रुक्मिणी हरण | Rukminiharan

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Rukminiharan by गोपाळ विष्णु तुळपुळे - Gopal Vishnu Tulpule

More Information About Author :

No Information available about गोपाळ विष्णु तुळपुळे - Gopal Vishnu Tulpule

Add Infomation AboutGopal Vishnu Tulpule

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
७ भाव्यांच्या जवळील मूळ हस्तलिखित प्रत सांपडती तरी फार चांगले झालें असत, पण ती प्रत त्यांना सांपडली नाहीं. सा[मराजाच्या “रुक्मिणीहरणा'चे ८ सर्ग असून त्यांत एकंदर ११०० वर -छोक आहेत. हें काव्य वाचीत असतां याचे एकदोन विशेष तेव्हांच दृष्टीस पडतात. यांतील बराचसा भाग संस्कृत काव्याच्या धतीवर असून पुष्कळ वेळां या कवीचा संस्कृत काव्य व साहित्यशास्त्र यांच्याशी चांगलाच परिचय असला पाहिज असे स्पष्ट दिसून येते. एकंदर काव्याची अंतर्बाह्य रचना, त्याची ठेवण, सगांचीं नांवें व त्यांची मांडणी, निरनिराळ्या प्रसंगांची संस्कृत काव्यांतील त्या त्या प्रसंगाशीं मिळणारी वेन, दुसऱ्या सर्गांतील आरंभींचे भीमकराजाचें वर्णन, त्याची प्रजापालनतत्परता, त्या नंतरचें गरमिणीचें वर्णन, हीं वाचलीं म्हणजे कवीचा “रघुवंशा'दि काल्यांशीं उत्तम परिचय असला पाहिज अश्षी खात्री वाहू लागते, इतकेच नव्हे, तर रुक्मिणीच्या आईचें गर्भारपणांतील वर्णन करीत असतांना कालि- दासाचें 'रघुवंशा?च्या तिसऱ्या सर्गातील वर्णन कवीपुढें खास असलेंपाहिज, त्याचप्रमाणें तुतीय सर्गातील रुक्मिणीचा भाऊ रुक्मी याने केलेल्या कृष्ण- निंदेवरून 'कुमारसभवां'तील बहूच्या शिवनिदेची आठवण होते, तसच पांचव्या सगीत[छल १०७ व त्या पुढील झोकांत आलेले रार्कमिणीचें प्रत्यवयववर्णन पाहून 'कुमारसभवां'तील पार्वतीच्या वर्णनाचा भास होतो. अशीं समानार्थांचीं आणखी कितीतरी स्थलें सांपडतील, यांपैकीं कांहीं पुढे परिशिष्टांत दाखविली आहेत. सामराजाचा संस्कृत ग्रंथांशीं असलेला परिचय दुसऱ्याही एका कार- णानें चांगला व्यक्त हीतो. या काव्यांत पुष्कळसे संस्कृत शब्द, संस्कृत भाषेच्या घर्तावर लांब लांब समास व कित्येक ठिकाणीं संस्कृत पद्धतीची व[क्यरचना दृष्टीस पडतात. तसच उपमा, दृष्टांत वगेरे कवीनें योजिलेल्या अलंकारांपैकी बरेचखे नेहमीं संस्कृत काव्यांतून आढळून येणारे असे आहेत. या काव्यांत आलेल्या अनेक अलंकारांवरून या कवीचें अलंकार ब साहित्य या शाखतरांतील प्राविण्य दिसून येतें, अशा प्रकारें या काव्यांत संस्कृताचें वर्चस्व जरी सर्वत्र दिसत असलें




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now