ळो. टिळकांचे केसरीतीळ ळेख भाग ४ | LO. Tilakaanche Kesariitiil Lekh Bhaag 4

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : ळो. टिळकांचे केसरीतीळ ळेख भाग ४  - LO. Tilakaanche Kesariitiil Lekh Bhaag 4

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लो. टिळकांचे केसरीतील लेख * कॉकणस्थ, देशस्थ व कऱ्हाडे कित्येक गोष्टी अशा आहेत कीं, त्या सर्वास माहीत असतां व त्यांची आव- रयकता प्रत्येक दिवशीं सर्वांच्या अनुभवास येत असतां, त्याबद्दल कोणी कोणाशी बोलत नाहीं. याचं कारण असे आहे कीं, त्या गोष्टी पुरातन जनरूढीविरुद्ध आहेत. सर्व भयांमर्ये लोकापवादाचें भय मोठें प्रबल. यापुढ सुधारणेचा झेंडा लावणाऱ्या महावीरांच्या कंबरा बसतात, असं जरी आहे, तरी ज्या गोष्टींपासून सतत नुकसान होत आहे असें वाटते, अशा, कोणीतरी ( भीत भीत कां होईना) लोकांच्या विचारापुढ आणिल्याच पाहिजेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वेद्य, शूद्र हे चार वर्ण फार पुरातन आहेत याबद्दल कोणासही संशय येणार नाहीं. या चार वणीचा परस्परांशी अन्नोदकव्यवहार होत असे; इतकेच नाही, तर ब्राह्मणांनीं क्षत्रिय कुलांतील मुली करणे सशास्त्र असल्याबद्दल ग्रंथांतरी अनेक आधार सांपडतील. तथापि प्रकृत प्रसंगीं या प्रश्नाशीं आम्हांस कांहीं एक करावयाचे नाहीं. याचा येथे स्फुट उल्लेख केला, याचें कारण इतर्केच कीं, ज्या वणांचा अलीकडे अन्न: व्यवहार देखील बंद झाला, त्या वर्णीमध्ये पूर्वी परस्पर विवाहसुद्धां होत असत. पण कालगत्या अनेक कारणांनी या चार वणाचा हरएक प्रकारचा संबंध अली- कडे तुटला, व तो न होण्याविषयीं निषेधपर वाक्ये धर्मशास्त्रांत किंवा इतर ठिकाणीं सांपडतील. असो; झालं ते झाले. याबद्दल आमचे कांहीं म्हणणें नाहीं. पण देशस्थ, कोकणस्थ आणि कऱ्हाडे यांच्यामध्ये अन्नव्यवह्ारादि सर्व गोष्टी चालू असतां विवाहनिषेध कसा झाला हा प्रश्न मोठा विचाराई आहे. या निषे- घास कोठें द्याख्रांतरी आधार सांपडेल असे आम्हांस वाटत नाही. कोणाच्या कोठें कांही पाहाण्यांत आला असल्यास त्यांनीं कृपा करून आम्हांस कळवावा. कसंट्टी असो, हा निषेध दिवसैदिवस फारच अहितकारक होत आहे ही गोष्ट कोणाही निःपक्षपाती विचारी मनुष्याच्या लक्षांत आल्याखेरीज राहाणार नाहीं. देशस्थ, कोकणस्थ आणि कऱ्हाडे यांच्यामध्ये परस्पर विवाहाची चाल पडल्यास अनेक प्रकार हित होणार आहे. देशस्थ आणि कऱ्हाडे यांच्यांत कोठे कोठें लग्न होतात, व त्यांबद्दल कोणी कोणास दोष देत नाही; असे असतां देशस्थ, कॉक- या.) *( वर्ष १ अक २-४ )




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now