पांच कथाकार | Paanch Kathaakaar
Book Author :
Book Language
मराठी | Marathi
Book Size :
15 MB
Total Pages :
250
Genre :
Genre not Defined. Suggest Genre
Report Errors or Problems in this book by Clicking Here
More Information About Author :
No Information available about वि. स. खांडेकर - Vi. S. Khaandekar
Sample Text From Book (Machine Translated)
(Click to expand)७ प्रास्ताविक
“ काळ तर मोठा कठिण आला * ही गोष्ट केवळ हरिभाऊंच्याच नव्हे तर
त्या काळांतल्या साऱ्या लालित वाड्मयांत एका दृष्टीनें अपूव आहे. पांढरपेशा
समाजाच्या पलीकडे पाऊल टाकून त्यांनीं एका शेतकरी कुटुंबाचे जीवन या
कथेत रंगविले आहे. भयानक दुष्काळाच्या अक्राळविक्राळ दाढांत चिरडल्या
जागाऱ्या या निष्पाप अगतिक कुटुंबाची कहाणी त्यांनीं सोठ्या समरसतेने
सांगितली आहे. घरांत पोरांनासुद्धां खायला घालायला कांही नाहीं अर्शी
स्थिति आल्यावर रामजी व त्याची कारभारीण जयाबाई गुरे विकायचे ठर-
वितात. या प्रसंगाचें हारेभाऊंनी केलेले वर्णन सहृदय कथाकार या नात्याने
त्यांची शक्ति किती मोठी होती हॅ सहज सिद्ध करूं शकेल.
“ सकाळीं गुर सोडून नेण्याची प्रशक्ष वेळ येतांच जयावाईंची तर नुसती
गडबड उडाली. मुलें अर्यापि निजलींच होतीं. तीं उठण्याच्या पूर्वी ग्ररांना
घेऊन जावं, असा रामजीचा थेत. कारण त्या मुलांचाहे जीव व्या गुरांवर
फार. तीं सोडून विकायला नेतांना त्यांनीं पाहिले म्हणजे बार्कांच्या चौघांना
अरी कांहीं कळलं नाहीं, तरी दोघां मोठ्या मुलांना तें कळून तीं एकच आकांत
करतील अशी त्याला भीति होती. पण त्या भीतीपेक्षां आधिक भीति उत्पन्न
करणारें असले वतेन या वेळीं त्याच्या बायकोने करण्याचा घाट घातला.
आपल्या पोटच्या गोळ्यांपैकीं एखादा गोळा ओढून नेण्याला कोणी उभा
राहिला असतां जसे आईने वतन करावें, तस तिनें चालविले. प्रथम ती
आरडली ओरडली नाहीं. “मी नाहीं नेऊ द्यायची माझ्या ढवळ्या गवल्याला !*
असं म्हणून त्यांच्यापुढे तिने अंग टाकलें. तिची समजूत कोणत्या शब्दांनी
करावी, आणखी काय बोलावें हं त्या बिचाऱ्या नवर्याला सुळींसुद्धा समजेना.
त्याचें स्वतःचे दुःख त्याला आवरेना, आणि बायकोच्या दुःखानें तर तें अधिकच
दुणावलें. त्यानें हळूहळू एकेका गुराचें दावें सोडले आणि ते सोडतां सोडतां
तो आपल्या बायकोची समजूत करीत हाता. हो, ना, हो, करितां कारेतां
श्वटी ती कांहीं तरी स्थिरस्थावर झाली, आणि “शेवटीं जातां जातां मी
आपल्या हातानें कांहीं नाहीं तर नाहीं, पण मूठ मूठ बाजरी चारतें, ती
चारू द्या आणखी मग न्या १ अस तिनें फार केविलवाण्या आवाजानें म्हटलें.
पांच मुठी बाजरी म्हणजे या प्रसंगाला काय आहे हें रामजीला समजलें नाहीं
असें नाहीं. पण त्या वेळीं “तेवढाह करू नको? असें बायकोला म्हणणें
User Reviews
No Reviews | Add Yours...