिचय येथेंच थोंबवितों. भार्गवराब कवलगी, बी. ए. बी. टी. ब. र मुख्याध्यापक, हायस्कूल जि. घाराशीव मुर्म दि. १५-८-५४.
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now