श्री समर्थप्रताप | Shri Samarthapratap

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Shri Samarthapratap by अज्ञात - Unknown

More Information About Author :

No Information available about अज्ञात - Unknown

Add Infomation AboutUnknown

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
प्रस्तावना पभ मानण्यास हरकत नाहीं, गिरिधर हे मूळचे राहणारे मिरजतासगांवकडील च, परंतु पुढें गुवशिवरून ते बिडापासून सात आठ कोस असलेल्या इंट गांवी रहावयास गेले, तेथे त्यांचा मुख्य मठ आहे. स्वतः गिरिधरांनीं भिंतीवर काढलेली मारुतीची मूर्ति ईट येर्थे आहे. गिरिभ्वर ग्रहस्थाश्रमी होते, पण त्यांना पुत्र नव्हता, एक कन्या होती. हल्लीं बिडास जे दोन मठ आहेत, त्यांपैकीं एक त्यांच्या कन्येच्या वशजांचा व दुसरा त्यांचे बंधु भीम यांच्या वंद्यजांचा आहे. गिरिधरांचे लिहिलेलें अस चरित्र मिळालें नाहीं; कांहीं दंतकथा, त्यांची कविता व त्यांच्या स्थलांचे प्रत्यक्ष दशन, यांच्या सहाय्यानें जी कांहीं थोडी माहिती उपलब्ध होईल तेवढी 'च देणें शक्य आहे. गिरिधरांनीं कोणता व्याप केला याची कल्पना त्यांच्या कावेतेवरून च केली पाहिजे. इतकी गोष्ट खरी कीं, त्यांचा सर्व काळ श्रीशुरुव श्रीराम यांच्या भजनांत व युणानुवादकी्तनांत गेला. त्यांच्या कवितेची एकंदर ग्रन्थसंख्या २४००० वर आं, यावरून च ते आपला काळ कसा कंठीत असले पाहिजेत याचा अदमास होतो. श्रीसमर्थप्रताप धरून त्यांचे एकंदर लहान मोठे चाळीस ग्रन्थ उपलब्ध झाले आहेत. त्याशिवाय त्यांचे शॅकडी स्फुट अभंग, पदे, शोक इत्यादि आहेत च. ही सारी कविता माझ्या दृष्टीला अपूर्व दिसते. माझ्या दृष्टीला कांहीं विकार झाला नसल्यास “ निरत्तिराम ?' ग्रन्थावरून रामदा« सियांनीं सारें ऐहिक वैभव ओवाळून टाकलें पाहिजे, इतका तो ग्रन्थ ब्रहु- मोल आहे. संकेतरामायणाची पहिली सहा कांडे वेणाबाईचीं असावींत असें भाषेवरून वाटते. खरं खोटें त्या जाणोत, गिरिघरांची आणखी कांहीं कविता उपलब्ध व्हावयाची राहिली असावी, असें वाटत नाहीं. एक तर बीड येर्थे दोन्ही मठांत संग्रह व्यवस्थित होता, तो सर्व मिळाला व दुसरे त्यांच्या ग्रन्थांत उल्लेखिलेली सर्व कविता मिळाली आहे. रामायणांची नांवें सात दिलीं आहेत,परंत सुंदररामायणाला च लबकुशरामायण व छंदोरामायणाला च भाषारा- मायण झटलेले असावें,असें वाटतें.या एकंदर कवितेत भ्ीसमथ[विषयीं जे दॅकडो उल्लेख आले आहेत ते फार प्रेमळ आहेत. प्रसंगोपात या कवितंत जी सांप्रद[« यिक शिकवण आलेली आहे ती फार महत्त्वाची आहे, अशा सा*छप्यांच्या उद्गा- रांवरून विद्यमान सांप्रदायिकांनीं पुष्कळ बोध घेण्यासारखा असतो. यासाठी द्दे चाळीस ग्रन्थ व शिवाय स्फुट कविता इत्यादिकांचें सामान्य स्वरूप दर्शवून श्रीसमर्थ आणि श्रीसांप्रदाय यांविषयी त्यांत जे कित्येक महत्त्वाचे




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now