कडू आणि गोड | Kaduu Aani God

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Book Image : कडू आणि गोड  - Kaduu Aani God

More Information About Author :

No Information available about गंगाधर गाडगीळ - Gangadhar Gadagil

Add Infomation AboutGangadhar Gadagil

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
कटू आणि गोड ५ “ हें काय १ आज अघोळीला गरम पाणी नाही वाटते १ करतां काय तुम्हीं बायका घरात बसून?” मी बोटानेच त्याना गप्प राहायला सागितले. पण ते मोठ्याने म्हणाले, “आ?” असले हे पुरुष. शेवटीं मला बोलावें लागलेच, मी म्हटलें, “ आज थंड पाण्यानेच अघोळ करा तुम्हीं. ” ते कमरेवर हात ठेवून म्हणाले, “का १” मी रागावून म्हटलें, “मी सागतें म्हणून ” सग बसली स्वारी गप्प. पण इतक्यात मधल्या जाऊबाई स्वैपाकघरांतून आल्या आणि त्यानी मध्येच तोड खुपसलं, ““म्हणजे र भावोजींना थंड पाण्याने का अंघोळ करायला सागताय्‌ तुम्हीं १? आणि उद्या थंडी झाली म्हणजे १ इतके का जड झालंय गरम पाणी द्यायला १ थाबा, मीच देतें त्याना पाणी गरम करून, १ आणि उगीचच ह्याच्या अंगावरून त्या घरात गेल्या. त्यासरशी माझें डोकें उसळलें. मधल्या जाऊबाईंना असला चोंबडे- पणा करायची फार सवय आहे उगीचच पुरुषाच्या पुढे-पुढे करतील. डावा पाय नाचवीत गुटुगुल बोलतील, आणि तेवढ्यात दुसऱ्याची नालस्ती करतील आम्ही नाही बाई अशा दुसऱ्याच्या पुरुषापुढे नाचत, मीं चहाचें आधण उतहन टाकलें आणि थोरल्या जाऊबाईंना म्हटलें, “ तुम्हीच घ्या आता चहा गाळून *” मग चट्दिशी पाण्याचें मोठें पातेलें स्टोव्हवर ठेवलें, आणि फराफर स्टोव्हला पंप केला आणि पाण्याला आधण आलें तशी तें भस्‌दिशी त्याच्या बादलींत नेऊन ओतंलें. थोडेसें त्याच्या अंगावर उडालेंदेखील, ते म्हणाले, “ अग, अग, तुझे डोकॅबिके फिरल॑य्‌ की काय १” मीं म्हटलें, “ हो. थंड पाणी किती लागेल तें पाहा.” ते म्हणाले, “ह पुरे, पुरे. अग, पण असें झालें तरी काय उसळायला१ तुला पाणी नव्हतें गरम करायचें तर्‌ वहिनी करीत होती ना!”




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now