मराठ्यांचा ळढायाचा इतिहास | Maraathayaanchyaa Ladhaayaanchaa Itihaas

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathayaanchyaa Ladhaayaanchaa Itihaas by शिवराम महादेव - Shivram Mahadev

More Information About Author :

No Information available about शिवराम महादेव - Shivram Mahadev

Add Infomation AboutShivram Mahadev

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(२) शिंद्यांच्या हाताखालील फ्रेंच सेनापतींनी आणि मराठे सरदारांनीं कोइल, अलीगड, दिली, लासवारी, वगरे ज्या लढाया केल्या, त्यांचें रणक्षेत्र उत्तर हिंदुस्थानांत दिल्लीच्या आसपास होतें. त्यांच्या पाठीमागून इन सन १८०४--५ या सालीं इंदुरचे यशवंतराव होळकर यांनीं मधुरा, दिल्ली, भरतपूर, वगरे उत्तर हिंदुस्थानांतील रणक्षेत्रांमधून इोरलि- शांशीं लढाया करून त्यांना नामोहरम करून टाकलें. पुढें अखेरीस शिंदे, होळकर, भोसले, यांच्याशी तह होऊन या लढाया ज्या संपल्या होत्या, त्यांची फिरून सुरुवात महाराष्ट्रांत इन सन १८१७-१८ सालीं पुण्यांतील दुसऱ्या बार्जारावसाहबांनी केली. या दुखऱ्या बार्जीरावसांहेबांच्या धामधुर्मामध्ये खडकी, कोरेगांव, अरे, वगरे ठिकाणच्या लढाया या मुख्य आणि महत्त्वाच्या लढाया दोत. व या लढायांच्या पाठीमागून महा- राष्ट्रांताल 1नेरनिराळे किल्ले सर करून चघेण्याकारितां त्या त्या किद्र्यांवर किल्येक लान मोठ्या लढाया झालेल्या आहेत. ऐतिहासिक कालक्रमाच्या दृष्टीने वर दिलेल्या लढायांचा असा हा या प्रकारचा क्रम आहे. वह्या जो या लढायांचा वास्तविक क्रम आहे, त्याच क्रसानें या लढायांचीं वणेनें एका मागून एक येणें अवश्यक आहे. पण ज्या क्रमानें हीं वणेनें यावयाला पाहिजेत, त्या क्रमानें तीं या पुस्तकांत आलेलीं नाहींत, ही गोष्ट कोणाहि वाचकाच्या सहज लक्षांत येण्यासारखी आहे. तेव्हां हा क्रमभगाचा दोष कसा घडून आलेला आहे, याच्याबद्दल दोन शब्द लिहिणे अवश्य आहे. हिंदुस्थानच्या सांप्रतच्या राजकीय पारिध्थतांचें पयालोंचन करणारांना हंदु- स्थानच्या अवार्चान इतिह्याखांतील कोणत्याहि लढायांचें अध्ययन हें नेहमी शिक्षण- प्रदूच आहे. व अशा दृष्टीनं पहातां या सवच लढायांचा अभ्याध्व करणे अत्यंत अवइयक आहे. परंतु त्यांतल्या त्यांत महाराष्ट्रीय मलुप्याची पहिली जिज्ञाघ्ा स्वाभा- विकपणें कोणत्या लढाईबद्दल बरे असणार १ आपण महाराष्ट्रीय. आपण महाराष्ट्रांत राहतो. पुणे हें त्या महाराष्ट्रांतील मुख्य शहर, त्या पुणें शहरांत थोंड्या वर्षांच्या पूर्वीपर्यंत पेशब्यांचें राज्य होतें. तें राज्य आज कोठें आहे? त्या राज्याची अवशिष्ट चिन्हें येथें सव जागच्या जागीं कायम असतांना त्यांच्यामधील तें राजवैभव आज कोठें गेलें आहे १ पूर्वी आपल्या राज्यांत आपण स्वतंत्र होतों. पण ती आपली स्वत॑- न्रता नष्ट होऊन आज कोणीकडे गेली आहे १ पूर्वीचे राजवाडे आहेत, पण त्यांत राजे मात्र नाहींत ! पूर्वीचे किछ्ले आहेत, पण त्या किछ्यांवर किळेदार कोणी नाहींत ! पूर्वीचे सेनापति आहेत, पण त्यांच्या ह्याताखालीं त्यांच्या खेना मात्र हीं नाहींत ! अशी ही आपली स्थिति कशाने झाली १ अशा प्रकारचे अनेक प्रश्न महा- राष्ट्रांतील आणि विश्षेषतः पुण्यांतील प्रत्येक मनुष्याच्या मनामध्यें पदोपदी प्राहुभूंत होतात, आणि या सगळ्या प्रश्नांना आपला इतिहास असें उत्तर देतों कीं, पुण्यांतील आपल्या या राजसत्तेचे वेभव खडकीच्या लढाईनें शेवटाला नेलें ! हे त्या वृद्ध इति-
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now