प्रेमळ घर | Premal Ghar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : प्रेमळ घर  - Premal Ghar

More Information About Author :

No Information available about कृष्णाबाई मोटे - Krishnabai Mote

Add Infomation AboutKrishnabai Mote

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
नवा सुलगा ७ युद्धाच्या धुमश्चक्रींत झालेल्या बाबफेकीचा त्याच्या मनावर किती परिणाम झाला होता हें मला नंतर पुष्कळच वेळां दिसून आलें. कुणी घरीं लवकर आलें नाहीं, उशीर झाला, कीं त्याला वाटे, बँबफेकींत तो मनुष्य बहुधा ठारच झाला असावा. एकदां माझा मुलगा पाल लवकर घरीं आला नाहीं. मीं सहज म्हटलें, “काय झालें पॉलला कुणस ठाऊक १ कां बरं आज इतका उशीर झाला ?” “मेला असेल तो!” आंद्रिसचें अगदीं थंड स्वरांत उत्तर आलें. “बॉब पडला असेल नी खलास झाला असेल, दुसरं काय?” पण पहिल्यांदा मीं त्याला असें बोलतांना एकले, तें मी आजारीपणांतून उठून आल्यावर. मी दिसेनाशी झाले म्हणजे बाबफेकींत मेले, अशीच त्याची समजूत होती, म्हणून मला परत आलेली पाहतांच त्याल्म एकदम गहिंवरून आलें. मी फिरून कधीं दिसेन अशी कल्पनाच नसावी त्याला. आज त्याचे खांदे इतके वाकले होते कीं एकाद्या पोक आलेल्या माणसासारखा तो दिसू लागला. आंद्रिस आधींच फार किडकिडीत, त्यांतून जणुं काय साऱ्या जगाचें दुःखाचे ओझें त्याच्या खांद्यावर दिल्यासारखा खांदे वाकून 'चालायचा. मनानं अस्वस्थ झाला, म्हणजे तर हें पोक फारच वाढे. आज तर त्याचे ते खांदे इतके वांकले होते, कीं एकाद्या पोक आलेल्या माणसासारखा तो दिस लागला. मला कां तें कळून चुकले. मीं म्हटलें, “वेड्या, असं काय बरं १ बघ पाहूं माझ्याकडे ! माझ्यावर बाँब पडलेला नाहीं. चांगली घडधाकड जिवंत आहें मी ! आतां वाईट नाहीं अं वाटून घ्यायचं, हं.” माझ्या शब्दांचा इष्ट तो परिणाम झाला. पोक गेलें. खांदे ताठ सरळ रेषेत झाले. एकाद्या लष्करी शिपायासारख्या टांचेला टांच भिडवून त्यानें मला सलाम केला. “किती छान झालं तुम्ही परत आलांत तें!” असें म्हणून स्वारी वगात निघून गेली. हळूहळू माझ्या लक्षांत येऊं लागलें कीं सी नसतांना .त्याचें' कांहीं तरी बिनसलें असावें. तो बिलकूल पूर्वीसारखा राहिला नव्हता. पहिल्यांदा तो आमच्या शाळेंत आला, तेव्हां किती गरीब, भित्रा, कमाल आज्ञाघारक, असा वाटायचा. इतका कीं भयंकर जरबेच्या धाकांत तो राहिला असावा असेंच आम्हांला वाटे. पण आतां १ सारेच बदलले होतें. ती एकाग्रता, ती अगदीं नमुनेदार काम करायची वृत्ति, तो गरीब स्वभाव,




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now