भावनांचे खेळ | Bhaavanaanche Khel
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
8 MB
Total Pages :
125
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about आनंदीबाई शिर्के - Aanandibai Shirke
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)८ भावनांचे खेळ व इतर गोष्टी
** निघतात; पण-??
“ पण मी एवढा पात्र नव्हतों असंच ना १ खरं आहे. प्रण असं पाहा, कीं
एखाद्या दुदेन्याचे आईबाप लहानपणीच मरावेत आणि तरुणपणीं सत्ता व संपत्ति
त्याच्या हातीं यावी यापरती आपत्ति दुसरी कोणतीच नाही, त्याचा परिणाम जो
झाला तोच व्हायचा. एखाद्या देवतेनं त्या दुर्देव्यावर अलुग्रह केला तरच
कांहीं तरणोपाय- ”
“ जयंत, आतां तुम्ही जाल का १”
“ अरेरे, एखाद्याची एकदा अघोगति झाली कीं झालीच ! पडल्याची पुरती
पायमछ्ली करायची---त्याला वर म्हणून येऊंच द्यायचं नाहीं, हा जसा कांहीं जगाचा
ठरलेला नियम ! त्याला तूं तरी कशी अपवाद असशील १**
“ तुमचं म्हणणं तरी काय १ मी काय करावं म्हणतां १”
“ कांह्दीं नाहीं, तुमच्या दोघांच्या मैत्रीची फक्त भी याचना करीत आहें. त्या
वेळीं तूं मला झिडकारलंस, तिरस्कार केलास, हा माझ्यावर एकपरी अचुग्रहच झाला.
त्यामुळंच माझे डोळे उघडले, शुद्धीवर आलों आणि एवढ्या तपश्चयेनंतर माणसांत
बसलों आहें. नाहींतर कुठं वाहवत गेलों असतों कल्पना नाहीं ! तिरस्कारानं इतका
सुपरिणाम झाला तर स्वीकारानं किती होईल १ असले प्रश्न आतां ब्यर्थ आहेत.
एकंदरींत तुझंच गणित बरोबर होतं. तंहि हिऱ्याची निवड केलीस, पण... पण
गारंगोव्या अगदीं पायदळींच तुडवल्या पाहिजेत असं नाह्दीं करु...”*
बोलतां बोलतां त्याचा स्वर कांपरा झाला. थोड्या वेळानें तो पुन्हा म्हणाला,
“ एखाद्या कलावंताच्या हातीं पडल्या तर त्यांच्याहि मूर्ती होतात; आणि तं
तुझ्या स्मृतीनं मला माणसांत बसवलंस हें मी कसं विसखूं १ पण मी माझ्या
मुलासाठीं ही याचना करायला आलो होतों. *
“ मुलगा आहे तुम्हांला १”
“ हो. आईवेगळा जीव ! वाढतो आहे तिकडे, इतिहासाची पुनरावृत्ति होऊं
नये. चांगलं वळण लागण्यासाठीं तुमचं दार त्याला उघडं असावं म्हणून आहोनं
आलों होतों. असो. सुखी असा ही प्रार्थना !”
तो सद्गदित झाला. करुणेलाहि कणव आभाली. पण ती इतकी भांबावून गेलं
User Reviews
No Reviews | Add Yours...