साहित्य - संग्रह १ | Saahitya Sangrah 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Saahitya Sangrah 1 by शिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Author :

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
मनाची मीमांसा ७ झाली, तेव्हांच अर्थात्‌ या मनकवडेपणाच्या गुणाला महत्त्व येऊं लागलें, कारण, पूर्वी जेव्हां एकमेकांच्या मनांत काय आहे, हॅ अगदीं लहान मुल देखील एकाद्या कागदावर लिहिलेल्या अक्षरांप्रमाणें पाहून वाचूं शकत असत, तेव्हां या मनकवडेपणाच्या चेटकी कृत्याला आणि फसवेगिरीच्या कसबाला काय किंमत असणार १ हा मनाचा आरसा खोल शरिरांत दडविला न जातां जेव्हां शरिराच्या- वर प्रत्यक्ष दिसत असे, तेव्हांचें अ युग त्याला सत्ययुग असें म्हणत असत, कारण, त्या वेळीं असत्याला दडण्याला कोठें जागाच मिळत नसे. त्या वेळीं कोठें अंघार नव्हता, किंवा कोठें तळघर नव्हती, किंवा पवेतांना गुहा नव्हत्या, किंवा जंगलांतून दाट झाडी नव्हती, असें नाहीं. जेथे असत्याला दडून बसतं येईल, अशीं पुष्कळ ठिकाणें त्या वेळींही होती, पण असत्याचें मूळचें आणि मुख्य दडण्याचें हल्लीचे ठिकाण म्हटलें म्हणजे मन होय. तेथें त्याला आश्रयाला निवाऱ्याची आणि युप्ततेची जागा पूर्वी मुळींच मिळत नसल्याकारणाने अर्थातच बाकीच्या बाह्य गुप्त जागा ओसाड पडलेल्या होत्या. असत्य मनांत आणावे, तर तें मनात आणल्याबरोबर दुसऱ्याला दिसणार ! आणि दुसऱ्याला दिसल्याबरोबर तो त्याच्या प्रति- काराला सुरुवात करणार ! अशी स्थिति असल्यामुळें कोणीही असत्याला आपल्या मनामध्ये आश्रय देत नसे, आणि त्यामुळें तें युग अगदीं अक्षरशः सत्ययुग झालेले होतें. त॑ सत्ययुग होतें; पण त्यांत विशेष नांवाजलेले असे साधुपुरुष कोणीच नव्हते, हें विघान पाहून कोणालाही आश्चये वाटल्यावांचून राहणार नाहीं. इतकें चांगलें युग असून चांगले साधुपुरुष त्यांत नाहींत, हे व्हावें कसें, असें गढ पुष्कळांना पडणें अगदीं साहजिक आहहे. परंतु याचें कारण अगदीं नियळें आहे, सगळेच लोक जेव्हां अतिकश्षय दुर्जन असतात, तेव्हां त्यांच्याचपैकीं जे कांहीं थोडेसे लोक थोडे कमी दुर्जन असलेले आढळतात, त्यांना हल्लींच्या काळांत साधु म्हणून म्हणण्याचा परिपाठ पडलेला आहे. दुर्गुणांच्या शरयतीमध्ये आधाडी मारण्यासाठीं आणि बक्षीस मिळविण्यासाठीं सगळे घोडे भरधांव पळत सुटलेले असतांना, दुर्गुणांच्या बाबतींत जे मागासलेले असतात, ते साधु, सत्पुरुष आणि सजन या नांवाखाली




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now