तेंमाझें घर | Ten Maajhen Ghar

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Ten Maajhen Ghar by मनोहर महादेव केळकर - Manohar Mahadev Kelkar

More Information About Author :

No Information available about मनोहर महादेव केळकर - Manohar Mahadev Kelkar

Add Infomation AboutManohar Mahadev Kelkar

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
आम्हां भावंडांचे स्वतंत्र संसार आहेत, त्यांनाहि द्याखा-उपशाखा फुटल्या आहेत, व्यवहारांत सगळ्यांचा सगळ्यांशीं देनंदिन पत्र- ब्यवहारांतहि राहणें कठीण आहे. आमची आई जळगांवच्या घरांत राहते, तेथें एक भाऊ असतो. आई केव्हांतरी चार दिवस आमचे येथें येते. आम्ही केव्हांतरी जातों. पण आमच्या प्रत्येक भावंडाच्या घरांत आईवडिलांचा फोटो आहे व तो आमच्यांतल दुवा आहे. माझी सगळ्यांत थोरली बहीण नागपूरला होती. ती गेल्याला आज चोवीस वर्षे झाली. तिचे यजमानहि दहा वप्राखाली गेले. तिचीं मुलं-मुली कर्तीसवरतीं आहेत. पण तिच्या मनांतली भावना तिच्या सगळ्या मुलांनी उचलली आहे. मी नागपूरला बह्दीण गेल्यापासून गेलो नव्हता. तो वीस वर्षांनीं गलों. सगळ्यांची घरं स्वतंत्र. मुख्य घरांत तर॒तीन भावांचे तीन संसार होते. एका घरांत चहा घेत होतां, एकीकडे जेवत होतों, एकीकडे झोपत होतों. एक भाची गांवांतच पण दूर राहते, तिच्याकडे जाऊन राहून आलों, पण एक दिवस प्रश्न निघाला, “मामा उद्यां कोणाकडे जेवणार १? रविवारची सुट्टी होती. तेव्हां सवजण मोकळे होते. मी सुचवलं, “उद्यां मधल्या घरांतल्या माईच्या जेवणघरांत सगळेच एकदम जेवू, माई असतांना जेवत होतों तसे ! प्रत्येकाने आपापल्या घरून एकएक जिन्नस करून आणा.? आणि मीं सुचवलं तें त्यांनीं आनंदानं मानलं. त्या वेळीं जांबई नव्हते. हीं मुलं पोरं म्हणण्याइतकीं लहान होतीं. पण आज त्यांचीं मुलं घरांत होतीं. जांबईसुद्धा या जेवणांत सहभागी झाले. रात्री अंगणांत सगळ्यांचा गप्पांचा कायक्रम झाला. सगळ्यांना अधूनमधून एकत्र आणणारी, परिस्थितिभेद व स्वभावभेद असूत देखील भापलेपणानें जोडून ठेवणारी शक्ति म्हणजे माईची माया. बारा / ते माझें घर




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now