रत्नमहाळ | Ratnamahaal

Book Author :  
                  Book Language 
मराठी | Marathi 
                  Book Size :  
14 MB
                  Total Pages : 
236
                  Genre : 
  Genre not Defined. Suggest Genre  
                Report Errors or Problems in this book by  Clicking Here  
              More Information About Author :

No Information available about एकनाथ सखाराम रेगे - Eknath Sakharam Rege
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)बाबरावाचा शोध ! ९,
पाहिला तो हाच प्रकाश, अशी त्याची खात्री झाली. प्रकाश पाहतांच
बाबुरावाला थोडा आशेचा किरण दिसूं लागला. तो दरवाजाजवळ गेला
व समोर असलेला झालरीचा पडदा दूर सारून त्यानें दरवाजा ठोटा'
वला. परंतु या वेळीं त्याला तोच अनुभव आला. त्यानें अनेक वेळां
दरवाजा ठोठावून मोठमोठ्याने हाकासुद्धा मारल्या; परंतु त्याला किंचि-
तही य॒श आलं नाहीं. दिवाणखान्यांत एवढा झगझगीत प्रकाश
असूनही आपल्या हाकेला प्रत्युत्तर मिळत नाहीं असें पाहून त्यानें इतर
कसलाच विचार मनांत न आणतां तो दरवाजा एकदम लोटला. दर-
वाजा उघडतांच आंतील दिव्यांच्या प्रकाशाची क्षिरप बाहेर आल्यामुळं
बाबरावचे डोळे अगदीं दिपून गेले. डोळ्यांना तो प्रकाश सहन कर-
ण्याची शक्ति येतांच बाबराव दिवाणखान्यांत येऊन तेथें तरी आप-
णास कोणी आढळेल या आशेने तो आपल्या सभोंवतालीं पाहूं लागला.
परंतु प्रथम त्याला त्या जागेंत कोणीच मनुष्यप्राणी न दिसतां आपण
मात्र अगदींच विलक्षण अशा एका जागीं आहोंत असें त्याला समजून
आलें. त्याला तो दिवाणखाना अगदींच विलक्षण दिसावयास लागला.
आंत सफेत रंगाशिवाय दुसरा कुठला रंगच त्याला तेथें दिसेना.
सव दिवाणखाना पांढऱ्या रंगाच्या वस्तूंनीं सजविलेला होता. भिंतींना
सफेत तैलरंग दिलेला, खिडक्या व दरवाजे यांनाही तोच रंग,
खिडक्या व दरवाजे यांना लावलेले पडदेही सफेत कापडाचे, दिवाण-
खान्यांतील सवे लांकडी सामानही सफेत रंग देऊन वारनिश केलेलं,
मेज, खुर्च्या, कोचा, कपाटे सवच कांहीं तेथें सफेत रंगाचे होतें. हा
प्रकार पाहूनं बाबराव तर अगदीं स्तॅभितच झाला ! दिवाणखान्यांतील
सवे दिवे पेटत असूनह तेथें कोणीही त्याला दिसलें नाहीं, म्हणून
दुसऱ्या एखाद्या खोलींत कोणी आहे कीं काय हॅ पाहण्यासाठी तो इकडे
तिकडे फिरून पाहूं लागला;तोंच त्याला बाजाच्या पेटीसमोरील खुर्चीवर
एक खत्री बसलेली असून तिनें आपलें डोकें आपल्या समोरील बाजाच्या
पेटीवर टेकलेलें आहे असं आढळून आलें.
 
					 
					
User Reviews
No Reviews | Add Yours...