संसार | Sansaar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : संसार  - Sansaar

More Information About Author :

No Information available about शं. बा.शास्त्री - Shan. Ba. Shastri

Add Infomation AboutShan. Ba. Shastri

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
पदत अन समस्या येऊन जीवनांत गर्दी करूच समोर येऊन उभ्या राहत असतात माणसाच्या, भगवान जाणे ! ह्या प्रहनांनीं अन्‌ समः स्यांनीं आमचा कांहीं थोडाथोडका छळ केलेला नव्हता, हें कांहीं खोटं नाहीं ! पण, कांहीं असो, आतां तें सारं संपलं, हेंहि तितकंच खरं ! आतां आमची जीवन-सरिता स्तिमित, तरंगहीन बनली आहे ! आतां आम्ही डोळे मिटून घेऊन स्वस्थपणे अतीत काळाकडे 1हात बसूं शकतों. सोमेद्वर त्या दिवशीं बोलतां बोलतां म्हणालेच होते ना, माणसांच्या शहाणपणाचा इतिहास म्हणजे त्याच्या मूख- पणाचं इतिवृत्त ! मी म्हणालो तेंच त्यांनाहि सुचवायचं असावं, मला वाटत, सारा दिवस तर कसाबसा निघून जातो माझा; पण तिसरा प्रहर अत्‌ संध्याकाळचा वेळ मात्र जातां जात नाहीं. कां असं होतं, तें सांगतां येणं कठिण आहे; पण होतं मात्रं खरं तसं. अन्‌ मग दिवसाची ही वेळ आलो कीं वाटायला लागतं,--एक सोमेश्‍वर सोडले, तर साझ्या मनाला पटेल असा दुसरा माणूस मिळणं अशक्यच आहे उभ्या जगांत ! आज कालच्या तरुण पोरांबरोबर गोष्टी बोलत बसायला मन घेत नाहीं. ते किती झालं तरी, आमच्याच पावलावर पाऊल टाकणारे, आमचंच अनुकरण करणारे, आमचे अनृगामी ! ही तरुण पिढी म्हणजे जुन्या कादंबरीची आधूतिक, नवी, पुनर्मद्रित आवृत्ति ! जुन्या-पुराण्या गोष्टी आलटून-पालटून, द्राविडी प्राणा- याम करून सांगायला बसले, कीं हे लोक स्वतःच गोंधळ निर्माण करूव प्रश्‍न अधिठय़ कठिण करून सोडतात. हयामळे असल्या तरुण पिढींतल्या लोकांशीं गोष्टी बोलत बसायला लागलं, कीं वाटायला लागतं काय बोलायचं हयांच्यालीं ? म्हणूनच आपला' सोमेश्‍वराजवळ घटकाभर जाऊन बसतों क्षालं. बरं वाटतं तिथें मला. जुन्या जमान्याच्या श्रीमंती खाक्याला अनू- शरून त्यांचा दिवाणखाना सजविलेला आहे. तिथं गेलं कीं नबाबी “ संसार -- ब




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now